वास्तविक बुटाचे काम हे मानवाच्या पावलांचे धूळ, काटे,रस्त्यातील खाचखळगे, व अन्य तत्सम पदार्थ यापासून संरक्षण
करणे असेच वाटत होते. याच बूटाने " डोक्यात बुट निघणे " यासारखे वाक्प्रचार दिले.
पण या बुटाला सध्या काय झाले आहे समजत नाही. सध्या हा मानवनिर्मित प्राणी सध्या मान्यवर लोकांच्या अंगावर
धावून जाताना दिसतो. याला सध्या काय झाले आहे ते समजत नाही. मानवाचे रक्षण करण्याऐवजी हा एखाद्या मिसाइलसारखा मानवावर हल्ला करताना दिसतो.
हे सर्व " बूट पुराण " लिहिण्याचे कारण असे की, संध्याकाळी कामावरुन घरी आल्यावर
सहज बातम्या बघितल्या तर काय एका पत्रकाराने आपले श्री . चिदंबरम यांच्यावर बूट फेकुन मारला.
याच्याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष श्री बुश यांनाही बुटाचा प्रतिसाद मिळाला होता. तेही चिदंबरमसारखे थोड्क्यात बचावले. मला वाटते सध्या सर्व सामान्य लोकांचा आपल्या नेत्यावरचा राग व्यक्त करण्याचे काम या मानवनिर्मित प्राण्याने ( बुटाने ) स्वीकारलेले दिसते.
लोकांचा राग व्यक्त करण्याचा हा प्रकार काही नवीन नाही. पुर्वी लोक नेत्यांच्या सभेत चपला फेकुन आपला राग व्यक्त
करत असत.
पण सध्या हे काम बुटाला करावे लागते. तुम्हाला हा प्रकार आवडला का? अजुन कुठल्या नेत्यांवर बुटाने आक्रमण करावे
असे आपल्याला वाटते. का भारतातले सर्वच नेते जोड्याने ( बुटाने ) मारण्याच्या लायकीचे आहेत. क्रुपया प्रतिसाद द्या.
वाचने
1841
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आचार्य अत्रे उवाच
आचार्य अत्र्यांच्या चाहत्यांसाठी
In reply to आचार्य अत्रे उवाच by क्लिंटन
कदाचीत
In reply to आचार्य अत्र्यांच्या चाहत्यांसाठी by क्लिंटन
दादानु,कुठ
बुट