Skip to main content

लाजवंती

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 27/01/2009 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नदेशातून आले साथ देण्या सूर हे ऐकुनी माझे तराणे लाजणे तव चूर हे पाहिले मी…तू दिला होता इशारा मंदसा स्पर्श माझा धीट होता का धपापे ऊर हे? रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे काय सांगू काय केले हाल त्यांनी आमचे पाहिले लाजून प्रणयीं अन सुखाचे पूर हे मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे ----------------------------------------------- संपादनः 'पाहिले लाजून....' ही ओळ नंदनच्या सूचनेप्रमाणे बदलली आहे. -----------------------------------------------
लेखनविषय:

वाचने 2368
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by नंदन

असेच म्हणतो.

In reply to by नंदन

हाच शेर सर्वात आवडला, पण त्यात "ते आणि हे" आवडले नाही. आणखी छान होऊ शकेल. -- सर्किट

In reply to by नंदन

रे निसर्गा ! काल कोठे रंग होते हे तुझे? लाजली माझी प्रिया ते घेतले तू नूर हे भन्नाट कल्पना!! जियो संदीप!!! चतुरंग

आठवूनी लाजणे ते तीव्र होती भावना कामनांचे अश्व धावे अंतरी चौखूर हे हा शेर सगळ्यांत आवडला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मैत्रिणींचे गूज आहे गोकुळाने ऐकले लाजता राधा कळे की श्याम नाही दूर हे वा व्वा! लै मस्त! तात्या.