Skip to main content

तुझ्या दु:खाविना

लेखक शिवापा यांनी बुधवार, 18/03/2009 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
अजुन किती वेळ जाईल? तुझी आठवण कुठपर्यंत राहिल? तु गेलायेस पण आठवण छळतेय तुझ्या सांवल्यात मी अजुन चालतेय कुठलाच विचार येत नाहि तुझ्या दु:खाविना अवचित वाजलेला फोन काळजाचे ठोके चुकवतो गर्दीतला प्रत्येक चेहरा तुझाच भासतो प्रत्येक रात्री वाट पहात रहाते झोपेची झोपही येत नाहि तुझ्या दु:खाविना जाग आल्यावर हात तुझ्या स्पर्शासाठी आसुसतो तु नसल्याची आठवण झाल्यावर एकदम बावरतो कधितरी थांबेलच हे सर्व दु:खांचे हेहि संपेल पर्व आयुष्याच्या पटलावर पुढे सरकतांना आठवणीची सारी भुते जळतांना हसणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि अवेळी अश्रुही तरळणार नाहि तुझी आठवण तेव्हांहि येईल पण तुझ्या दु:खाविना

शास्त्रीय प्रयोग - मदत हवी

लेखक वेलदोडा यांनी मंगळवार, 17/03/2009 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, खालील शास्त्रीय प्रयोग करण्यास मदत हवी आहे. शेवटच्या क्षणी बहीणीच्या मुलाने विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याचे ठरवले. भाच्याला प्रयोग करण्याकरीता काही उमेदवार मिळाले. पण तरीही संख्या खूप कमी आहे. (जेमतेम १०-१२) . जर मिपाकरांनी खालील प्रमाणे चाचण्या घेऊन आपली निरिक्षणे नोंदवली तर प्रयोगासाठी खूप मदत होईल. प्रयोग - खाली दिलेल्या चित्रातील रंग ओळखून प्रत्येक चाचणी देण्यासाठी किती वेळ लागतो , चाचणी देणार्‍याचे वय आणि स्त्री कि पुरूष हे नमूद करायचे आहे. शब्दांचा फक्त रंग ओळखायचा आहे. शब्द वाचायचे नाहीत. रंग मोठ्याने म्हणायचे.

आनंद यादवांचा राजीनामा...

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 17/03/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
'कलेचे कातडे' पांघरुन सुद्धा 'संतसूर्या'ने चटका दिला 'माउली'शीच घेता 'झोंबी' वारकर्‍यांनी झटका दिला.

देवाघरची फुले

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 17/03/2009 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुले ही देवाघरची फुले असतात असे म्हंटले जाते आणी ते खरे आहे. निरागस लहान बालके घरात असतात तेव्हा जग विसरुन त्यांच्यात रमण्यात जो आनंद असतो त्याची उपमा दुसर्‍या कशालाही देता येणार नाही. जेव्हा ती आपल्या बोबड्या वाणीने कुतुहल भरलेले प्रश्न विचारतात तेव्हा किती सुंदर वाटतात आणी त्यांच्याशी त्याच वाणीत बोलायला किती छान वाटतं, सगळी दु:ख कशी दुर पळुन जातात. झोपेत जेव्हा खुद्कन हसतात तेव्हा अगदी गोड वाटतात, म्हणे सटवाई आणी जोखाई त्याना हसवितात असे ऐकले आहे. आईवडिलाचे तर उगाचच डोळे भरुन येतात कधी कधी आपल्या पिलांना पाहुन.

आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 17/03/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
आई-बापच लेकरु पंख फुट्ल पाखरु दूर उडुनिया गेल संगे काळीजही नेल बाळ होता इवलासा केला जीवाचा हिंदोळा पापणीच्या पंखावर त्यांनी बाळाला ठेवला त्याची गरुडाची झेप जग कवेमध्ये आल कसा विसरला बाळा बळ पंखाना दिलेल घार हिंड्ते आकाशी लक्ष्य तिचे पिलापाशी पिलु उड्ता आकाशी घार एकटी घराशी दिसु लागे पैलतीर पिलु दुरच्या आकाशी वाट पाहते नजर घोर लागला जीवासी कारे उमजेना बाळा वेडी माया माउलीची पिलु तुलाही होउदे ओढ कळेल आईची हाती नक्षत्र धराव मागे परत फिराव माउलीच्या चोचीतल दांण प्रेमाने टिपाव
Taxonomy upgrade extras

माझ्या <strong>डॅन्स</strong> बार चा

लेखक sanjubaba यांनी मंगळवार, 17/03/2009 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या डॅन्स बार चा कसा होता सांगू थाट..... झगमगत्या रस्त्यातून एक आळसावलेलि पाउलवाट....... स्वागताला असायच्या उभ्या ' डॉली' आणि 'लव्ली'...... मला तर दोघी पैकी एकही नाही 'पावली'........ या धुन्द बागीच्याचा आम्हा दिलजल्याना आसरा....... थोडी आत गेली की सारे दु:ख विसरा....... समोर उभ्या ललनेचे खरच आपल्यावर असते का 'मन'....... वासनेची भागविण्या तहान तिला शिवती किती जण.......... कानात घुमायचा नाद त्या छम छम पैजणाचा........ का भ्रम होता तो वेड्या मुजोर सुखाचा..........? टांगलेला हा जीव मग धरायचा घरा कडची वाट.......... किती करावे माफ इतरानी जरी चुका सतराशे साठ.......... व्याकुळ
Taxonomy upgrade extras

दररोजच्या भाजीच्या कटकटीपासून मुक्ती

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 17/03/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील ग्रूहीणी होणे म्हणजे फार कठीण आहे. त्यातल्या त्यात नोकरी करणारी स्री म्हणजे तारेवरची कसरतच. दररोज घर आवरणे, लहान मुलांचे करणे, घरातल्यांची मर्जी सांभाळणे ह्या फार अवघड गोष्टी आहेत. त्यात भर म्हणजे दररोज जेवणात / डब्यात काय भाजी करावी ही कटकट. या भाजीच्या काळजीवर मी माझ्या परीने (वतीने) मी खालील उपाय सांगत आहे. एक पदार्थांची यादी बनवायची. (मेनु कार्ड नव्हे.) त्यात सगळ्या भाज्या / न्याहारीचे पदार्थ / बनवण्याच्या पध्दतीनुसार वर्गीकरण (नुसत्या भाताचे १५० च्या वर प्रकार आहेत.) यानुसार एक यादी बनवायची.

पुलावरचा न्हावी

लेखक विसुनाना यांनी मंगळवार, 17/03/2009 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमनाचे तेलः माझी बायको ऑईल, वॉटर आणि पोस्टरकलर अशा माध्यमात चित्रे काढत असते. तिची काही चित्रे इथे तुम्ही पाहिली होतीच. इतकी वर्षे तिची चित्रकारी पाहता-पाहता मलाही रंगांशी खेळायची हुक्की आली. आमच्या गावात एक आर्किटेक्ट/लेखक/कवि/नाट्यकर्मी कलाकार आहेत - प्रकाश धर्मा म्हणून. अत्यंत हरहुन्नरी माणूस. स्वतः उत्कृष्ट चित्रकार. त्यांनी एक प्रयोग म्हणून नवशिक्या, अर्धशिक्षित आणि अनुभवी चित्रकारांना वॉटरकलर चित्रकला शिकवायला सुरुवात केली.

जननि कर्मभूमिश्च....

लेखक सुनील यांनी मंगळवार, 17/03/2009 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
आई आणि मातृभुमी ह्या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत, अशा अर्थाचे सुवचन आपल्याला ठाऊक आहेच. पण मनात एक विचार येतो, जगात असेही काही लोक नक्कीच होऊन गेले असतील की ज्यांनी आपले तन आणि मन स्वतःच्या जन्मभुमीपेक्षाही वेगळ्या अशा कर्मभुमीसाठी वेचले असेल. हरगोविंद खुरानांपासून ते स्वाती दांडेकरांपर्यंत आणि मनमोहन सिंग-अडवाणींपासून ते मुशर्रफ यांच्यापर्यंत अनेक नावे डोळ्यापुढे तरळून गेली. अशी भारंभार नावे जमा होऊ लागली तेव्हा काही चाळण्या लावून नावे गाळून घ्यायची, असे ठरवले. एकूण तीन निकष लावले - १) सदर व्यक्तीने आपल्या कर्मभुमीसाठी काही तरी भरीव, ठाशीव असे योगदान दिलेले असावे.