Skip to main content

गीत: वाटे मज अपार सुख

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 29/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
वाटे मज अपार सुख
वाटे मज अपार सुख, धरूनी हाती हात कोणी नसे जवळी तरी तुच द्यावी साथ ||धृ|| कुंजविहारी यमुनाजळी ऐकून कान्हाची मुरली, राधीका आली प्रेमभरात ||१|| शांत शांत या उपवनी पाखरे मधूर कुजन करोनी, चोच देती चोचीत ||२|| नकोच काही दुसरे मजला तुच सखया जवळी असता, साथ देईल चांदरात ||३|| दोन नयनांचे झाले मिलन ओळख विसरून तन, द्यावया निघाली साथ ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २९/०६/२०१०
काव्यरस

वाचने 1103
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया