Skip to main content

रोज पुडिंग

लेखक मिंटी यांनी गुरुवार, 26/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
रोज पुडिंग अर्थात गुलकंद वापरुन केलेलं पुडिंग. ही मुळतः एक अमेरीकन डिश आहे. आयुर्वेदानुसार गुलकंद उन्हाळ्यात गर्मीपासुन होण्यार्‍या त्रासावर आणि ऍसिडीटीवर एक उत्तम आहे..... साहित्य : २ कप दुध ४ टेबलस्पून पाणी १ टेबलस्पून प्लेन जिलेटीन १ टेबलस्पून रुह अफ्झा किंवा डाबर रोज सिरप ( हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलु शकता ) २ टेबलस्पून गुलकंद ( हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलु शकता ) कृती : १. पाणी गरम करुन घ्यावे. एका कप मध्ये जिलेटीन पावडर घेऊन त्यावर गरम पाणी घालुन जिलेटीन पुर्णपणे विरघळेपर्यंत हलवुन घ्या. २. दुध उकळवुन घ्या आणि त्यात सगळं साहित्य घालुन व्यवस्थीत हलवुन घ्या. ३. हे मिश्रण सर्विंग बाऊल मधे काढुन घ्या. ४. हे मिश्रण साधारण एक तासासाठी फ्रिज मधे सेट करायला ठेवा. ५. सेट झाल्यावर गार सर्व करा.

वाचने 6869
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

छान ! नाव वाचल्यावर मला वाटलं मिंटी आता कसल्या पुड्या सोडायला लागली =))

In reply to by दशानन

उकळलो , शिजलो , करपलो ,,, तळलो ... कुकरलो ... मिंटे .. ह्या रैवारी अल्पोपाहाराला घरी येतोय .. २ बादल्या दुध ४ बादल्या पाणी १ बादली प्लेन जिलेटीन १ बादली रुह अफ्झा किंवा डाबर रोज सिरप २ टिंप गुलकंद ह्या गोष्टी तयार ठेवा - अल्पोपाहारी)टारू डाएटर

In reply to by प्राजु

णको णको ... इतकं जास्त खाल्लं तर पुण्हा बोलावणार णाही ती मला ... आपलं थोडंसंच णावाला म्हणून खातो .. त्यातंच गोडी असते ... - (सर्वचापी) टारू

In reply to by टारझन

मिंटे .. ह्या रैवारी अल्पोपाहाराला घरी येतोय .. ये ना नक्की ये..... यु आर मोस्ट वेलकम... :)

आजच करून बघिन .. फोटो अप्रतिम ...

In reply to by अश्विनि३३७९

सुपर्ब!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! मिन्टे... सही ग्गं!... एकदम मस्त आणि सोप्पी पा. कृ. टाकल्याबद्दल धन्यवाद! फोटो... लाजवाब!!! फोटो पाहून मला परत भूक लागली गं! :) :) :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by अश्विनि३३७९

सुपर्ब!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! मिन्टे... सही ग्गं!... एकदम मस्त आणि सोप्पी पा. कृ. टाकल्याबद्दल धन्यवाद! फोटो... लाजवाब!!! फोटो पाहून मला परत भूक लागली गं! :) :) :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by अश्विनि३३७९

सुपर्ब!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! मिन्टे... सही ग्गं!... एकदम मस्त आणि सोप्पी पा. कृ. टाकल्याबद्दल धन्यवाद! फोटो... लाजवाब!!! फोटो पाहून मला परत भूक लागली गं! :) :) :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मृगे, तुला तिनदा भूक लागली तरी पुडींग एकच आहे. --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

तात्यांनी पुडींगचा शेवटचा चमचा खाल्ला आणि त्या रिकाम्या बाऊलच्या शेजारीच त्यांना समाधानी चिरनिद्रा लागली! :) लव्हली पाकृ..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

=)) तात्या कितीदा मरणार... हे पाककृतीवाले तुम्हाला पोहचवल्या शिवाय काय थंड बसणार नाहीत वाटतं ! =))

वेगळ्याच पाकृबद्दल धन्यवाद! फोटूवरून कल्पना येतीये की पदार्थ छान असणार. रेवती

In reply to by प्राजु

अगं प्राजु, आता आली का पंचाइत? माझ्या इथे चायनीय दुकानात मिळणारा गुलकंद पाकिस्तानातून बनून आला आहे. काय करू गं?;) भारतात गेल्यावर अमृताकडेच जाऊन खाऊया. रेवती

In reply to by रेवती

आमच्या पटेलात तर... भारतातलाच मिळतो बॉ...! तुझ्या समस्येवर उपाय.. कनेक्टीकटची वारी करणे आणि जाता जाता पटेलातून घेऊन जाणे . - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by रेवती

भारतात गेल्यावर अमृताकडेच जाऊन खाऊया. कधी येतेस बोल ?

सही दिसतयं..... माझ्या मते रोझ पुडिंगवर सजावटीकरीता १-२ गुलाबाच्या पाकळ्या असतात आणि पुडिंगला फिकट गुलाबी रंग येण्याकरिता थोडासा खाण्याचा रंगदेखील वापरतात.....

In reply to by ब्रिटिश टिंग्या

बरोबर आहे.... पण मला गुलाब मिळाला नाही रे सजवटीकरता..... आणि शक्यतो यात मी रंग वापरत नाही कारण रोज सीरप मुळे असाही त्याला छान रंग येतो..... अजुन रंग हवा असल्यास सीरप जास्त टाकता येईल किंवा तु म्हणतोयस तसं रंग पण टाकता येईल :)

छान दिसते आहे. पाककृती छान.

नेहमी फोटोंची मेजवानी, तर आज पाककृतीची मेजवानी आहे मिंटीकडुन :) फोटो बघुन तोंडाला पाणी सुटले आहे. - सूर्य.

अवांतरः रोज रोज पुडींग खाउन कंटाळा नाही येणार का?

मी कधीच पुडिंग केल नाहीये, पण आता नक्की करुन बघेन. फोटो पण मस्त.

रोज खाउन पाहीले पाहीजे असे. :-) आवडले.

खुप छान दिसत आहे..मी नक्की करणार.... धन्यवाद :-) प्लेन जिलेटीन हा पदार्थ भारतात कुठे मिळतो....? किराणामालाच्या दुकानात मिळेल का?

मस्तच! ! करुन बघायला हवे.... रोज सिरप , गुलकंद आमच्याकडच्या दुकानात मिळतेय का बघते........

पाककृती छान वाटतिये. फोटो पण मस्त. एक शंका - मध्यंतरी कोणाकडून समजले की जिलेटीन हिंदूंनी (गायीला पवित्र / पूजनीय वगैरे मानत असाल तर ) खाऊ नये कारण ते गायीच्या हाडातील कोलॅजन पासून बनवतात. ह्याबद्द्ल कोणाला खात्री शीर माहिती आहे का?

>>वेलदोडा, इथे बघा : http://en.wikipedia.org/wiki/Gelatin हो मी ही आधी वाचले आहे. प्राण्यांच्या हाडांमधील कोलॅजन पासून जिलेटीन बनवतात ते माहित आहे. पण कोणते प्राणी? त्यात गायीचाही वापर असतो काय? ह्याबद्द्ल खात्रीशीर माहिती हवी होती.