Skip to main content

जुन २००९मधिलworld cup

लेखक विनोद कोकने यांनी शनिवार, 24/01/2009 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
Twenty 20 World Cup – Schedule June 2009 Fri 05 16:30 England v Netherlands, 1st Match, Group B, ICC World Twenty20, 2009 London (D/N) Sat 06 09:00 New Zealand v Scotland, 2nd Match, Group D, ICC World Twenty20, 2009 London Sat 06 12:30 Australia v West Indies, 3rd Match, Group C, ICC World Twenty20, 2009 London Sat 06 16:30 India v Bangladesh, 4th Match, Group A, ICC World Twenty20, 2009 Nottingham (D/N) Sun 07 12:30 South Africa v Scotland, 5th Match, Group D, ICC World Twenty20, 2009 London Sun 07 16:30 England v

दिवा तेवतसे अंधारात... (देवद्वार छंद) [माझं इथलं पहिलंच पोस्ट :) ]

लेखक आचरट कार्टा यांनी शनिवार, 24/01/2009 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. मी कालच पहिल्यांदा या कट्ट्यावरची मिसळ खाल्ली, आणि प्रेमातच पडलो राव! अजुन सगळ्या सिस्टिमची नीट ओळख व्ह्यायची आहे, जमेल हळूहळू... छंदबद्ध रचना करायचीही आवड आहे, म्हटलं तुम्हा जाणकार लोकांच्या नजरेखालून जाऊदेत. [:)] अंधार आजचा राहतो गर्भार उघडते दार पहाटेचे ||१|| अंधाराची वाट अशी उजळते आणिक गळते भीती चिंता ||२|| क्षणात फुलतो मनात प्राजक्त मन हे आसक्त जगण्याला ||३|| एका आशेपोटी होती चमत्कार शरण हे जग श्रद्धावंता ||४|| आत्मविश्वासाचा उदय होतसे दिवा तेवतसे अंधारात ||५||
Taxonomy upgrade extras

कोलंबी फ्राय

लेखक गणपा यांनी शनिवार, 24/01/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक्स्.. आज म्या पामर मिपाच्या बल्लवाचार्यांच्या हद्दित धुसखोरी करत आहे. काय चुकल माकल तर माफ करा. तर आजची डिश् कोलंबी फ्राय.. Prons Fry साहित्य : १/२ किलो. एक किलो पण कमीच पडते दर वेळी. कोलंबी न सोललेली (कोतासकट.) ३/४ मोठे चेमचे आलं + लसुण + मिरची + कोथिंबीर पेस्ट (हिरवा मसाला). १ चमचा हळद. २ मोठे चेमचे घरगुती मसाला.

माझी निवड चुकली तर नाही ना?

लेखक मोगॅम्बो यांनी शनिवार, 24/01/2009 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
ई मेल वरून आलेल्या एका लेखाचा हा अनुवाद. एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय.

...मी आहे.

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 24/01/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
...मी आहे. तू घेतलेला प्रत्येक श्वास, तू सोडलेल्या प्रत्येक प्र:श्वासाला सांगेल ... मी आहे. तुझ्या जीवनात आलेले मोजके सुखाचे क्षण, तुझ्या प्रत्येक दु:खद क्षणाला सांगतील ... मी आहे. मधुबनातून मरुभुमीकडे वाहणार वारा, तुझ्या थकलेल्या मनाला सांगेल ... मी आहे. तृशार्त वाटसरुला क्रुतार्थ करणारी आणि सागराकडे धावणारी नदी तुला सांगेल ... मी आहे. काट्यांवर चालून घायाळ झालेल्या तुझ्या पायांना काटेरी सिंहासनावर पहुडलेले गुलाब तुला सांगेल ... मी आहे.
Taxonomy upgrade extras

अस्तित्व...

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 24/01/2009 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व... द्वेषाच्या वडवानलात किनारा जळुन खाक होत आहे. प्रश्न सागराचा नाही किना-याच्या अस्तित्वाचा आहे. अहंकाराच्या वणव्यात वनराईचा कोळसा होत आहे. प्रश्न माळारानाचा नाही वटवृक्षाच्या अस्तित्वाचा आहे. मत्सराच्या अग्नीमध्ये हृदय पोळुन निघत आहे. प्रश्न शरीराच्या एका भागाचा नाही हृदयातील प्रेमाच्या अस्तित्वाचा आहे. अमंगल कृष्णमेघांनी आकाश व्यापून टाकले आहे. प्रश्न अंधाराचा नाही धरणीच्या अस्तित्वाचा आहे.
Taxonomy upgrade extras

राज ठाकरे....

लेखक निखिलराव यांनी शनिवार, 24/01/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज ठाणे येथे होणार्‍या सभेला पोलीसांची परवानगी मिळाली........ राज आज काय बोलणार ?

नेताजी सुभाषचंद्र बोस-एक असामान्य व्यक्तिमत्व

लेखक चिन्या१९८५ यांनी शनिवार, 24/01/2009 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
"हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा." नेताजी सुभाषचंद्र बोस काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती .

काही ऐतिहासिक शंका..

लेखक योगी९०० यांनी शनिवार, 24/01/2009 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटलात घडलेल्या काही घटनांविषयी खरी माहिती हवी आहे. असे कळले की.. १) संभाजी राजांचे मोगलांना जाऊन मिळणे आणि परत स्वराज्यात येणे हा महाराज आणि संभा़जीराजांचा डाव होता. त्यांनी तसे मुद्दाम आखले होते. नाहीतर फितुर झालेल्या बर्‍याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले महाराज संभाजी रा़जांना फक्त तुरूंगवास नाही ठोठावणार. महाराजांना स्वराज्यावर येणार्‍या पुढील संकटाची(औरंगजेबचा संभाव्य हल्ला) कल्पना होती. त्यांनी त्या द्रूष्टीने तयारी म्हणून मुद्दाम संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. त्यावेळी आपल्या बेलगामी वागण्यामुळे संभाजीराजे थोडे बदनाम होतेच.

संतश्रेष्ठ (देवद्वार छंद)

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 24/01/2009 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
'देवद्वार' छंदाची ओळख करून दिल्याबद्दल धोंडोपंतांचे आभार ! ----------------------------------------------------- ज्ञानियाचा राजा त्याची ज्ञानेश्वरी या भव सागरी नौका होई तुकोबा तो सांगे आम्ही देऊ छाटी नाठाळाला काठी हाणू माथी एकनाथ गाती रचूनी भारूड लोकांसी गारूड झाले ऐसे नामा म्हणे देवा म्हणतो अभंग तुझी भक्ती दंग करितसे लिहिणे हे काव्य केवढा आनंद साथ देई छंद देवद्वार