फिल्ड मार्शल जनरल रोमेल - The Desert Fox.
आज हिटलरचा शूर आणि तितकाच दुर्दैवी सेनानी डेझर्ट फॉक्स फिल्ड मार्शल जनरल रोमेल याचा मृत्युदिन . त्या निमित्ताने हा छोटासा लेख पुनर्प्रसारित करतोय. या लेखातील माहितीची गंगोत्री बव्हंशी संगणक आंतरजाल आहे आणि माहिती अचूक ठेवण्याचा प्रयत्न केलाय . सूचनांचे स्वागतच होईल .
प्रारंभीचे जीवन :-
एर्विनचा जन्म १५- नोव्हेंबर १८९१ रोजी स्टुटगार्ट जवळिल हाइडेनहाइम येथे झाला . प्रोफेसर एर्विन रोमेल ( सिनिअर ) आणि त्यांची पत्नी हेलीन व्हॉन लूज यांचे हे दुसरे अपत्य . एर्विन याचे प्राथमिक शिक्षण स्थनिक शाळेत झाले . लहानपणापासूनच त्याच्यात अभियान्त्रिकी कौशल्ये दिसून येत होती .
मिसळपाव