साहित्य : पिवळी मूगडाळ एक कप, पिठीसाखर, साजूक तूप, जायफळ, वेलदोडा, मिक्सर व सपिटाची चाळणी.
कृती : जड बुडाच्या कढईमधे मुगाची डाळ मध्यम आचेवर कोरडी भाजावी. किंचित गुलाबी रंग आला की पुरे.
ताटात पसरून गार होऊ द्यावी. गार झाल्यावर मिक्सरमधे बारीक दळून घ्यावी. सपिटाच्या चाळणीने पीठ चाळून घ्यावे.
वर राहिलेला चाळ पुन्हा एकदा दळून घ्यावा आणि चाळून घ्यावा. हे चाळलेले पीठही किंचित रवाळ असावे.
आता गरम कढईत पीठ घालून परतायला सुरुवात करावी व एकीकडे लागेल तसे तूप घालत रहावे. ह्या लाडवांना बेसनाच्या
लाडवांइतके तूप लागत नाही तेव्हा बेताने घालावे. डाळ आधीच भाजून घेतल्याने आता लगेचच खमंग वास यायला सुरुवात होते
तेव्हा आच बंद करावी. पीठ ताटात पसरून ठेवावे. पीठ कोमट झाल्यावर त्यात जायफळ, वेलदोड्याची पूड व पिठीसाखर घालून
मिसळून घ्यावे. पीठ हाताला कोरडे वाटल्यास चमचाभर पातळ तूप वरून घालावे व बेताच्या आकाराचे लाडू बांधावेत.
एक कप डाळीचे बेताच्या आकाराचे दहा लाडू होतात.
हे लाडू पौष्टिक आहेत सहाजिकच ही पाककृती माझ्या आईची आहे ;).
[वरीलप्रमाणेच हिरव्या(सालासह) अख्ख्या मुगाचेही लाडू होतात.
हिरवे मूग जपून भाजावेत रंग बदलू देऊ नये, आच मध्यम ठेवावी, नाहीतर लाडू काळे होतात.]
रेवती
रेवती
वाचने
12159
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
मला वाटलं ..
In reply to धन्यवाद by सहज
खावेसे वाटत आहेत.
+१
In reply to खावेसे वाटत आहेत. by मीनल
सह्ही..
हम्म! पाकृ
आपला
In reply to हम्म! पाकृ by विसोबा खेचर
काही लाडू
नाही हो
In reply to काही लाडू by रामदास
देशस्थ
In reply to काही लाडू by रामदास
लाडवांचा फोटो मस्तच.
*
मस्त..
झकास
गूळ
गूळ घालून
In reply to गूळ by श्रावण मोडक
कडक!
एक राहिलंच!
भारतात
In reply to एक राहिलंच! by आपला अभिजित
पाकृ. नी
लै भारी!!
आपल्याला
In reply to लै भारी!! by शाल्मली
कधी खाल्ले नाहित
धन्यवाद!
छान लाडू
मुगाचे
वा..
शुभेच्छा!
फुटाण्याच
पुन्हा
डा़ळीचे पिठ
विकतचे मुगाचे पीठ अगदी बारीक
In reply to डा़ळीचे पिठ by समिधा
कसला killer फोटो आहे!!
हा हा! होय हा रेवती ब्रँड
In reply to कसला killer फोटो आहे!! by बहुगुणी
मस्त!
पुन्हा हा धागा वर आल्याने
फटू मस्त... रव्याचे लाडू