Skip to main content

भरती-अहोटीच येणं

लेखक स्वाती फडणीस यांनी रविवार, 28/09/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.

भरती-अहोटीच येणं
=====================

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
लाटांच्या झुल्यात.. मनाच झुलणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
रेतीच्या किल्ल्याचं.. सागरी बुडणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
विखुरती चांदी.. हलकेच झेलणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
उमटल्या खुणांच.. तळाशी रहाणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
खार्‍या लोटात.. खळाळून हसणं..!

रोजचंच आहे.. भरती-अहोटीच येणं...
लाटांच्या ओठी.. जीवन गाण..!

=====================
स्वाती फडणीस.................... २००६

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1185
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया