Skip to main content

चिंचेची कढी

लेखक जागु यांनी बुधवार, 18/02/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : बुंदिच्या लाडवा एवढी चिंच कांदा, लसुण, मिरची, कोथिंबिर बारिक चिरुन फोडणिसाठी हिंग, हळद, जिर चविपुरते मिठ आणि गुळ कृती : चिंचेमध्ये १ ते १/२ किंवा गरजे एवढे पाणी टाकुन खुळुन घ्यावी. तेल गरम करुन त्यात हिंग, हळद आणि जिर्‍याची फोडणी द्यावी. आता फोडणिवर चिंचेचे पाणी टाकावे व वरुन चिरलेले कांदा, लसुण, मिरची, कोथिंबीर टाकावी नंतर चविपुरते मिठ व गुळ घलावे. फक्त वाफ येइपर्यंत गरम करावे. उकळी यायच्या आधी गॅस बंद करावा. झाली तुमची चिंचेची कढी तयार. सुचना : ह्या कढित जर आंबटपणा कमी आला असेल तर थोडे लिंब पिळावे. ही कढी नॉनव्हेज बरोबर पण छान लागते.

पहा विचार करुन

लेखक केळ्या यांनी बुधवार, 18/02/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्राच्या म्हणण्याप्रमाणे,"Computer is a Female Entity"आपण 'तो' Computer असे म्हणतो,त्यापेक्षा 'ती' Co mputer असे म्हटले पाहिजे. कधी कसा (कशी) वागेल ते सांगता येणार नाही! बघा पटते का.

मिसळपाववरील पहिले वर्ष

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 18/02/2009 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्षापूर्वी मी मिसळपावच्या हॉटेलात पहिले पाऊल ठेवले. ते कोण चालवत असे याची त्या वेळी मला कांही कल्पना नव्हती. पण आंत आल्या आल्या तात्यासाहेबांनी जुनी ओळख दाखवून मोठ्या अगत्याने "या, बसा." म्हणत माझ्याकडे खुर्ची सरकवली. आजूबाजूला बसलेल्या लोकांत कांही ओळखीचे चेहेरे आणि मुखवटे पाहून मला आपल्या माणसांत आल्यासारखे वाटले. काउंटरवर जाऊन मी थाळी भरून घेतली. जेवण तर मस्तच होते. तेंव्हापासून इकडे येत राहिलो. मधील काळात कधी मला तर कधी माझ्या संगणकाला विषाणूंची बाधा झाली, कधी मी परगांवी गेलो वगैरे कारणांमुळे अवकाशाशी जडलेले नाते राखता आले नाही.

तु म्हणजे....

लेखक बाप्पा यांनी बुधवार, 18/02/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
तु म्हणजे... तु म्हणजे... सकाळचं गवतावरलं दव सुंदर.. तु म्हणजे... खळाळत्या समुद्रातला नितळ कातळ.. तु म्हणजे... रणरणत्या वाळवंटातले थंडगार मरुस्थळ.. तु म्हणजे... देवासमोर लावलेला दिवा प्रांजळ.. ही कविता कॉलेज मधे असताना लिहिलेली आहे . प्रथमच सार्वजनीक रीत्या प्रकाशित...

आपण सगळे एकमेकासाठी शिक्षक आहोत.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 18/02/2009 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रो.देसायांच्या घरी आज आम्ही चर्चा करण्यासाठी जमलो होतो.चर्चेचा विषय होता "शिक्षक". भाऊसाहेबानी बर्‍याच विद्वानाना ह्या चर्चेसाठी बोलावलं होतं.नेहमी प्रमाणे काही लोक शिक्षक म्हणून आपला अनुभव सांगून गेले.काहीनी शिक्षक झाल्यामुळे आपल्या जीवनात काय काय समस्या आल्या त्याचे पाढे वाचले.काहीनी शिक्षक आणि मुलांमधल्या पारस्पारिक प्रभावाबद्दल मनोरंजक माहिती सांगितली.भाऊसाहेबानी आपले पण रुईया कॉलेजमधले गमतीदार अनुभव सांगितले. मात्र एका वयस्कर व्यक्तिने "शिक्षक" म्हणजे फक्त शाळेत किंवा कॉलेजमधे शिकवणारी व्यक्ति असं न मानता,मोठ्या दर्शनशास्त्राच्या दृष्टिने किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टिने चर्चा करून सगळ्या

सुरळीच्या वड्या.

लेखक समिधा यांनी बुधवार, 18/02/2009 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
शाल्मली आणी रामची आई यांच्या मसालेभात आणि जिलेबी बरोबरच पानाच्या डाव्या बाजुची शोभा वाढवायला कश्या वाटतील... साहित्य : डाळीचे पीठ १ वाटी ताक १ वाटी पाणी १ वाटी मीठ चविनुसार तिखट चविनुसार मैदा १ चमचा सारणा साठी साहित्य : ओल खोबर १ वाटी कोथिंबिर आवडीप्रमाणे मीठ चविनुसार

तो बेत कालचा मुळीच ठरला नव्हता

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 18/02/2009 01:47 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता

तो बेत कालचा  मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी पण पेला भरला नव्हता

मी घरी कशी जाण्याची  हिंमत केली?
मी  रस्ता घरचा कसा विसरला नव्हता

सर्व मिपाकरान्ना आवाहन.. क्रुपया मतदान करा..

लेखक आम्हि यांनी बुधवार, 18/02/2009 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा ही एक चळवळ आहे व ह्याच्या माध्यमातून अनेक लोक अनेक अभ्यासपूर्ण विशयान्ची मांड्णी व प्रबोधनाचा प्रयत्न आपल्या बहारदार लेखणीतून करत असतात. अनेक लेख वाचून तर सदस्यांच्या बुद्धिमत्तेचे आशर्य वाटते हेवा देखील वाट्तो. मी एवढा सरस लेखक नेसलो तरी ह्या चळवळीचाच एक भाग म्हणून हा धागा सुरु करून खालील मुद्दे मांडत आहे. ह्या माध्यमातून तरुण मतदरांमध्ये काही जाग्रुती /माहिती पुरवण्याचा धागा सुरु करतोय. एप्रिल - मे मध्ये लोकसभेच्या निवदणुका आहेत. ह्या निमित्तने सर्व मिकरान्ना विनम्र आवाहन करतो कि प्रत्येकाने न चुकता मतदान करावे . मतदान करतन्ना किमान खालील काही गोष्टिंची कळजी नक्की घ्यावी. १.

(आड गल्लीतल्या काही कविता)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 17/02/2009 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझं हल्ली असंच होतं, रामदास ह्यांचं काही लिखाण वाचलं की मी अस्वस्थ होतो. रामदास ह्यांच्या 'अडगळीतल्या काही कविता' ही त्याला अपवाद नाहीत. त्यांच्या कवितांवर 'वा!

"ती काही उमेद हारत नाही ".....समस्यापुर्ती अथवा काव्यस्पर्धा ...!!!

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 17/02/2009 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नुकताच "जागतीक प्रेमदिन उर्फ व्हॅलेंटाईन डे" मोठ्ठ्य जोशात पार पडला ( हे वाक्य माझ्याबद्दलच आहे असे काही नाही). बहुतेक सर्वांनी आपापल्या "प्रिय अथवा प्रियेला" शुभेच्छा देताना अथवा पटवताना अनेक काव्ये रचली असतील अथवा इंटरनेटवरुन ढापुन परस्पर तिच्यापर्यंत पोचवली असतील, ह्यात एक वेगळीच मज्जा असते नाही ? अश "प्रेमरसाने" ओथंबुन भरलेल्या कविता गाऊन दाखवण्याची तर वेगळीच नशा ...! असो. आपला आज "तो विषय" नाही ... सध्या आम्ही एका वेगळ्याच समस्येने त्रस्त आहोत.