राष्ट्रीय सण व ध्वज अपमान !
आताच ही बातमी वाचली व डोके जरा सुन्न झाले !
प्रत्येक १५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारीनंतर च्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान... अमुक-मतुक ने झेंडा उलटा लावला.. तमुक-अमुक राष्ट्र गाणच्यावेळी झोपले होते... ह्या बातम्या का येत असाव्यात ?
तिरंग्याचे अथवा राष्ट्रगीताचा मान कसा ठेवा हे राजकिय नेत्यांना खरोखरच माहीत नसते का ? मागे एकदा सर्वे झाला होता एनडीटीव्हीचा, लोकसभेतील किती सदस्यांना राष्ट्रगीत माहीत आहे त्याचा... त्यांचा सर्वे चालू होऊन पंधरा मिनिटे झाली पण एका कबुतराला व्यवस्थीत उत्तर देता आले नाही...
मिसळपाव