आर्थिक संकट आणि बचत.
लेखनप्रकार
आपल्या संस्कृतीने आणि संस्कारांनी लहानपणापासूनच बचतीचे महत्व आपल्या मनावर बिंबवले आहे. विविध सणांच्या निमित्ताने आपण जनावरांची, यंत्रसामुग्रीची, हिशेबाच्या वह्यांची पूजा करत असतो. खरी पूजा म्हणजे केवळ पोकळ विधी नव्हेत. एखाद्या रिक्षावाल्याने नुसता रिक्षाला हार घालणे पुरेसे नाही. त्या आपल्या उपजीविकेच्या साधनाचे महत्व समजून घेऊन त्याने आपल्या रिक्षाची नीट निगा राखायला हवी. सणवार एकवेळ सोडून देऊ, पण आपले संस्कारही हेच सांगतात. लहानपणी ताटात अन्न शिल्लक ठेवले म्हणून अनेकांनी मार खाल्ला असेल. कष्टाने श्रीमंत झालेल्या माझ्या ओळखीतील काही घरांमधे आजदेखील दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवून वाळवून ठेवल्या जातात, आणि रद्दीत दिल्या जातात. ह्यातून नगण्य पैसा मिळत असेल, पण ह्या एका कृतीकडे चिकटपणा म्हणून न पाहता बचत ही एक प्रवृत्ती म्हणून पहावे. जे लोक क्षुल्लक बचतीसाठी एवढी धडपड करतात, ते उद्योगधंद्यामधे काटकसर होण्यासाठी किती प्रयत्न करत असतील! "Reduce, reuse, recycle" इत्यादि मॅनेंजमेंटचे धडे हल्ली निघाले. ह्या सर्व गोष्टी सगळ्याच भारतीयांच्या रक्तातच आहेत!
"एक रूपयाची बचत म्हणजे एक रूपयाची कमाई" असे म्हटले जाते. माझा विचार मात्र वेगळा आहे. एक रूपयाची बचत ही खरी दहापंधरा रूपयांची कमाई असते. सगळ्या उद्योगजगतामधे करोत्तर नफा आणि विक्री, याचे गुणोत्तर काढले, तर किती असावे? पाच, दहा, वीस टक्के? माझ्या मते दहा टक्के सरासरी धरण्यास हरकत नाही. याचा अर्थ दहा रूपयाची वस्तू विकली, तर एकंदर उद्योगजगतास एक रूपयाचा नफा होईल. ह्याचाच व्यत्यास करून असे म्हणता येईल, की एक रूपयाची बचत केली, तर दहा रूपयांची कमाई होईल. त्यामुळे एक रूपयाची बचत ही एक नव्हे, तर दहा रूपयांची कमाई झाली.
वर उद्योगांचे उदाहरण दिले आहे. मात्र, हे नोकरदारांनाही लागू पडेल. आजकालच्या नोकर्यांमधे गलेलठ्ठ वार्षिक पगार दिसत असले, तरी महिन्याच्या एक तारखेला त्यापैकी थुंकी लावून मोजता येतील अशा किती नोटा हातात पडतात, हा एक संशोधनाचाच विषय ठरावा. नंतर काही आवश्यक, काही वायफळ खर्च होऊन थोडीफार बचत होते. सध्यापेक्षा दीडपट, दुप्पट बचत करणे अनेकांना शक्य असावे. ह्याचा परिणाम वेतन दीडपट, दुप्पट करण्यासारखा आहे - हे किती जणांना शक्य असेल? अनेकजण जेवढी बचत, तेवढे अतिरिक्त उत्पन्न असे मानतात, पण उत्पन्न तेवढे वाढले असे न म्हणता त्या प्रमाणात वाढले, असे म्हणावे लागेल.
अर्थात अर्थशास्त्रातला diminishing marginal utility चा नियम इथेही लागू पडेल. जे अगोदरच फार बचत करतात, त्यांच्यासाठी एक अधिक रूपयाची बचत करण्याची उपयुक्तता, अथवा फायदा, कमी असेल. पण बहुतेकजण पुरेशी बचत करत नाहीत, असे माझे वैयक्तिक मत आहे.
पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीचे अंधानुकरण करणे आपण टाळले पाहिजे. क्रेडिट कार्डे, फालतू कारणासाठीची कर्जे, मॉल्स, मल्टिप्लेक्स या सगळ्या गोष्टींपासून आपल्या मध्यमवर्गाने शक्यतोवर दूर रहावे. आपल्या देशाची आर्थिक प्रगती झाली असली तरीही आजही आपण विदेशी गुंतवणूकीवर अवलंबून आहोत हे विसरून चालणार नाही. अमेरिकन अर्थव्यवस्थेसारखी आपली अर्थव्यवस्था कोसळणे आपल्याला परवडणार नाही. मोठी अर्थव्यवस्था, आणि तरीही पुरेशी देशी गुंतवणूक असे दिवस पहायचे असतील तर बचत अपरिहार्य आहे. वैयक्तिक पातळीवर सुद्धा सद्यस्थितीचा विचार केला असता बरीच बिकट परिस्थिती आहे. अनेकांच्या नोकर्यांवर टांगत्या तलवारी आहेत. काटकसरीने राहणे कायमच योग्य होते, पण आज ती काळाची गरज बनली आहे.
बचत सुरू करण्यास कधीही उशीर झालेला नसतो.
वाचने
16787
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
कमाई
In reply to कमाई by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१ हेच!
In reply to +१ हेच! by चतुरंग
कार्ड
बचत, कमाई, वेतन
In reply to बचत, कमाई, वेतन by आनंद घारे
असे कसे ?
In reply to असे कसे ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कमाई
रामशास्त्
सामाजिक बचत
In reply to सामाजिक बचत by धनंजय
प्रश्न
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
अजीबात नाही
In reply to अजीबात नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
वेगळा मुद्दा असावा
In reply to वेगळा मुद्दा असावा by धनंजय
मुद्दा एकच आहे
In reply to मुद्दा एकच आहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नाही चालणार
In reply to नाही चालणार by धनंजय
ता. क.
In reply to ता. क. by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आर्थिक संकट आणि बचतीशी संबंध?
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
बरोबर
महागाई
In reply to महागाई by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
जर...
In reply to जर... by रामशास्त्री
परंतु
In reply to परंतु by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गैरसमज
In reply to गैरसमज by रामशास्त्री
निर्यात
In reply to निर्यात by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तेव्हा आपण
In reply to तेव्हा आपण by रामशास्त्री
पण
In reply to पण by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अहो
In reply to पण by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
दोन वेळा
In reply to पण by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
एकदा परत सगळे वाचा
In reply to एकदा परत सगळे वाचा by रामशास्त्री
सारांश
ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत्
In reply to ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत् by मुक्तसुनीत
थोडे आणखी
In reply to थोडे आणखी by मुक्तसुनीत
ब्यांकरप्शी
रामशास्त्री
समजून घ्या
बचत
In reply to बचत by मीनल
घातक प्रवृत्ती
In reply to घातक प्रवृत्ती by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सहमत
In reply to सहमत by मीनल
अवघड
In reply to घातक प्रवृत्ती by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
१० टक्के सोशल सेक्युरिटी ?
In reply to १० टक्के सोशल सेक्युरिटी ? by एक
एक
गुंतवणूक
In reply to गुंतवणूक by मीनल
सहमत
In reply to सहमत by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
पुन्हा सहमत
In reply to गुंतवणूक by मीनल
पुन्हा लिक्विड कॅश
छान लिहिले आहे.
वैयक्तिक
शन्तनुराव
In reply to शन्तनुराव by विजुभाऊ
सहमत !
.
विषय भरकटत कसा न्यावा...
In reply to विषय भरकटत कसा न्यावा... by कलंत्री
वरील चर्चा
In reply to विषय भरकटत कसा न्यावा... by कलंत्री
१९६२
In reply to १९६२ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
प्रयत्न.
खुपच बौध्दिक,माहितीपर आणि उद्बोधक
विषयांतर
एक व्हिडिओ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद.