कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 4)
पुढचा दिवस उजाडला. आज मामु चा दौरा होता. क्षणात अंतू बरवा आठवला. अक्षरशः भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था होती. चिपळूण मध्ये फक्त एक पेट्रोल पंप चालू होता. बाकी पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्याने बंद होते. चिपळूण ला येणारे रस्ते , घाट बंद झाल्याने पेट्रोल चे टँकर पण 3 4 दिवस येत नव्हते. त्यामुळे 3 ते 4 तास रांगेत उभे राहून फक्त 50 रुपयाचे पेट्रोल मिळत होते. त्यातही चारचाकी साठी नाहीच. मदतीला शेजारील गावांतून गाड्या घेऊन यायचं तरी पंचाईत व्हाययाची वेळ यायची. मुख्य चिपळूण शहरात साफसफाई साठी पाणीच उपलब्ध नव्हते. पिण्यासाठी पॅक बाटल्या मदत म्हणून येत होत्या.
मिसळपाव