काल नविन सिनेमा पाहिला.. 'The Day the Earth Stood Still' . बेकार होता तसा पण त्यातले एक वाक्य होत , परग्रहावरुन आलेला एलियन माणसाला ( अर्थातच हिरॉईनला ) म्हणतो , ' its not your planet, i didnt came to destroy this planet , i came to save it ..from you.. because you human never change '.
थोडा विचार केला तर पटतं हे. या सुदंर पृथ्वी वर आपला काय हक्क ? अफाट पसरलेल्या विश्वाकडे नजर टाकली की जाणवत आपण किती शुल्लक आहोत ते. अगदी निसर्ग साध्या पाउसाच्या रुपाने रागवला तर हतबल होउन जातो. पण तरी बदलत नाही , अंगातला ज्ञानाचा माज कायम आहे. स्वता:च्या सुखा साठी लुटणे सुरुच आहे आणि रोज वाढतंच आहे.
निसर्गाने.....
धरती दिली राहयला.... आपण काल्पनीक रेघा मारुन. हा माझा देश.. हा तुझा , हे माझे राज्य .. हे तुझे , हि माझी मुंबई.. हा तुझा बिहार...
पाणी दिले.... आपण त्याला शीवायचे नियम बनवले . स्वताचं ठरवलेल्या जातीच्या आधारे... जणू काही आपल्या बापाचं आहे पाणी.
झुळझुळणारी नदी दिली ... . आपण तिला अडवुन स्वता:च्या घरात उजेड पाडला..
वाघासारखा उमदा प्राणी .... आपली शोभा वाढवायला आपण त्याची कातडी सोलली , तेही भ्याडांसारख त्याला फसवुन पिंजरयात पकडून.
घनदाट जंगल निर्माण केले.... आपण ते रोज तोडून कमी करतो आहोत.. अनेक कारणं देउन...
युरेनियम सारखा धातु दिला... आपण त्याचे bomb करुन एकमेकांच्या जीवावर उठलो.
....... यादी खरंच न संपणारी आहे.....
उद्या जर खरच सृष्टिकर्त्ता ( हवंतर देव म्हणा ) जर समोर आला आणी म्हणाला... " अरे हे सगंळ मी तयार केले आहे, तुला देखील ... तुला थोडं जास्त डोकं दिले ते या माझ्या निर्माणाची काळजी घेण्याकरता. पण तू तर याचा नाश करतो आहेस. आता तुझे अस्तित्व संपवून मी पुन्हां हि सृष्टि बाकिच्या सर्वांसाठी निर्भय , निर्धोक का करु नये. ?? " .
आपल्या बाजूचा एक तरी मुद्दा आहे का ?????
वाचन संख्या
2339
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
परत एकदा सृष्टी बहरु शकते.
या
In reply to परत एकदा सृष्टी बहरु शकते. by कलंत्री
वस्तुस्थिती काय म्हणते?
In reply to या by शंकरराव
ह्म्म
In reply to वस्तुस्थिती काय म्हणते? by कलंत्री
दोन्ही
लेख चांगला