Skip to main content

निरोप

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/03/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आज मोगरीने डाव साधला सुन्न ओझे आठवांचे घाव घातला.. सुटे भान दिशाहिन आज जाहलो सापडेना मार्ग माझा चांद मातला.. हरवले माझे पण तुला पाहता आसवांनी दोर माझा आज कापला.. संपले ते स्वप्न सारे सत्य जाणता भुतकाळ रम्य सारा आज बाटला.. हंसलीस खिन्न सखे ओठ दाबुनी आसवांना लपविता भाव दाटला.. एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..! विशाल

पाकडे साले ..

लेखक बामनाचं पोर यांनी गुरुवार, 26/03/2009 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
हा दुवा पहा... http://www.youtube.com/watch?v=eJnM6eKT3OI ... तळपायाची मस्तकात जाते... २००८ या एका वर्षात ६० पेक्षा जास्त स्फोट झाले.. दिल्ली , मुंबई , जयपुर , वारणसी , हैद्राबाद , अहमदाबाद , बेंगलोर एक शहर बाकी नाही सोडले.. कसाबने उरली-सुरली लक्तरे वेशीवर टांगली...सकाळी जसे बाहेर पडू तसेच संध्याकाळी घरी परत येऊ अशी खात्रि नाही देता येत आता ... आपले तरुण तुर्क नेते अजून कशाची वाट बघतायत कोण जाणे... सगळे मंत्री-संत्री प्रत्यक्ष्-अप्रत्यक्ष नाव न घेता दम देण्यात मग्न आहेत..

प्रवेश द्वार

लेखक दशानन यांनी गुरुवार, 26/03/2009 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
स्थान : रहेजा मॉल, ऑफिसच्या बाहेरील गॅलरीतून काढलेला फोटो. कॅमेरा : सोनी सायबर शॉट अन्य : शटर स्पीड, लेन्स, झुम, सेटिंग, आयएसओ बद्दल काही ही माहीत नाही, फक्त बटण दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे. कलाकुसर : फोटो निळ्यारंगातच आला आहे का माहीत नाही, त्याला वाकडा करुन, फेम चढवली आहे व थोडी रंगसंगती व्यवस्थीत केली आहे, पिकनिक वापरुन.

(आज तुझा वाढदिवस )

लेखक दशानन यांनी गुरुवार, 26/03/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
निखिल देशपांडे ह्यांची ही कथा वाचल्यावर असेच मनात आले जर निखिल च्या जागी मी असतो तर कशी लिहली असती ही कथा, निखिल देशपांडे ह्यांची परवानगी घेऊन मी ही त्याची कथा परत लिहीली आहे माझ्या शब्दात. _________________________________________________ आज तिचा वाढदिवस......... काल सकाळी उठुन ऑफिसला पोहचायचे होते, पण सोमवार रात्री घेतलेल्या एक्स्ट्रा पॅग मुळे उठण्यासाठीच उशीर झाला

*सहल*

लेखक बाकरवडी यांनी गुरुवार, 26/03/2009 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
सहल :- नेहमी मिपा कट्टे केले जातात, सर्व जण आनंदाने त्यात सहभागी होतात. पण त्यापेक्षा वेगळे काहीतरी म्हणून ह्यावेळी मिपाकरांची सहल काढूया का? एक दिवसाची सहल. तुम्हाला काय वाटते ? कोण कोण येणार ? आणि कुठे जायचे ते ठिकाणही सुचवा. मज्जा करूयात.चला तर मग.

गुढीपाडव्याच्या हार्दीक शुभेच्छा !

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 26/03/2009 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय दोस्त लोक आणि परिवार , "सप्रे"म नमस्कार विनंती विशेष ! उद्या बहुतेक सर्वांना सुट्टी असेल म्हणून आजच आगाऊ शुभेच्छा ! आपणा सर्वांना हे शालिवाहन शके १९३१ चे नूतन वर्ष सुख समृध्दी , आरोग्य आणि भरभराटीचे जावो ! सोबतच्या शुभेच्छा पत्रामधे शालिवाहन शके १९२८ आहे ते १९३१ असे वाचावे कारण वेळेअभावी यावर्षी काही नवीन लिहू शकलो नाहि ! गैरसोयीबध्दल क्षमस्व ! आपला विनम्र , उदय गंगाधर सप्रे,ठाणे.

समस्यांची जंत्री

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 26/03/2009 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुका जवळ आल्या आहेत. भाषणबाजी सुरु झालेली आहे. आपल्या देशापुढील प्रश्नांची चर्चा जाहीरपणे सुरु आहे. पण नेत्यांना वाटणारे प्रश्न व माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटणारे प्रश्न यांत फरक असु शकतो. तर अशा संभाव्य प्रश्नांची एक जंत्रीच करायचे ठरवले तर एक मोठी यादी तयार होईल. आपणही त्यात भर घालू शकता. या प्रश्नांवर विस्तृत चर्चा व्हावी ही अपेक्षा आहे. देशाबाहेरील समस्या: १. काश्मीर मधे कधीही न संपणारे अतिरेक्यांबरोबरचे युध्द. २. पाकिस्तान कडून सतत होणार्‍या भारतविरोधी कारवाया ३. चीनने गिळलेला आपला प्रदेश आणि उत्तर-पूर्व राज्यांवरचा त्यांचा डोळा ४.

एक डाव भुताचा.....(?)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/03/2009 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी एकदाची वेड्यांच्या इस्पितळाची गाडी वाड्याच्या दारापर्यंत येवुन पोचली. पांढर्‍या गणवेशातील चार सेवकांनी कुशाक्कांना पकडुन गाडीत घातले आणि भर्रकन गाडी निघुनही गेली. सगळं कसं अगदी अचानकच घडलं,... नाही ? म्हणजे बघा, साधारण दोन - अडीच महिन्यापुर्वी त्यांच्या सुनेचा, रंगुचा अपघाती मृत्यु झाला. तिचा नवरा, लंगडा राम्या त्यानंतर महिन्याभरातच कुठेतरी बेपत्ता झाला, मग महिन्याभराने त्याचं प्रेतच सापडलं. त्या धक्क्याने कुशाक्काला वेड लागलं. शेवटी आम्हीच इथल्या वेड्याच्या इस्पितळात तिच्याबद्दल माहिती दिली आणि काल तर ते लोक येवुन घेवुनही गेले कुशाक्काला.