नमस्कार मित्रहो..
असं म्हणतात की, तहान लागली की, विहिर खोदण्यापेक्षा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी. छे! पण माझं इतकं कुठलं डोकं चालायला! आधी उल्हास त्यात फाल्गुन मास.. म्हणजे आधीच बर्न फूड स्पेश्शालिस्ट त्यात लेकाचा डबा.. काय करणार? करा इनोवेशन्स.
मी आणि माझी एक मैत्रीण .. दोघी नेहमीप्रमाणे आपापले रडगाणे गात होतो.. की, मुलांना डब्यात काय काय द्यायचं. माझ्या परीने मी माझा प्रश्न सोडवला होता. म्हणजे ५ दिवसांपैकी, २ दिवस तूप सारख पोळी चा रोल, २ दिवस पालक, मेथी, अशा भाज्या घातलेल्या पुर्या आणि एक दिवस ब्रेडचं सँडवीच. पण हा जळ्ळा इथला ब्रेड टोस्ट केल्याशिवाय खावासा वाटतच नाही.