सट्टाबाजार
`साहेब, हा कॉम्प्युटर सट्टा बंद करून टाकला पाहिजे... महागाई बरोबर कमी होते की नाही बघा...' निवडणुकीवरून महागाईवर आलेल्या विषयावर बोलताना तो ताडकन म्हणाला आणि माझे डोळे विस्फारले.
`कॉम्प्युटर सट्टा?' मला कळलं नव्हतं. मी तोच प्रश्न त्याला केला आणि माझ्याकडे न पाहता तो बोलू लागला.
`ते पैसेवाले लोक धान्य, धातूंच्या भावावर सट्टा खेळतात. गरिबांना लुटून नफा कमावतात. खिशातला पैसाही इकडचा तिकडे न करता त्यांना लाखो रुपयांचा नफा होतो आणि आमच्यासारख्या हातावरचं पोट असलेल्या लोकांचा जीव जातो.
तुम्ही मराठीसाठी काय करता ?
लेखन प्रेरणा - तुम्ही मराठीसाठी काय करता ?
मराठीच्या सद्यःस्थितीबद्दल यथेच्छ टाहो फ़ोडून झाल्यावर आपण विचार करू की आपण मराठीसाठी काय करतो ? मी स्वतः खालील गोष्टी करतो.
(पुढिल सर्व कल्पना पुर्णत: काल्पनिक)
१) वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांचे सदस्यत्व घेतो.
२) तिथे लेखनाच्या / प्रतिसादाच्या जिलब्या पाडून मराठीचा वापर वाढवतो.
३) अनेक आयडी काढुन स्वत:च्याच लेखांवर वादग्रस्त प्रतिसाद देतो.
४) विनाकारण एखाद्या सदस्याची बाजु घेवुन इतराना झोडपतो. त्यासाठी ठेवणीतल्या मराठी शब्दांचा वापर करुन अनवट मराठी शब्द जनमानसात रुजवतो.
आचार्य अत्रे
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या मृत्युला आज चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. अत्रेंच्या या पुण्यतिथीनिमित्त त्यांना स्मरून त्यांच्याविषयी थोडंसं.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (१३ ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९)
यांना बाबूराव अत्रे असेही म्हणत असत. ते एक खंबीर मराठी लेखक, एक श्रेष्ठ कवी, वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक-पटकथा लेखक होते.
ते एक उत्कृष्ट क्रिकेटपटूदेखील होते.
गोविंदाग्रजांना ते स्वत:चे गुरू मानत. गोविंदाग्रजांचे धाकटे भाऊ अत्रेंच्या वर्गात होते. त्यांच्याकरवी अत्रेंनी गोविंदाग्रजांशी आपली ओळख करवून घेतली. उभयतांत चांगले दहा-बारा वर्षांचे अंतर होते.
महाबळेश्वर
बरेच दिवसात कुठे भटकंती न झाल्यामुळे कंटाळा आला होता. कॅमेराचा वापर सुद्धा बरेच दिवसात केला नव्हता. 'कॅमेरा देव्हार्यात ठेवला आहेस का' अशी विचारणा होत होती. त्यामुळे पुण्यात जवळपास जायचे ठरवले. महाबळेश्वरला जायचा योग आत्तापर्यंत आला नव्ह्ता. तसे एका दिवसात जाऊन येता आले असते पण मग सुट्टीचा फायदा काय, म्हणुन २-३ दिवस गेलो. तिथली काही चित्रे.
मृत्यु
मला मृत्युचि खुप भिति वाटते..तो अटळ आहे हे मला समजते.. मृत्युचे विचार मनात आले कि मी अर्धमेला होतो....माझी भिति कशी घालवु?
डीलीव्हरी
मला एकच प्रश्न पडतो आहे. एकाच दिवशी लेखांचे ' जुळे" किंवा 'तीळे' लेखक मंडळी कसे प्रसवतात?
नेमका काय त्रास असतो.?
दररोज एक चालेल हो.
पण पहीले चार नंबर एकाच लेखकाचे?
तुम्हाला काय वाटते?
जाता जाता: असे चार ओळीचे काकु मी दिवसाला ५ डीलिव्हरी करीन, चालेल काय?
मिसळपाव
