विचारांचे तण
आठ्वांचे रण
माजले हे रान
माझिया मनी !!
धरीले रींगण
पुरते झींगुण
जाहले करुण
माझिये मन !!
तुझीच आन
नको तुजविन
काही अजुन
माझिया मना !!
कितीक क्शण
गेले निवटुन
मोहात गुंतुन
माझिया मना !!
नको येणंजाणं
तुजठायी ध्यान
व्हावे एकमन
माझ्या गुरुराया !!
सुचेता सुळे
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1137
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुरते झींगुण ?