'RSS फीड' असा वापरावा
मागील एक दोन दिवसात मिपा च्या 'RSS फीड' वर चर्चा झाली.
http://www.misalpav.com/node/5287
मिपा चा 'RSS फीड' लवकरच सुरु होईल असे दिसते.
'RSS फीड' वापरण्यासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे .
समजा, मी खालील ब्लॉग /वर्तमानपत्राच्या साईटचा /उपक्रमाचा व त्या समोर दिलेल्या विषयाचा नियमीत वाचक आहे .
http://tatya7.blogspot.com/ - सर्व लेख
http://www.esakal.com/ - मुंबई आव्रुत्तीतील बातम्या
http://mr.upakram.org/
विसंगतींचे संदर्भ...!
कळून इतके काय कळे हे
नकळे मजला का न कळे
ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!
भास भाबडे रंग रूप हे
भास भावना भास चेतना,
भास सत्य अन भास भासही
भास असे सगळे सगळे...
ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!
समजून घेतो आपण आपले
सगळे आपल्यासाठी इथे..
आपण कोण नि कोण दुजे हे
परंतु येथे कोणा न कळे..
ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!
भूल दिशा अन दिवस निशा हे
पोकळ जडता स्थिर चल हे..
अंत अनंत नि क्षणिक चिरंतन
व्यक्ताशी अव्यक्त जुळे....
ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे
ज्याचे त्याचे समज खुळे...!
-झ
Taxonomy upgrade extras
प्राक्तन
साथ देण्याचा इरादा पाहिला स्वप्नात होता
प्राक्तनाचा वार तेव्हा हाय रे अज्ञात होता....१
मी जरी की ह्या ठिकाणी मैफलींनी धुंदलेला
आठवांच्या वेदनांचा मारवा रंगात होता.... २
पाहताना तू मला हे प्रेम नाही का दिसेना
तू मला वैर्यांत मोजावे ग हा आघात होता.... ३
बैठकीच्या लावणीने रंगलेल्या रात्र वेळी
स्वप्नभंगा झाकणारा दागिना भांगात होता.... ४
रंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी
कुंकवाचा योग नाही का ग संभोगात होता?... ५
सांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या?
बासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता.... ६
“मी तुझी रे वाट पाहे”, सार्थ गाणे मीलनाचे
सात जन्मी साथ नाही, आठवा हातात होता....
आपण गाणी का म्हणतो?
इकॉनॉमिस्टच्या या महिन्याच्या अंकात एक " व्हाय म्युझिक" म्हणून एक लेख होता, त्याने लक्ष वेधले. लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे, म्हणून इथे दुवा देते. पण थोडक्यात लेखाच्या विषयाबद्दल सांगायचे तर आपल्या (माणसांच्या) आयुष्यात गायन/वादन यांचे एवढे महत्त्व का असावे यावरून मांडलेल्या विचारधारांचा हा एक मनोरंजक माहिती असलेला लेख आहे.
कांद्याच्या पातीची सोप्पी कोशिंबीर
कांद्याच्या पातीची ही कोशिंबीर करायला अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी आहे.
साहित्य- घरात सहजी उपलब्ध असणारेच-
कांद्याची पात - १ जुडी
दाण्याचं कूट - २ - ३ चमचे
कच्चं तेल - १ चमचा
गोडा मसाला - १ छोटा चमचा
तिखट - १ छोटा चमचा
लिंबाचा रस - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
साखर - २ चिमूट
कृती - कांद्याची पात स्वच्छ पुसून चिरून घ्यावी. त्यात वरील सर्व जिन्नस - दाण्याचं कूट, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालावे.
साहित्य- घरात सहजी उपलब्ध असणारेच-
कांद्याची पात - १ जुडी
दाण्याचं कूट - २ - ३ चमचे
कच्चं तेल - १ चमचा
गोडा मसाला - १ छोटा चमचा
तिखट - १ छोटा चमचा
लिंबाचा रस - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
साखर - २ चिमूट
कृती - कांद्याची पात स्वच्छ पुसून चिरून घ्यावी. त्यात वरील सर्व जिन्नस - दाण्याचं कूट, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालावे.अचूकतेचा अभाव
आपल्या भारतीयांत अचूकतेचा अभाव ठायी ठायी दिसून येतो. त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर निश्चितच होतो. आपल्या प्रगतीचा प्रवास अतिसंथ आहे त्यांतल्या अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण आहे.
पत्रकारांचेच पहा ना, त्यांनी लोकांपर्यंत अचूक बातम्या पोचवल्या पाहिजेत. प्रत्यक्षांत काय दिसते? साधी नांवे सुध्दा या मंडळींना अचूक लिहिता येत नाहीत. 'कसाब्'ला पकडणारा तो शूर पोलिस! त्याचे नांव सुध्दा ओंबळे की उंबळे याबाबतीत गोंधळ दिसतो. 'कसाब' चे नांव सुध्दा कासाब, कासव, कासम असे लिहिलेले वाचायला मिळते.
न झालेला दोस्ताना..
तसा लेखाच्या नावावरून चतूर मि.पा. करांच्या ध्यानात आले असेल की मी कोणत्या विषयावर लिहीणार आहे. मला आणि माझ्या मित्रांना आलेले अश्या लोकांचे अनुभव. म्हणजे तुम्ही तसा काही गैरसमज करून घेऊ नका. मी लिहीणार आहे की अशी माणसे कशी आमच्या मागे लागली आणि आम्ही कसे या प्रसंगातून वाचलो ते. आमच्या अनुभवातून तुम्ही काही शिकावे हाच खटाटोप. एक सांगू इत्छितो की या लेखाद्वारे कोणाला दु़खवायचा किंवा अश्या लोकांची चेष्टा करायचा मुळीच उद्देश नाही. जर कोणी मि.पा. कर नाराज झाले तर क्षमस्व.
प्रसंग १ (अनुभव १ असे लिहीणार होतो.
मिसळपाव