लेखनप्रकार
अलिकडे आंजर्ले, हर्णै, मुरूड परिसरात सहल केल्याचा धागा मिपावर प्रकाशित करण्यात आला होता. त्यात या परिसराचे सुंदर, सचित्र वर्णन करण्यात आले आहे. परंतु या भागातील खादाडीवर फारसा प्रकाश पडल्याचे दिसत नाही. म्हणून थोडी माहिती.
शाकाहारी मंडळींना मुरूड गावातील घरगुती खाणावळीत खास उकडीचे मोदक, डाळींब्यांची उसळ, आत्ता हिवाळ्यात ओल्या पावट्यांची भरपूर खोबरे घालून केलेली उसळ या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. उन्हाळ्यात आमरस व घावन फणसाचे सांदण यांची चव घेता येते.सामीष पदार्थांचा आस्वाद घेणार्यांची तर केवळ चंगळ असते. त्यातही आपला जर मुक्काम असेल तर हर्णै येथे सायंकाळी होणार्या माशांच्या लिलावात पापलेट, सुरमई, कोळंबी,शेवंड यासारखे मासे खरेदी करून काही घरगुती खाणावळीत आणून दिल्यास आपल्या इच्छेप्रमाणे ते फ्राय किंवा त्याची करी, मसाला तयार करून देण्यात येते. या ताज्या माशांची चव एकदा घेतलीत तर पुण्यामुंबईत मिळणारे बर्फातील मासे खाण्याची आपणाला फारशी इच्छाच होणार नाही. पापलेट, सुरमई, कोळंबी, शेवंड हे खरेतर पट्टीच्या मासेखाऊचे खाद्य नव्हेच. आपण खरे दर्दी मासेखाऊ असाल तर कर्लीसारखा जास्त काटे असलेला परंतु भलताच चवदार मासा निवडाल. संध्याकाळी सोनेरी वारुणीची चव घेताना त्या सोबत चखणा म्हणून फ्राय कोलंबी खाण्यापेक्षा कुरकुरीत मांदेली किती छान लागते हे शब्दात सांगून कळणार नाही. कोलीम हा मासा तसा दुर्लक्षीत आहे पण ओला कोलीम मिळण्याच्या सिझनमध्ये त्याचे पकोडे खाणे म्हणजे स्वर्गसुख आहे. याखेरीज शिंपल्या आणि कालवे मिळाले तर त्याची पारंपारिक पाककृती हा एक खास चवदार प्रकार आहे. त्याची चव अवश्य घ्यायलाच हवी. कोकणी शेतकर्याचे अन्न म्हणून प्रसिद्ध असलेली सुकी कोलीम चटणी आणि सर्वाधिक लोह असलेले धान्य नाचणी यांची गरमगरम भाकरी हाही एक वेगळा जिव्हानंद आहे. सागुती आणि वडे हा कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय कोंबडीचे मटण आणि त्यासोबत खास कोकणी वडे एकदा खाल तर या डिशच्या प्रेमातच पडाल. हा आनंद या परिसरात पर्यटक म्हणून जाणार्या मिपाकरांनी अवश्य घ्यावा. उगाच मोठी भपकेबाज हॉटेले निवडण्यापेक्षा उतम स्वच्छ घरगुती खाणावळीत या पदार्थांचा आस्वाद घ्यावा. म्हणजे नेमकी पारंपारिक चव घेता येईल.
मिसळपाव
माहिती चांगली दिलीत.
वा!
In reply to वा! by नाटक्या
+१
वा! वा!
दोनच महिन्यांपूर्वी
चव घेतली आहे !
मस्त
आयायाया...
+१
मजा चख लो यार!
In reply to मजा चख लो यार! by अनंत छंदी
जिव्हानंद..व्यक्तीसापेक्ष :)
समुद्रातल्या माशापेक्शा
In reply to समुद्रातल्या माशापेक्शा by दवबिन्दु
मस्त !
वा!
कर्ली..
हर्णै कट्टा.....
In reply to हर्णै कट्टा..... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to हर्णै कट्टा..... by प्रभाकर पेठकर
सहमत प्रभाकरकाका
>>(सखाराम्_ग
In reply to >>(सखाराम्_ग by सखाराम_गटणे™
धन्यवाद..
रागावू नका ब्वॉ!
In reply to रागावू नका ब्वॉ! by अनंत छंदी
समृद्ध कोकण...
In reply to समृद्ध कोकण... by प्रभाकर पेठकर
वेगळा विषय
In reply to वेगळा विषय by सुनील
सहमत.
In reply to वेगळा विषय by सुनील
>>असो,
कोकणांत