लोकसभा निवडणुका: २००९. पश्चिम भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज
नमस्कार मंडळी,
माझ्या निवडणुक अंदाजाच्या पुढील भागात आता वळू या पश्चिम भारताकडे. (डिस्क्लेमरः हे अंदाज राजकिय परिस्थितीचे थोडेफार निरिक्षण करून मी बांधलेले अंदाज आहेत. ते किती बरोबर किंवा चुकीचे आहेत यासाठी १६ मे पर्यंत थांबावे लागेल)
१) गुजरात: (एकूण जागा: २६)
गुजरातमध्ये मार्च १९९८ पासून भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. ऑक्टोबर २००१ पर्यंत केशुभाई पटेल मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात भाजपाची नाव बुडती झाल्यावर पक्षाने संघप्रचारक नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवले.
मिसळपाव