मराठी अमेरिकन्स ..
आजकाल भारताबाहेर राहुन , इतर देशाचे नागरिकत्व घेउन त्यांची भाट गिरी करित आणि भारतात रहाणाऱ्या लोकांना तसेच, इथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.
त्यातल्या त्यात, अमेरिकेची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या भारतियांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.
ह्या भारतिय नागरिक नसलेल्या , पण मराठी बोलणाऱ्या अमेरिकन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची भारताला गरज आहे कां?
इथल्या ज्या राजनैतिक नेत्यांची जे खिल्ली उडवतात, त्याच नेत्यांना हार्वर्ड ला लेक्चर द्यायला बोलवतात.
मिसळपाव