वर्षपूर्ती
`मिपा'च्या चरणाशी आल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. एवढा प्रदीर्घ काळ मिपानं, मिपाकरांनी, संपादकांनी आणि मुख्य म्हणजे तात्यांनी या पामराला सहन केल्याबद्दल हार्दिक आभार! :D
परवाच खरडवहीतून नंदनने वर्षपूर्तीच्या (आगाऊ) शुभेच्छा दिल्या, तेव्हा माझ्याही ते लक्षात आलं. नाहीतर अशी वर्षंबिर्षं लक्षात ठेवणं, अवघडच जातं. हल्ली तिशी उलटल्यानंतर तर स्वतःचा वाढदिवसही लक्षात राहू नये, असंच वाटतं मला! :$ तर ते असो.
28 जानेवारी 2008 ला पहिला लेख टाकला इथे. त्याआधी सहा-सात महिने ब्लॉगवर लिहीत होतो. तिथेही मजा येत होती.
मिसळपाव