सदर चर्चा येथे टाकण्यापूर्वी मिपा व्यवस्थापनाची रीतसर परवानगी घेतली आहे..
परवाच एन्डीटीव्ही ल्युमिएर चॅनेलवर "द याकूबियन बिल्डिंग" (Arabic: عمارة يعقوبيان) हा चित्रपट दाखवला.
इजिप्तमधली ढासळती नैतिक परिस्थिती दाखवणारी ही 'अला एल्-अस्वानी' यांची कथा कैरोतील एका बिल्डिंगमध्ये घडते. कथेतील विविध पात्रे समाजातील कृष्णकृत्यांची (राजकीय भ्रष्टाचार, लाचलुचपत, धार्मिक कट्टरता, स्वार्थ, समलैंगिक संबंध इ.इ.) प्रतिनिधीच आहेत.
सदर चित्रपट पाहताना हेच वातावरण, हीच सामाजिक परिस्थिती भारतालाही तंतोतंत लागू पडते असे वाटत होते. काही वाचकांनी हा चित्रपट पाहिला असेल किंवा हार्पर-कॉलिन्सने प्रसिद्ध केलेली याच नावाची मूळ कादंबरीही वाचली असेल. पण ज्यांनी यातले काहीच केलेले नाही त्यांनी हा चित्रपट (पुन्हा प्रदर्शित झाल्यास) जरूर पहावा अथवा कादंबरी वाचावी.
पण चर्चेचा मूळ मुद्दा चित्रपटाचे रसग्रहण हा नाही.
विचार करण्याचे दोन मुद्दे आहेत -
१. सदर कादंबरीच्या लेखकाने 'समलैगिक संबंध' या विषयाबद्दल एक दुटप्पी भूमिका घेतली आहे असे वाटते. एकीकडे एका मुलाखतीत तो म्हणतो की त्याला समलिंगी व्यक्ती एक माणूस म्हणून कशी असते हे दाखवायचे होते. समलैगिक संबंधांवर टीका करायची नव्हती.
पण मग दुसरीकडे राजकीय भ्रष्टाचार, लाचलुचपत, धार्मिक कट्टरता, स्वार्थ या वाईट गोष्टींच्या पंक्तीला त्याने हे संबंध का बसवले?
या चित्रपटातील समलिंगी व्यक्ती (पुरुष पात्र - हतीम रशीद) आपला प्रियकर (हा प्रियकर मात्र एक गरीब सरळ माणूस असतो) हेरते, त्याला खायला-प्यायला ,कपडेलत्ते देते, त्याच्या उदरनिर्वाहाची सोय करते, त्याचे मन वळवते असे दाखवले आहे. म्हणजे एका अर्थाने तोही भ्रष्ट व्यवहार आहे असे सूचित केलेले आहे.
काही प्रगत देशांची उदाहरणे सोडल्यास जागतिक समाज अजूनही समलैगिक संबंधांकडे कृष्णकृत्य म्हणून पाहतो हे नाकारावे अशी परिस्थिती दिसते आहे का? मुळात ते कृष्णकृत्य आहे असे वाटते काय?
२. समलैगिक पात्र हतीम रशीद आपल्या समलैगिकतेचे समर्थन करताना म्हणतो - "पुरुष-पुरुष संबंध जगातील पवित्र संबंध समजले पाहिजेत. कारण त्यातून अनौरस संतती निर्माण होऊ शकत नाही. देवानेच पुरुषाला तसे बनवले आहे. उलट एखाद्या स्त्रीला फसवून तिचा गैरफायदा घेणे आणि अनौरस संतती निर्माण करणे अथवा गर्भपाताला भाग पाडणे हे जास्त घृणास्पद आणि पापी कृत्य आहे."
समलैगिकतेचे असेच समर्थन स्त्री-स्त्री संबंध या बाजूनेही होऊ शकते.
या दृष्टीने समलैगिकता पवित्र आहे असे वाटते का?
भारतीय दंडविधानात समलैगिक संबंधांना कलम ३७७ अन्वये कमीतकमी १० वर्षे कारावासाची कठोर शिक्षा आहे. अनेक धर्मांत समलैगिकतेवर कडक ताशेरे आहेत, नरकयातना आहेत. समलैगिकांकडे घृणास्पद म्हणून पाहिले जाते. पण स्त्रीची फसवणूक करणार्याला सैल सोडलेले आहे. अनौरस बाप मात्र उजळ माथ्याने वावरतात. पाय घसरलेल्या स्त्रिया आपली सुटका करून घेतात आणि नंतर उजळ माथ्याने जगतात.
समलैगिकता ही विषमलैगिकतेपेक्षा नीच आहे असे मानल्यास -
लैगिक संबंधातून संतती निर्माण होत असेल तर त्या अपत्याची जबाबदारी टाळणे किंवा भ्रृणहत्या करणे हे समलैगिकतेपेक्षाही नीच पातळीवरचे आहे असे वाटते का?
वाचने
3016
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मत
वैयक्तिक निवड
In reply to मत by श्रावण मोडक
निश्चितच!
In reply to वैयक्तिक निवड by विसुनाना
स्पष्टीकरण
चांगली माहिती