माशांच्या आमटीचा अगदी साधा प्रकार
साहित्य
१-२ पापलेट, ( २-३ बांगडे, किंवा सुरमईचे १०-१२ तुकडे )
वाटीभर कोलंबी ऐच्छिक
एक वाटी ओलं खोबरं
७-८ ब्याडगी मिरच्या
१ टेस्पून धणे,
अर्धा टी स्पून हळद
मीठ,
छोट्या सुपारीएवढी चिंच
एक छोटा कांदा ,एक इंच आल्याचा तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या - तिन्ही अगदी बारीक चिरून .
२ चमचे तेल ( खोबरेल चालत असेल तर ते, नाहीतर शेंगांचे किंवा कनोला . तिळाचे, ऑलिव्हचे वापरु नये )
माशांचे तुकडे करूनच आणावेत. घरी आणल्यावर थंड पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावेत. फिन्स, गिल्स किंवा खवले राहिले असतील तर ते साफ करून घ्यावेत.
मग माशांच्या तुकड्यांना पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ शिंपडून सगळीकडून सारखे करून घ्यावे. असे करुन मासे फ्रीज मधे एखाद दिवस ठेवले तरी चालतं.
फ्रीजमधे ठेवले असतील तर आमटी करायच्या २५-३० मिनिटं आधी बाहेर काढून ठेवावेत.
कोलंबी असेल तर ती पण स्वच्छ धूवून त्याला हळद मीठ लावून ठेवावे व माशांच्या बरोबरच शिजत घालावी.
अर्धा चमचा तेलावर धणे अन सुक्या मिरच्या भा़जून घ्याव्या. गॅस बंद करुन त्यात उरलेली पाव चमचा हळद घालावी
गार झाल्यावर धणे खोबरं हळद सगळं बारीक वाटून घ्यावं. अगदी गंध वाटलं गेलं पाहिजे. शेवटी चिंच घालून मिनिटभर वाटावं.
एका स्टीलच्या किंवा नॉन स्टिक पातेल्यात माशांचे तुकडे, मसाला, वाटणाचं यंत्र ( रगडा/पाटा) धुतलेलं पाणी घालून शिजत ठेवावे.
मासे ताजे असले तर दोन उकळी येईपर्यंत शिजतात.
मासे शिजायला लावले की एकीकडे लोखंडी पळीत उरलेलं तेल गरम करावं . तेल तापलं की त्यात आधी आलं, मग एका मिनिटाने मिरच्या अन शेवटी कांदा घालून भाजावं . कांदा मऊ झाला पाहिजे पण लाल होऊ नये. कांदा मऊ झाला की ही फोडणी माशाच्या आमटीत घालावी व लगेच माशांचा गॅस बंद करावा. ( झाकण सुद्धा लगेच ठेवावे)
असं पातेलं लगेच गॅसवरून जेवणाच्या टेबलवर न्यावं- सोबत वाफाळता भात फक्त. बाकी काही नको....
वाचन संख्या
10195
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
खल्लास...
+१
In reply to खल्लास... by प्रभाकर पेठकर
छान खुप दिवसापासुन ह्याचीच वाट पहात होतो
शी .....
तुमी गवत
In reply to शी ..... by बाकरवडी
आवडल तर
पापलेट
चिनी दुकान
In reply to पापलेट by नारायणी
प्रोम्फित
In reply to पापलेट by नारायणी
चितळ्यांन
वा! साधी,
निघालो मार्केटकडे!
जल्ला माशे
तोन्दाला
वा!!