झबडं - टोपलं
घरांत महिला वर्गाची लगबग चाललेली.
निमित्त कुणाच्या तरी बारशाला जाण्याची.
"बाबा, बाळंत विडा काय घ्यायचा?"
सूनबाईंची पृच्छा (अर्थात् उगाचच )
"घ्या एक झबडं टोपलं"
सूनबाईंचं चमकून पाहाणं.
"मग वांदीचा चाळा नको कां?"सूनबाई. चेहर्यावर एक खट्याळ हसूं.
मी पहिल्या क्षणी भांबावलेला. दुसर्या क्षणी ओशाळवाणा.
तिसर्या क्षणी एक सार्वजनिक हास्य स्फोट.
वाचकहो, तुम्ही कधी अशा प्रसंगातून गेला आहांत?
मिसळपाव