Skip to main content

साखरेचा पाक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 28/01/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
साखरेचे निरनिराळ्या प्रकारचे पाक असतात १]साखरेचा घट्ट पाक २]साखरेचा कच्चा पाक ३]साखरेचा पक्का पाक ४]साखरेचा एकतारी पाक ५]साखरेचा पाक ६]साखरेचा दोन तारी पाक या सर्व पाकात नेमका काय फरक असतो?. हे निरनिराळे पाक कुठे वापरले जातात? हे पाक कसे केले जातात? [क्रुति] पाक बिघडतो म्हणजे नेमके काय होते? साखरेचा एक तारी व दोन तारी पाक असतात त्या प्रमाणे आणखिन किति तारी पाक असतात?? मी.पा. मान्यवर यावर काहि माहिति देवु शकतिल का?

वाविप्र

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 27/01/2009 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. अगदी मिपावर सुद्धा. अर्थात व्यंनि मधुन. आजपण विचारला गेला. मी उतरे दिली. गेल्या ३० वर्षात ही उत्तरे मी तरी बदललेली नाहीत. प्रश्नकर्त्याने ही उत्तरे लेख लिहुन 'कर्तव्य आहे' सदस्यांचा गोंधळ दुर करावा अशी कळकळीची आणि 'कळीची' विनंती केली म्हणुन हा प्रपंच. ह्या काही उत्तराबद्दल वाद होण्याची शक्यता आहे ह्याची मला संपुर्ण कल्पना आहे. Different strokes for different folks according to frame of reference. प्रश्नः संतती नियमनाची चांगली साधने कोणती?

दहशतवाद तरुण झालाय!

लेखक नोहिद सागलीकर यांनी मंगळवार, 27/01/2009 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
वाचक मित्र हो प्रजासत्ताक दिना च्या तुम्हाला मला सर्वानां हर्दिक शुभेछा ...... २६/११ ला शहिद झालेल्या शुरांना सलाम ..... आणि एवढ घडुन सुधा गप आसनार्‍या सरकाराला १०० सलाम...... विषय दोन महिन्यां पुर्विच्या मुबई त झालेल्या हल्या शिसंबंधित आहे..... ऊद्या त्याला ६० दिवस होतिल ....... आपन प्रजासत्ताकाच्या ६० व्या वर्षात पदार्पन केले काल... आनि त्या ६० तासां च्या भय नाट्या ला उद्या ६० दिवस होतिल. काल एका ठिकानि व्याख्यान आयोजित केला गेला होत विषय होता "दहशतवाद आनि तरुणाई" मला त्या दहा दहशत वाद्यां चे वय आठवले १८ ते२८ आपल्या माहिति प्रमाने हेच ते तरुणपण.......

Seezens (seasons)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 27/01/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा मी एक कविता म्हणून दाखवू?"काल रात्री आमच्या चिरंजिवांनी (वय वर्षे ७) एक विचारणा केली. मी विचारले की शाळेत शिकवली का तर म्हणाला, "नाही, मीच केली." मी चकित! त्याला म्हणालो लिहून काढ. "मला कोणीही स्पेलिंग सांगू नका मला येईल तसे मी लिहीन नंतर सांगा." अशी आज्ञा करुन चिरंजीव लिहायला बसले. आता हा काय लिहिणार अशा आश्चर्यात मी होतो. त्याने झटपट लिहून ती मला दाखवलीन.

चव्हाट्या(वर)चे प्रेमप्रकरण - अर्थात, "पाहताच हा चव्हाटा, कलेजा खलास झाला..."

लेखक विंजिनेर यांनी मंगळवार, 27/01/2009 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून मी "मिसळ पाव" बद्दल अधुनमधून बरेच काही ऐकत होतो - कधी कर्णोपकर्णी तर कधी मिपाच्या वाचकवर्गांतल्या एकदोघांकडून तर कधी अरूण मनोहरांसारख्या लेखकमंडळींकडून. आता मिसळपाव हे एक समूह-संकेतस्थळ. तसे पहायला गेलो तर मी ओर्कुट, फेसबुक आणि तत्सम समूह-संकेतस्थळांवर नावा पुरती हजेरी लावतो खरा, पण वावर फार नसल्यातच जमा. अहो दररोज प्रत्यक्ष दिसणारे तेच ते मित्र/मैत्रिणी इथेही पुन्हा भेटणार आणि "अरे, कसा काय? इकडे कुठे? हल्ली काय करतोस?" अश्या शिळोप्याच्या गप्पा मारणार. ह्या गप्पा काय, ईमेल नाहीतर फोनवरून सुद्धा आपण मारतोच की त्यासाठी एका वेगळ्या संकेतस्थळावर जायची गरज काय?

विंनती

लेखक श्रेया यांनी मंगळवार, 27/01/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपाच्या सभासदानां विंनती आहे एखाद्याचे लेखन वाचु वाटले तर वाचावे उगाच नको ते विचार मांडंयची गरज नाही

आपल्याला पटते का?

लेखक श्रेया यांनी मंगळवार, 27/01/2009 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज जग २१ व्या शतकात आहे आपण प्रगती केली जुने विचार बदलले पाहिजेत हे मान्य पण आज काही लग्न झालेल्या बायका मंगळसुञ घालत नाही हेच चिञ T.V मध्ये पुरस्कार वितरणाच्या वेळी दिसते काळाबरोबर बदल केला पाहिजे पण मंगळसुत्र न घालणे हे पटत नाही ती फॅशन नसुन त्याला काही महत्व आहे आजच्या तरुण पिढीने बदल घडवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे आपली संस्कृती , संस्कार , परंपरा याचे आपण जतन केले पाहिजे आपण भारतीय आहोत अमेरिके सारखे वागुन जमणार नाही आपला भारत विविध समृध्दिनी , संस्कारांनी नटलेला देश आहे आणि आपण तो ठेवणार आहोत

बिलावलशी दोस्ती! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 27/01/2009 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, काही दिवसांपूर्वी मिपावर आम्ही आमचे मधुभाई हा लेख लिहिला होता. त्यात काही मंडळींनी मधुभाईंनी गायलेले काही ध्वनिमुद्रण असल्यास ते जालावर चढवावे असे आम्हाला सुचवले होते म्हणून मुद्दाम हा लेखनप्रपंच. परवा खूप दिवसांनी सवड मिळाली म्हणून आम्ही मधुबुवांच्या घरी गाण्याची तालीम घ्यायला गेलो होतो. "अरे ये ये!" असं नेहमीप्रमाणे मधुभाई हसतमुखाने म्हणाले. तिथे त्यांच्या अजून दोन शिष्या बसल्या होत्या. त्यांच्या गाण्याची तालीम सुरूच होणार होती तेवढ्यात आम्ही तिथे हजेरी लावली! "काय मग? आज वेळ मिळाला वाटतं?

राष्ट्रीय सण व ध्वज अपमान !

लेखक दशानन यांनी मंगळवार, 27/01/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आताच ही बातमी वाचली व डोके जरा सुन्न झाले ! प्रत्येक १५ ऑगस्ट अथवा २६ जानेवारीनंतर च्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय तिरंग्याचा अपमान... अमुक-मतुक ने झेंडा उलटा लावला.. तमुक-अमुक राष्ट्र गाणच्यावेळी झोपले होते... ह्या बातम्या का येत असाव्यात ? तिरंग्याचे अथवा राष्ट्रगीताचा मान कसा ठेवा हे राजकिय नेत्यांना खरोखरच माहीत नसते का ? मागे एकदा सर्वे झाला होता एनडीटीव्हीचा, लोकसभेतील किती सदस्यांना राष्ट्रगीत माहीत आहे त्याचा... त्यांचा सर्वे चालू होऊन पंधरा मिनिटे झाली पण एका कबुतराला व्यवस्थीत उत्तर देता आले नाही...