Skip to main content

महाराष्ट्र विधानभवनावर यंदा कोणता झेंडा फडकणार?

लेखक सुनील यांनी मंगळवार, 29/09/2009 10:29 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1463
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

रामदास आठवलेंना सगळ्यांनी पाठींबा देवुन मुख्यमंत्री करावे. शिर्डीत पडल्यापासुन सारखे रडत आहेत. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

आरं येउन येउन येनाऽऽर कोन... कांग्रिस शिवाय हायेच कोन... बोला शरदरावजी पवारांचा विजय आसो...

मनसे, शिवसेनेतली बंडखोरी, नेतृत्वहीन भाजप मधली वैचारीक दिवाळ्खोरी या मूळे काँग्रेसला बहूमतासाठी काहीच प्रयत्न करावे लागणार नाही. मोहन

रिडालोस चा उल्लेख मुद्दामहून टाळलात की काय? मनसे हा पक्ष नविन आहे.त्यांनी मोजक्याच ठीकाणी उमेदवार उभे केले आहेत असे असताना तुम्ही कोणत्या हिशेबावर मनसे सत्ता स्थापन करेल असे म्हणत आहात लोकसभेची आकडेवारी तुम्ही द्याल पण लोकसभेत भाजपा उमेदवार जिथे जिथे उभा होता तेथे मराठी मतदारंनी मनसेला मते दिली होती आता बर्‍याच ठीकाणि मनसे आणी शिवसेना यांत थेट लढत आहे.उमेदवारही मराठी आहेत.

अगदी सरळ सरळ असाच निकाल दिसतोय. ----------------------------------- ईलेक्शन दरम्यान कोणी पुढारी स्पष्ट बोलत नाही. गुळूगूळू बोलतात. यंदा स्पष्ट बोलणार्‍यालाच मत द्या. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

कोणतेही असो येणारे सरकार गरीबांची पिळवणुक करणार, सामान्य माणुस अजुन त्रस्त होणार हे सत्य आहे. पक्ष कोणताही असला तरी, झेंडा कापडाचा आणि रंगीत असणार, रंग बहुतेक करुन सामान्य जनतेच्या रक्ताचा (लालच) असणार.. फक्त तो दिसणार वेगळा.. याहुन मोठा दृष्टीभ्रम तो काय? सध्या माझे मत विकायला काढलय, आहे का कोणी विकत घ्यायला?

>>महाराष्ट्र विधानभवनावर यंदा कोणता झेंडा फडकणार? महा राष्टाचा

.....घोडेबाजार तेजीत राहणार. त्रिशंकु....

आमच्या एरियात सगळेच वाय.झेड. लोकं उभे आहेत .. बोगस मतदान करता येत नाही , त्यामुळे मतदाणाच्या दिवशी अजुन चांगला सदुपयोग करून घेऊ !! पिडां म्हणतात तसे डिपॉझिट जप्त झालं एखाद्याचं तर आनंद आहे ;) बाकी नाना च्या मताशी सहमत !! बिचारे आठवले , तिकडे घरातून सामान बाहेर काढण्याआधीही काँग्रेसची कॅबिनेट मंत्रीपदासाठी चाललेल्या बैठकीत आठवल्यांना बाहेरच बसवलेलं , तरीही त्यांनी काही धडा घेतला नाही ... एप्रिल मधे ताबा सोडा सांगून पार सप्टेबर मधे नाईलाजाने सामान बाहेर काढावं लागलं (अन्यथा त्यांच्या अनंत पिढ्यांनी तिथेच तळ ठोकला असता हे सांगणे न लगे) , ५ महिने राहू दिलं त्याचे उपकाराचे गोडवे गाण्यापेक्षा , "काँग्रेसला रस्त्यावर आणू" असं काहीसं बडबडतात ते हल्ली ! बाकी "आठवलेंचे" भाषण ऐकणे म्हणजे कान तॄप्त होतात अगदी !! - टारूदास आठवले (आमच्या घरातलं दुध जरी नासलं , तरी आम्ही त्याला "भारताच्या रिपब्लिक जनतेला नासकं दुध देण्याचा हा विरोधी पक्षाचा डाव आहे " असे ओरडतो )

कुणाचही राज्य येउद्यात. २४ तास विज द्या हो. सर्व कामात किती त्रास होतो हो.

In reply to by विनायक प्रभू

मास्तर २४ तास कामात बिजी तर झोप कधी घेणार? अन नेमकी झोपेच्याच वेळी विज गेली तर? विज, पाणि, असल्या सुविधांवरच आपण ६० वर्षे बोंबा मारतोय. दुर्दैव आमचे साले असले पुढारी भेटले तिच्यायला. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

In reply to by विनायक प्रभू

२४ तास विज द्या हो. सर्व कामात किती त्रास होतो हो. http://www.guardian.co.uk/world/2009/aug/02/india-china-birth-control उगाचच ही न्यूज आठवली.. :-) India's health minister, Ghulam Nabi Azad, raised eyebrows last month when he suggested that the best way to curb population growth was to provide electricity to rural areas. Couples would spend more time watching television and less time making babies, he suggested. --सुहास

आता ओळखा बरं आम्ही कोण ? ( छ्या, पटकन येड्यासारखं "रिडालोस" म्हणु नका ! ) ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

महाराष्ट्रात "पुणे पॅटर्न" येईल... आणि उद्धवराव मुख्यमंत्री होतील... :) लक्षात घ्या, सध्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी आहे आणि राष्ट्रवादी सत्तेशिवाय जगू शकणार नाही.. या दोघांना काही रिडालोसवाले मदत करतील.. --सुहास

मनसे बाहेरुन सेना+भाजपला पाठिंबा देईल .रिडालोसवाले बहुदा कोणालाही पाठिंबा देतील. कोणीही येवो ,आधी म्हंटल्याप्रमाणे मुख्यमंत्री टाय-कोट वाला पाहिजे. तेच ते पांढरे कपडे,बंद गळ्याचे कोट पाहुन कंटाळा आलाय. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

काँग्रेस-राष्ट्रवादी मनसेची मदत घेऊन सरकार स्थापतील ला मत दिले आहे मात्र यावेळचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार नाहि असेही भाकित वर्तवतो ऋषिकेश ------------------ रात्रीचे १२:५७ झाले आहेत. नवरात्र संपल्याने रात्री ११:००नंतर रेडीयोवर गाणी वाजविणे बंद केले आहे.

राष्ट्रध्वज

बिपीनला आणायला सांगू या.त्याच्याकडे खूप आहेत. बाकी आता मिडटर्मची तयारी करावी लागते काय अशी परीस्थीती वाटते.