Skip to main content

खंत

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/03/2009 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
बोलली नाहीस कधी न सांगताच पण काही मज उमजली होती सखे तगमग अलवार तूझी मिटल्यास पापण्या तू पण रुद्ध डोळ्यांमधली मज जाणवली होती आतुरता व्याकुळ तूझी मिटलेल्या ओष्ठकळ्या कबुलणार नाहीस तू सखे ओळखली होती मुग्ध हळवी प्रीत तूझी वृंदावन डोळ्यांमधले तू गं राधा कृष्णमयी गोकुळात विरघली होती मुक नि:शब्द वेदना तूझी विषप्याला अमृत झाला श्यामखुळी तू वेडी मीरा कृष्णात मिसळली होती स्निग्ध शांत चेतना तूझी मज कळली नाही कशी खुण आपल्या नात्याची सखे मीच हरवली होती धुंद ओढाळ मुरली माझी विशाल

प्रादेशिक पक्षांचे पीक आवरण्यासाठी

लेखक भोचक यांनी मंगळवार, 24/03/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
देशात गेल्या काही वर्षांत प्रादेशिक पक्षांचे वाढते वर्चस्व राष्ट्रीय पातळीवर फार अडचणीचे ठरत आहे. लोकसभेसारख्या राष्ट्रीय निवडणुकीत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरून हे पक्ष राष्ट्रीय पक्षांवर मात करून लोकसभेत पोहोचत आहेत. बरे लोकसभेत येऊनही ही मंडळी ज्या मुद्यांवर निवडून आली, ते सोडवितात असेही नाही. पण ते मुद्दे उपस्थित करून हंगामा करण्याचे काम मात्र करतात. (याचा अर्थ ते मुद्दे महत्त्वाचे नसतात, असे नाही.) ५४३ सदस्यांच्या आपल्या लोकसभेत बहूमताचा जादुई आकडा गाठण्याच्या नादात या पक्ष्यांना भलतेच महत्त्व येऊन घोडेबाजार तेजीत येतो. मग एक दोन खासदार असलेल्या पक्षांनाही 'भाव' येतो.

तर या देशात कायदा आणि सुव्यव्स्तेची हामी कोणी द्यायाही

लेखक राहुल सरकार यांनी मंगळवार, 24/03/2009 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
IPL ला सुरक्षा देण्याचा विषय सध्या गाजतोय काहिच्या मते हे राजकारण आहे पण देशामधे सरकार सुरक्षेची हमी देत नाही हे गंभीर बाब आहे. election म्हणजे काय युद्ध नव्हे. १) युधाची परिस्तिती अतिरेक्यानी निर्माण केली आहे अशी कबुलीच सरकार ने दिली नाही काय? २) केंद्र सरकार आणी राज्य सरकार सुरक्षेची हमी द्यायला तयार नाहीत तर कायदा आणि सुरक्षेची हमी कोणी द्यायची? ३) खर सांगायची तर अशी सुरक्षा मागायची व द्यायची वेळ येते यातच कायदा व्यवस्था मोद्लीये असे नाही वाटत काय ?

महाजालासाठी नवीन कायदे

लेखक दशानन यांनी मंगळवार, 24/03/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
महाजालासाठी काही नवीन नियम तयार करण्यात आले आहेत व त्यानूसार आता कायद्यात बदल केला गेला आहे. नकली आयडी तयार करणे, दुस-याच्या नावाने प्रोफाईल / इ मेल आयडी तयार करणे, दुस-याच्या नेटवर्कचा गैरवापर करणे, संगणकामध्ये जाणून बुजून विषाणू पाठवणे, माहीती चोरी करणे व इतर प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आता सूचना-प्रौद्योगिकी कानून (आईटी एक्ट) मध्ये संशोधन करुन तीन ते आजिवन कारावास पर्यंतची शिक्षा ठोठवण्याची तरतुद केली गेली आहे. संशोधन केलेले कायदे खालील प्रमाणे : ऍक्ट - 66 सी अपराध - दुस-याचा पासर्वड चोरी करणे / त्याच्या परवानगी शिवाय वापर करणे, डीजिटल हस्ताक्षर व फिंगर प्रिंन्टचा गैर वापर करणे.

संभा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/03/2009 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
"संभा...या दोन पेपर्सच्या झेरॉक्स आणुन दे बाबा.....!" संभा..ही फाईल अकाउंट्मध्ये नेवुन दे रे..............! संभा......काल बाईंडिंगसाठी दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आणलास का परत.........! संभाजी.....अरे, त्या एसी सर्व्हिसींगवाल्याला फोन करायला सांगितला होता तुला, तो अजुन उलथला नाही...! संभा....दोन चहा...............! संभा......तो कालचा ड्राफ्ट चेक केलास....प्रत्येक गोष्ट किती वेळा सांगायची रे तुला...? संभा.............? हे रोजचंच होतं तेव्हा, हि वाक्ये कानावर आल्याशिवाय आमचा दिवसच मुळी जात नसे. आणि स्वतः संभालाही त्याशिवाय ऑफीसला आल्यासारखं वाटत नसेल.

माझे महान प्रयोग - २

लेखक दशानन यांनी मंगळवार, 24/03/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझे महान प्रयोग - १ मागील भाग. सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा. सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण. चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला ! माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध !

जाईची कळी

लेखक जागु यांनी मंगळवार, 24/03/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जाईची कळी सायंकाळी उमलली रात्र सुगंधी करण्या काळोखी जागली वार्‍यांच्या मंद झुळकेने लाजली दवबिंदुंच्या स्पर्शाने शहारली चंद्रप्रकाशी पुलकीत झाली रातराणी सखी जाहली पक्षांच्या भुपाळी त डोलली केशरी किरणांच्या कुशीत शिरली अलगद परडीच्या कडेवरून धन्य झाली इश्वरचरणी अर्पुन.
Taxonomy upgrade extras

अर्थ

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 24/03/2009 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला साधे मराठी येते. मी लेखक आहे असा गैरसमज कधीच करुन घेतला नाही. माझी मिपाकरांना नम्र विनंती आहे की मला खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. दोन दिवसापासुन डोक्याचा फार आणि पार खुळखुळा झालेला आहे. बर्‍याच जणाना विचारला पण नीटसे काय कळाले नाही. लिखाळ, व मुक्तसुनित ह्यानी अर्थ सांगितला. पण माझ्या डोक्यावरुन गेला. बहुधा तो अर्थ समजण्या इतके पुण्य कर्म मी आदल्या दिवशी केलेले नव्हते. दोष माझा. "आम्ही लेखन शुचीता संभाळतो." ह्या वाक्याचा अर्थ काय? म्हणजे नेमके काय करतात. हे वाक्य एका मराठी संस्थळाच्या संपादकाने उच्चारलेले आहे. वैधानिक इशारा: मला सर्व मराठीसाठी झट्णार्‍या संस्थळाबद्दल आदर आहे.

सकाळ - फार्म हाऊस, गुडगांव

लेखक दशानन यांनी मंगळवार, 24/03/2009 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे जरा लवकरच उठलो व जवळच असलेल्या मित्राच्या मामांच्या फार्म हाऊस वर आलो, व थोडे जॉगिंग होईल व ताजे हवा पाणी मिळेल हा उद्देश, तर तेथे रुम वर कॅमेरा ठेवलेला दिसला व सुर्य देव उगवायच्या तयारीत होते तेव्हा आकाशामध्ये मेघांनी वेग वेगळे डिझाइन्स तयार केले होते त्यांचे खेचलेले फोटो ! कॅमेरामधील ओ कि ठो कळत नाही फक्त बटन दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे.. जे आहे ते गोड मानून घ्या...