Skip to main content

सारे काही पहिले

लेखक जागु यांनी बुधवार, 08/04/2009 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातील काही पहिले क्षण सुखद अनुभवाचे सारे धन बाळाचं पहिल पाऊल मोठेपणाची लागलेली चाहूल आयुष्यातील पहिला पाऊस कागदी होडीची केलेली हौस कडाडलेली पहिली विज आईच्या मिठीला बिलगलेले काळीज पहिला दिवस शाळेचा गंध दरवळणार्‍या कोर्‍या पुस्तकांचा घडलेली पहीली मैत्री घरापलीकडील ती दृढ नाती झालेल पहिल दु:ख रडून रडून मिळालेल सुख प्रेम पहिल जुळलेल मन कुठेतरी हरवलेल प्रेमाचा पहिला स्पर्श भावनांशी भिडलेला संघर्ष सारे काही सुखद पहिले फक्त आठवणीत राहणारे पुन्हा परत न येणारे.
Taxonomy upgrade extras

सर्व देशाला जेवणाचं निमंत्रण.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 08/04/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
"तिला सहनशीलता म्हणा,किंवा सहिष्णुता म्हणा,ती अंगात असली की दुसर्‍याला सन्मान द्दायला पुढाकार घेतला जातो आणि सरतेशेवटी स्नेह निर्माण होतो.एखाद्दाची खरीच पूर्ण ओळख होणं जरा कठीण आहे पण त्याच्याशी स्नेह करून राहायला किंवा त्याचा स्वीकार करायला हरकत येत नाही" नेहमी प्रमाणे काल माझी आणि प्रो.देसायांची तळ्यावर भेट झाली.भाऊसाहेबांबरोबर एक गृहस्थ होते.माझी ओळख करत देत भाऊसाहेब म्हणाले, "हे शुभ्रतो चक्रबोरती.आमच्या कॉलनीत राहायला आले आहेत.आमच्या कॉलनीत जवळ जवळ बारा बिल्डिंग्स असून देशातले निरनीराळ्या प्रांतातून आलेले लोक राहतात. शुभ्रतो मुंबईत आल्याआल्या प्रथम वसईला राहिले.नंतर ते गोरेगाव इस्टला बर

आमची पण समाजसेवा ..... (?)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 08/04/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
"अयाई गं......आयला सॉलीड दुखतंय बे विशल्या....." विन्याचं कण्हणं वाढतच होतं. "गप बे भ**, आम्ही काय फुलं झेलली नाहित!" इति अस्मादिक. "आयला, विशल्या, या पोलिसांना काही दयामाया नसती का बे ? असं लहान लहान पोरांवर लाठ्या चालवायला काहिच कसं वाटत नाही बे?"........सुध्या. (हा लहान मुलगा गेली दोन वर्षे एस. वाय. बी. एस. सी.

कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका! :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 08/04/2009 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेले अनेक दिवस अक्षरश: प्रचंड बिझी होतो/अजूनही आहे. मिपावर आजकाल फिरकायलाही वेळ नसतो. इतका, की मीच आता मिपाकरता पारखा झालो आहे. आज सहजच जरा टाईम भेटला म्हणून हे दोन ओळींचं प्रकटन! :) राम राम मिपाकरहो, आमच्या खरडवहीत डोकावले असता 'मिपाच्या मालकीणबाई बदलल्या की काय?!' अशी शंका, कुशंका सध्या बर्‍याच मिपाकरांना हैराण करते आहे. तरी या प्रकटनाद्वारे आम्ही असे जाहीर करू इच्छितो की तूर्तास तरी मिपाच्या मालकीणबाई अनुष्काच आहेत. आमच्या खरडवहीतील स्त्री ही केवळ आमची एक मैत्रीण आहे!

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 08/04/2009 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा.

मिपाच्यावरी पंगती रंगलेल्या...

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 08/04/2009 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पिवळा डांबिस यांची पंगत -२ मिपाच्यावरी पंगती रंगलेल्या... यलोनॉटि हा काढतो खूप खोड्या... मिपाकर असे वाचुनि तृप्त झाले... प्रतिसाद त्या देवुनि बोळविले... (पंगतीत गप्प केलेला) केशवसुमार

राजकारणी आणि गुन्हेगार यांची अभद्र युती

लेखक हरकाम्या यांनी मंगळवार, 07/04/2009 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर मिपावर चर्चा झालीकी नाही हे मला माहिती नाही . पण सध्या सगळेच पक्ष निवडुन येण्याची क्षमता या गोंडस नावाखाली समाजातील गुन्हेगार घटकांना आपल्या पक्षाचे तिकिट देताना दिसतात. संजय दत्त सारखा प्राणी तर निवडणूक लढवण्याची परवानगी मिळण्यासाठि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतो. अमरसिंहासारखे नेते त्याच्यामागे शेपटाप्रमाणे धावत असतात.

बूटरुपी मिसाइल.

लेखक हरकाम्या यांनी मंगळवार, 07/04/2009 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक बुटाचे काम हे मानवाच्या पावलांचे धूळ, काटे,रस्त्यातील खाचखळगे, व अन्य तत्सम पदार्थ यापासून संरक्षण करणे असेच वाटत होते. याच बूटाने " डोक्यात बुट निघणे " यासारखे वाक्प्रचार दिले. पण या बुटाला सध्या काय झाले आहे समजत नाही. सध्या हा मानवनिर्मित प्राणी सध्या मान्यवर लोकांच्या अंगावर धावून जाताना दिसतो. याला सध्या काय झाले आहे ते समजत नाही.

मनश्री

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 07/04/2009 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
अरुण शेवतेंचं 'हाती ज्यांच्या शून्य होते' वाचलं तेव्हाच 'मनश्री'शी ओळख झाली आणि तिला अधिकाधिक जाणून घ्यायची इच्छाही.. कारण तिच्या हातात फक्त शून्यच नाही तर अंधारभरलं शून्य होतं पण त्या अंधारालाही उजळायला लावेल अशी तिची जिद्दकथा.. तिची,तिच्या आईची आणि सार्‍या कुटुंबाची! मनश्री जन्मली तिच मुळी डोळ्यात अंधार घेऊन,तिला जन्मत: बुब्बुळच नव्हती आणि त्यात भर म्हणून की काय फाटक्या ओठाची भर, मेंदूची वाढ,मणक्यांची क्षमता, मुकेबहिरेपणा .. अजून कायकाय तिच्यापुढे वाढून ठेवलं होतं ते समजलं नव्हतं. उदय आणि अनिता सोमण ह्या मध्यमवर्गीय दांपत्याचे हे लेकरु देवाचं उलट दान घेऊन जन्मलं.

सारेगमप - महाराष्ट्राचा आवाज

लेखक शुभान्कर यांनी मंगळवार, 07/04/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा सारेगमप सुरु झाले आहे. So called प्रोफेशनल गायक गात आहेत. मला व्यक्तिशः कुणाचेच गाणे सफाईदार वाटत नाही. खूप चांगल्या हौशी गायकांसारखे किंवा थोडे अधिक बरे/वाईट. तुम्हाला काय वाटते?