अंत... भाग-२
मागील भाग १
********************************
तीने हसून फोन कट केला, ह्याला कुठे घेऊन जाऊ हा विचार करत मी कधी रिंकीचा विचार करु लागलो कळालेच नाही, समोरुन ट्रकचा येणार प्रखर ज्योत माझ्या डोळ्यावर पडल्यावर मी अचानक ब्रेक मारले व गाडी एका बाजूला कलंडत आहे असे वाटले .... व गाडी कश्यावर तरी जोरात आदळली.....
स्टेरिंग व्हिलवर डोके जोरात आपटले व गाडी एक चक्कर घेउन बाजूच्या डिव्हाडरला धडकली...एअर बॅग एकदम फुलली व माझ्या तोंडासमोर आली..
मिसळपाव
