आठवते का ...
आठवते का तुला साजणा ...?
तुझी माझी प्रीत कशी जुळली
हृदयी प्रेम धारा कधी वाहीली
न तुला कळली न मला कळली
बोलता बोलता एकमेकांसोबत
आपण किती दूर चालत गेलो
परतीच्या या वाटा
नकळत साय्रा विसरत गेलो
भान न राहीले वास्तवाचे
प्रेम पाखरे कशी सीमा
ओलांडुन उडाली ..?
आठवते का तुला साजणा ...?
माद्रिदचा आलिशान पालासिओ रेआल
काही वर्षांपूर्वी टी.व्ही.वरील वाहिनीवर स्पॅनिश राजधानीतील आलिशान राजप्रासाद पाहिला होता. स्पेन, स्पॅनिश भाषा आणि फुटबॉल टीमबद्दल मला आकर्षण वाटत राहिले आहे. पुढे स्पॅनिश शिकणे राहूनच गेले, पण मला असलेले ते आकर्षण मात्र कमी झाले नाही. दरम्यानच्या काळात काही स्पॅनिश शब्द शिकलो. बऱ्याच वर्षांनी माद्रिदमधल्या राजप्रसादावर पाहिलेल्या त्या कार्यक्रमाची सहज आठवण झाली आणि इंटरनेटवर शोधताना आढळले की, त्या राजप्रासादाला या वर्षी २६० वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्या निमित्ताने लेख लिहिला.
रॉयल पॅलेस (स्पॅनिश भाषेतील मूळ नाव – पालासिओ रेआल दे माद्रिद) माद्रिदच्या मध्यभागी वसलेला आहे.
शिद्दत-आणखिन एक अभागी मज्नू
शिद्दत याचा ट्रेलर मला वाटतं मागच्या महिन्यात पाहिला होता. आवडला होता. परवा सध्याची स्टार गायिका योहानीचं ‘शिद्दत’ गाणं ऐकलं, मस्तच आहे. (थोडी उच्चाराचा खडा जाणवतो पण चालतंय). झालं. मग पाहायचा ठरवला.
जग्गी एक स्वप्नाळू मुलगा! उत्साही ,उर्जेने भरलेला. गौतम आणि इराच्या लग्नात गौतमच्या प्रेमाने भरलेल्या स्पीचने भारावून जातो. आणि लवकरच त्याला त्याची जलपरी कार्तिका भेटते. ९० च्या सिनेमाप्रमाणे कार्तिका बड्या घराची आणि जग्गी कफल्लक आणि थोडासा सरफिरा. लवकरच दोघांचं मेतकुट जमलंय, या अंदाजापर्यंत आपण येऊन पोहचतो. तोच कार्तिकाचं काही दिवसांत लंडनला लग्न आहे, ही छोटीशी कलाटणी मिळते.
बखरीतून निसटलेलं पान..
(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे..
शहाणी मुलगी ... 2 (#तूम्हणालास)
तू म्हणालास, संस्कारी असणंच असतं एकदम best.
नाहीतर आयुष्यं बनतं न सुटणारं total mess.
यावर मी बिचारी उलटं काय बोलणार?
"तसं नसतं रे" म्हणून झाकली मूठ खोलणार??
( माहीत आहे मराठीत "खोलणार" म्हणत नाहीत
आणि संस्कारी लोक याला लेखनच गणन नाहीत.)
पण ते असूदेच.
थोडं यमक जुळू देच.
हां तर, तुझं म्हणणं मला फारसं नाही पटलं,
पण तुझ्या वागण्याचं कोडं मात्र सुटलं.
आता कळलं दोघांमधलं दोन हात अंतर..
आधी सीमारेषा बाकी सगळं नंतर.
साडेपाच सेकंद handshake, stopwatch लावून
छान खुलतो रंग तुझ्यावर..
काव्यरस
सांज फुले
सांज फुलांनी भरू दे
काळोखा रंग सावल्यांत उतरू दे
धूसर झाली मावळतीची वाट
मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट
पंखात घेऊन भोवतीची वारे
परतू लागली चुकार पाखरे
सूर्य मिटून राने अंधारली
प्रकाशज्योत अलगद विजून गेली
अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर
रात्र पावलाने पुढे येई हळुवार
काव्यरस
मिसळपाव