स्वप्न
अशी काजळली रात
चंद्र ढगात लपला
जीवनाचा सारा प्रकाश
प्रिये कोठे ग लोपला
कसे विझले अकाश
नाही चांदनी पेटत
झोप गेली दुर देशी
नाही पापनी मिटत
अशी एकटीचा वाट
का केंव्हाची सरेना
लाख जपल्या जखमा
त्याला काळीज पुरेना
झाला श्रावण पाहुणा
अता ग्रीष्मात जगणे
खडे फेकत नदीत
गोल तरंग बघणे
झाले ओसाड जीवन
वांझ मनाचीया आशा
गांव मोडला स्वप्नांचा
फक्त ऊरला नकाशा
मिसळपाव
स्पर्धेचे नियम -
१) सदर स्पर्धा फोटो डकवल्यापासून किमान ७२ तास ते कमाल १२० तासांपर्यंत खुली राहील.
२) स्पर्धेची वेळ संपल्यावरच निकाल जाहीर करण्यात येईल.
३) स्पर्धेतील प्रथम विजेत्याचे नाव आमच्या खरडवहीत ठळक अक्षरात लिहिण्यात येईल!!
(अगदीच आग्रह झाला तर ठाण्याच्या मामलेदारची मिसळ खिलवू देण्याबद्दल विचार करण्यात येईल!!)
४) अन्य विजेत्यांची नावेदेखिल आमच्या खरडवहीत (ठळक नसली तरी) लिहिण्यात
स्थळ - घरचा बगिचा
दिनांक - ७. ८ आणि ९ एप्रिल, २००९
कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!