Skip to main content

देखावे..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/06/2010 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
ओळखीचे होते सारे तिथे देखावेच होते न्यारे तिथे! गाईन गीत आता खुशीने वाहतील मोकळे वारे तिथे! लाभेल शांती तिच्या जिवाला आनंदे वाहीन भारे तिथे! फेसाळेल मद्य प्याल्यात आता कोंडाळतील हावरे सारे तिथे! मी आस्तिक, मी नास्तिक उघडीन सारी दारे तिथे! -- तात्या अभ्यंकर.

उपांत्य फेरीचे दावेदार....

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 29/06/2010 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास रोखले गेले आहेत... धडधड वाढली आहे... डिफेंडर्सची भिंत उभी आहे... गोलकीपर शेवटच्या क्षणापर्यंत आपले मोहरे योग्य जागी लावतोय... रेफरीची शिट्टी.... आणि संघाचा सर्वोत्तम स्ट्रायकर फ्री किक घेतो... उड्या मारणार्‍या डिफेंडर्सना चुकवून तो जाबुलानी चेंडू एक बाकदार वळण घेत नेटच्या एका कोपर्‍याचा वेध घेत हवा कापत चाललाय.... गोलकीपरनी जिवाच्या आकांतानी तो चेंडू अडवण्यासाठी झेप घेतली आहे.... आणि... ..... आणि???? आणि काय घडणार पुढे??
विशेष

खेकडे

लेखक जागु यांनी मंगळवार, 29/06/2010 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : ४-५ खेकडे आल लसुण पेस्ट १ चमचा मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा ४-५ लसुण पाकळ्या ठेचुन एक मोठा कांदा २ चमचे मसाला हिंग, हळद चविपुरते मिठ थोडा चिंचेचा कोळ वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन थंड झाल्यावर वाटावे १ चमचा गरम मसाला. तेल कृती: चिंबोरे साफ करुन घ्यावे. टोपात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हिंग हळद, मसाला, चिंबोरे व चिंबोरे बुडतील एवढ पाणी टाकायच.

पाणी साठवा.

लेखक जागु यांनी मंगळवार, 29/06/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
हे कोवळे कोंबही कसे पाणी साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणही त्यांच्याकडून धडा घेतला पाहीजे.

सहज सुचल म्हणुन

लेखक jaypal यांनी मंगळवार, 29/06/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षांपुर्वी एका वृध्दाश्रमाला भेट देऊन आल्यावर तिथल्याच एका देवळाच्या पार कट्यावर एकटाच बसलो होतो आणि तेवढ्यात वा-यावर हेलकावे घेत एक पान गळलेल बघताना सुचल. १. त्या झाडाला देखिल आता, माझ असण नकोस वाटल. कसं वा-याच निमीत्त करुन, मला एकट टाकल. याचा श्वास मी होतो. याचा ध्यास मी होतो. उन,वारा पाउस झेलत, याला मी जगवल बघा तुम्हीच, आता त्यानी कस वागवल. त्या झाडाला देखिल आता, माझ असण नकोस वाटल. कसं वा-याच निमीत्त करुन, मला एकट टाकल. २. घातले सुखाने, हे अवघड उखाणे. सोडवितो जन्मभर, तुझ्या आठवाने. तुटली माळ, विखुरले मोती. उरला धागा, केवळ हाती.
काव्यरस

गीत: वाटे मज अपार सुख

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 29/06/2010 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
वाटे मज अपार सुख
वाटे मज अपार सुख, धरूनी हाती हात कोणी नसे जवळी तरी तुच द्यावी साथ ||धृ|| कुंजविहारी यमुनाजळी ऐकून कान्हाची मुरली, राधीका आली प्रेमभरात ||१|| शांत शांत या उपवनी पाखरे मधूर कुजन करोनी, चोच देती चोचीत ||२|| नकोच काही दुसरे मजला तुच सखया जवळी असता, साथ देईल चांदरात ||३|| दोन नयनांचे झाले मिलन ओळख विसरून तन, द्यावया निघाली साथ ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २९/०६/२०१०
काव्यरस

वंशावळी : एक ओळख

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 29/06/2010 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
वंशावळी : एक ओळख मागच्या आठवड्यात मी सकाळी घरी होतो त्यावेळी एक जोडपे घरी आले. ते वडिलांना त्यांचे आडनाव विचारत तुम्ही अमक्याचे नातेवाईक, तमक्याचे भाऊ, येथून तुम्ही येथे आले वैगेरे वैगेरे सांगत असलेले मी ऐकले. मी ताबडतोब समजलो की ते एक भाट आहेत, व ते आता वंशावळ वाचणार आपल्या समाजात अनेक जाती आहेत. या प्रत्येक जातीच्या वंशाची माहीती भाट समाज ठेवत असतो. असलीच कामे वडिलोपार्जीत व्यवसाय म्हणून करणारे ब्रम्हभट - श्री. कैलास रामदेवराय ब्रम्हभट हे होत. Kailas Bramhabhata श्री.

पाकिस्तान भारतीय ध्वज बर्‍याचदा उलटा लावते त्याविषयी

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 29/06/2010 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
असे अनेकदा झालेले आहे की पाकिस्तानात काही कारणाने भारतीय ध्वज लावायचा प्रसंग आला आणि संबंधित अधिकार्‍यांनी तो उलटा लावला (म्हणजे हिरवा रंग वरती आणि भगवा खालती). मग माफी मागणे वगैरे होते. भारतातही ह्यावरून वितंडवाद होतो. एक बाजू म्हणते की ही एक अगदीच "किरकोळ" चूक आहे. दुसरी बाजू (उजव्या गटाचे) म्हणणार की हा देशाचा अक्षम्य अपमान आहे वगैरे वगैरे.