Skip to main content

उपवासाचे बटाटावडे

उपवासाचे बटाटावडे

Published on 03/10/2008 - 10:47 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य---३-४मोठे बटाटे,मिरच्या,कोथिंबीर्,जिरे,मीठ्,शिंगाडा पीठ्,तिखट, कृति---प्रथम बटाटे उकडून घ्यावेत्.ते कुस्करून घेऊन त्यात वाटलेली मिरची,जिरे,कोथिंबीर,मीठ घालून छोते गोल गोळे करावेत्.शिंगाड्याच्या पीठांत तिखट-मीठ ,पाणी घालून पीठ साधारण जाडसर भिजवावे.बटाट्याचे गोळे पीठात बुडवून तुपात अगर तेलात तळावेत. ह्या वड्यांबरोबर खोबरे किंवा शेंगदाण्याची थोडी पातळ चटणी छान लागते.

याद्या 5144
प्रतिक्रिया 4

रेसिपि बद्दल धन्यवाद!! मस्त फोटो आहे. आताच खायची इच्छा झाली. :) -- किट्टु

सोपी आणि झटपट रेसिपी. फोटू पण मस्त... वडाप्रेमी--- निसर्ग " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "

In reply to by निसर्ग

सहम्त ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

चला! आता खास या वड्यांकरता तरी एखादी संकष्टी पकडेन म्हणतो! :) डॉक्टरीणबाई, येऊ द्यात अजूनही अश्याच छान छान पाकृ.. तात्या.