Skip to main content

पाकिस्तान भारतीय ध्वज बर्‍याचदा उलटा लावते त्याविषयी

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 29/06/2010 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
असे अनेकदा झालेले आहे की पाकिस्तानात काही कारणाने भारतीय ध्वज लावायचा प्रसंग आला आणि संबंधित अधिकार्‍यांनी तो उलटा लावला (म्हणजे हिरवा रंग वरती आणि भगवा खालती). मग माफी मागणे वगैरे होते. भारतातही ह्यावरून वितंडवाद होतो. एक बाजू म्हणते की ही एक अगदीच "किरकोळ" चूक आहे. दुसरी बाजू (उजव्या गटाचे) म्हणणार की हा देशाचा अक्षम्य अपमान आहे वगैरे वगैरे. http://www.ndtv.com/article/india/in-minor-mistake-india-flag-upside-do… कुणी किती मलमपट्टी केली की केशरी रंग पावित्र्याचा, हिरवा समृद्धीचा आहे वगैरे वगैरे तरी सर्व सामान्यांना असेच वाटत आहे की भगवा हा हिंदूंचा रंग आणि हिरवा हा मुस्लिमांचा. त्यामुळे पाकच्या लोकांना आपला रंग हिंदूंच्या खाली दाखवणे पटत नाही. आणि मग अशा "किरकोळ" चुका होतच रहातात. इस्लामवर आधारित देश पाकिस्तान आपल्या धर्माच्या रंगाला दुय्यम स्थान देणे कसे स्वीकारेल? मुस्लिम धर्मात ह्याबद्दल बरेच कठोर नियम आहेत. जसे कुराणाच्या प्रतीवर इतर कुठलेही पुस्तक ठेवले तर ते पाप समजले जाते. मला वाटते ह्याला काही उपाय नाही. भारताने ध्वज बदलला तरच ह्यावर उपाय निघेल. मुळात भारताच्या ध्वजावरील रंगांचे "अधिकृत" स्पष्टीकरण मला आजिबात पटत नाही. सगळ्या मुख्य घटकांना प्रातिनिधित्व देण्याकरताच ह्या रंगाचे पट्टे मारले आहेत असे वाटते. तुम्हाला काय वाटते? ह्या वारंवार घडणार्‍या, झेंडा उलटा लावण्याच्या घटना ह्या फोपा म्हणून सोडून द्याव्यात का यावर काही उपाय संभवतो?

वाचने 10666
प्रतिक्रिया 58

प्रतिक्रिया

पाकीस्तान्ला चिथवण्याखेरीज दुसरे धंदे नाही आहेत. मूर्खांच्या नादी कोण लागणार. दुर्लक्ष करायचं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

तिरंग्याचा केक कापला .. अपमान !! तिरंग्याचा शर्ट घातला ... अपमान !!! १५ऑ/२६जा सोडुन तिरंगा फडकवला .. अपमान !! तिरंग्यातल्या चक्रातल्या कांड्या कमी जास्त झाल्या .. अपमान !! ह्या तिरंग्याचा अपमान व्हायला काही कारण लागतं का हो ? ;) (सहित काही लिहीलं तरी तिरंग्याचा अपमान होऊ शकतो , म्हणुन सहि डिस्कार्डेड) - टारंगा

In reply to by सुनील

हॅहॅहॅ ... हे तर काहीच नाही ;) अमेरिकेत तर चड्ड्या पण मिळतात त्यांच्या झेंड्याचा !! पण अमेरिकण्स हुषार आहेत ... हे झेंड्याचा घडीघडी अपमान होतोय म्हणुन गळे काढण्यापेक्षा प्रगतीवर त्यांचा भर आहे :) आणि आपल्याकडे एग्झॅक्टली उलटं आहे :) संभाळत बसा लेको मानापमान .. आणि रहा जागेवरंच :)

In reply to by टारझन

अमेरिकेत तर चड्ड्या पण मिळतात त्यांच्या झेंड्याचा !!
कोणीतरी आमच्या अ‍ॅडी जोशींना बोलवा. प्लिज प्लिज प्लिज.... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by टारझन

अमेरिकेत तर चड्ड्या पण मिळतात त्यांच्या झेंड्याचा हो, पण तो फोटो टाकला तर प्रतिसाद राहील काय इथे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by टारझन

ते तसच काहीसे कोर्टाचे देखील असतं रे.... कोर्टाचा अवमान कशामुळे होईल हे कोर्टाला देखील साम्गता येणार नाही ( अर्र या मुळे सुद्धा अवमान होउ शकतो म्हणे ) एकदा पुलंनी विचारले होते " समजा एखादे कोर्ट ( जज्ज) जर बसच्या रांगेत मधेच घुसत असेल अन त्या वेळेस कोणी त्याच्या कानाखाली हाणली तर तो कोर्टाचा अवमान म्हणायचा का?

In reply to by टारझन

विषयांतरः पूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या नावाखाली खुळचटपणा चालत असे त्याची आठवण आली. भारतीय झेंड्याचेही असेच अतिरेकी सोवळे ओवळे आहे. खास दिवस सोडून सामान्य लोकांना अन्य दिवशी हा झेंडा फडकवायला बंदी म्हणजे जरा जास्तच जाचक वाटते.

In reply to by हुप्प्या

खास दिवस सोडून सामान्य लोकांना अन्य दिवशी हा झेंडा फडकवायला बंदी म्हणजे जरा जास्तच जाचक वाटते
अशी बंदी पूर्वी होती. आता नाही. आता आपण सर्व दिवशी (तसेच सर्व रात्री) आपला तिरंगा फडकावू शकता. जिज्ञासूंनी 'नवीन जिंदल' या नावाने गुगलून पहावे.
पूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या नावाखाली खुळचटपणा चालत असे त्याची आठवण आली.
अगदी योग्य उपमा. सोवळ्याचेच लॉजिक लाऊन हे निर्बंध होते. अजूनही निर्बंध अर्थातच आहेत. हा खुळचटपणा की कसे हे आपापले मत झाले. हे निर्बंध नसते तर मात्र नियम बनवणार्‍यांवर सगळे तुटून पडले असते अशीही शक्यता नाकारता येत नाही. आळश्यांचा राजा

In reply to by टारझन

ह्या तिरंग्याचा अपमान व्हायला काही कारण लागतं का हो ?
भावनेशी सहमत आहे. राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी काही मर्यादा घालणं ठीक आहे, पण सर्वसामान्यांना तो इतर दिवशी अभिमानाने फडकवू द्यायचा नाही हे टोकाचं वाटतं. बाकी लेखात पाकिस्तान्यांनी मुद्दाम शक्कल लढवून तो उलटा टांगला असा तर्क केला आहे. भारतीय असो की पाकिस्तानी, सरकारच्या उत्स्फुर्त कल्पनाशक्तीपेक्षा ढिसाळपणावर माझा अधिक विश्वास आहे. त्यामुळे ते अनाहुतपणे होण्याचे शक्यता किती तरी अधिक आहे.

In reply to by राजेश घासकडवी

सर्वसामान्यांना तो इतर दिवशी अभिमानाने फडकवू द्यायचा नाही हे टोकाचं वाटतं आरे मग पब्लिक मॅचच्या वेळी कसे हातात घेउन फडकवते? यावरून एका अनऑफिशिअल भारत - पाक मॅचच्यावेळी अ‍ॅबी कुरुविला नामक एक खेळाडू दणादण बॅटींग करून मॅच जिंकत आणली असताना पाकी प्रेक्षकांनी दंगा करून मॅच बंद पाडली आणि आपली लोकं फडकवत असलेला झेंडा जाळला होता ते आठवलं.... आंबोळी

In reply to by राजेश घासकडवी

भारतीय असो की पाकिस्तानी, सरकारच्या उत्स्फुर्त कल्पनाशक्तीपेक्षा ढिसाळपणावर माझा अधिक विश्वास आहे.
हे थोडे हॅन्लनच्या वस्तर्‍यासारखे वाटते, नाही का? "Never attribute to malice that which can be adequately explained by stupidity"... फक्त इथे stupidityऐवजी incompetence म्हणता येईल कदाचित. अवांतरः पु.लं.च्या 'पूर्वरंग'मध्ये कोठेतरी कोठल्याशा भारतीय दूतावासाने कधीतरी तिरंगा उलटा फडकावल्याचा दाखला आहे. खुद्द भारतीय दूतावास जेथे अशी "चूक" स्वतःच्याच झेंड्याबाबत करू शकतो, तेथे पाकिस्तानी सरकारास थोडा 'बेनेफिट ऑफ डाउट' देणे अगदीच अशक्य आहे का? अतिअवांतरः
त्यामुळे ते अनाहुतपणे होण्याचे शक्यता किती तरी अधिक आहे.
'अनाहूतपणे' नव्हे. 'अभावितपणे'. 'अनाहूतपणे' म्हणजे 'बोलवले नसता'. (न बोलवता उपटणार्‍या पाहुण्याच्या संदर्भात हा शब्दप्रयोग अनेकदा वापरला जातो.) 'अभावितपणे' म्हणजे 'जाणूनबुजून नव्हे'. (जित्याची खोड.) - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

पाकिस्तान भारतापेक्षा कदाचित कांकणभर जास्त भ्रष्ट असले तरी पाकी लोकांची इस्लामनिष्टा जास्त आहे असा माझा समज आहे. तिथे कायदाही इस्लामचा अनादर करणार्‍यांना शिक्षा देतो. तेव्हा जेव्हा इस्लामचा मान राखण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्या कृत्याला ढिसाळपणा म्हणणे अवघड जाते. हिरवा रंग वरती आणि भगवा खालती हा इस्लामला उच्च स्थान देण्यासारखे आहे. कुण्या भारतीय वकिलातीने भारताचा झेंडा उलटा फडकवला. आता ह्या वकिलातीने वरचेवर असे केल्याचे रेकॉर्ड आहे का? एखादी चूक ही ढिसाळपणा वा निष्काळजीपणा म्हणता येईल. पण वारंवार एकच व्यक्ती वा गट तीच चूक करत असेल तर ती एक विचारपूर्वक केलेली कृतीच म्हटली पाहिजे. माझ्या माहितीत पाककडून ही चूक अनेकदा झाली आहे. तेव्हा संशयाचा फायदा देणे तितकेसे पटत नाही.

झेंडा उलटा लावला म्हणुन बदलायचा ? उद्या कोण नकटं म्हणालं तर नाक कापून घ्याल की.

हा त्यांचा टारगटपणा असू शकतो. झेंडा उलटा लावणे वगैरे चुका होता कामा नयेत. पण आता त्यांच्याकडे जर अशी जबाबदारीची कामं करायला सक्षम स्टाफ नसेल तर करणार?;) भारताकडून समज दिली गेली पाहिजे. रेवती

In reply to by रेवती

सरळ टॉयलेट पेपर्स काढा भारतात पाकड्यांच्या झेंड्याचं प्रिंट असलेले. =)) =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

त्याने काय साध्य होणार? जगात भारताच्या Immaturity साठी बदनामी आणी भारतात दंगली. शीवाय पाकीस्तान सुद्धा भारताच्या झेंड्याबाबत हे करु शकते. त्यांनी चिथावले की आपण चीडण्यात अर्थ नाही. त्यांचा हेतु साध्य होतो.

In reply to by शुचि

सरळ टॉयलेट पेपर्स काढा छे! हे तर अगदीच नको. दंगल झाली तर आपलेच लोक अडकायचे. नंतर यांचे अतिरेकी येणार्......इथे बॉम्ब टाक तिथे बॉम्ब करत. समजावायला कोणाला जावे? ज्यांना आधीची थोडी...... जाऊ दे! रेवती

In reply to by शुचि

सरळ टॉयलेट पेपर्स काढा भारतात पाकड्यांच्या झेंड्याचं प्रिंट असलेले पाकिस्तानचा झेंडा हा इस्लाम धर्माचाच झेंडा आहे.(चंद्रकोर,चांदणी आणि हिरवा रंग).त्यामुळे उद्या वरील प्रकार केलाच तर भारतातील यच्चयावत सगळेच मुस्लिम बोंब मारतील. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by Nile

सहमत. त्यापेक्षा पाकीस्तानी झेंडा छापलेली टम्रेले काढावीत. गेला बाजार बिसलेरी, डालडा यांना त्यांच्या डबे - बाटल्यांवर पाकीस्तानी झेंडा छापायला सांगावा. कसे? ;) (कै च्या कै) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पाकीस्तानी झेंडा छापलेली टम्रेले काढावीत =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुण्याचे पेशवे यांच्या अभ्यासू सूचनेचा विचार करावा यासाठी शनिवारवाड्या समोर चक्री उपोषण करायला कोणालातरी उद्यूक्त करायला उद्यूक्त करायला हवे . अवांतर : स. पेठेत " आमचे येथे वटसावित्रीचे उपोषण करून मिळेल " हा बोर्ड कुठे लागला ते कोणी सांगेल का?

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ हा मान तुमचाच. काजु पुरवायची जबाबदारी आमची. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

In reply to by शुचि

भारतात बनवलेला टॉयलेट पेपर, त्यावर छपाईसाठी भारतातलीच शाई... शाईच्या पक्केपणाची ग्यारंटी देऊ शकाल? उगाच नको तिथे नको तो छाप मिरवत जाण्याची पाळी येईल! चालेल तुम्हाला? (अवांतरः मग आमच्या अमेरिकनांच्याच नावाने लोक शंख का करतात, नको तिथे नको ते टॅटू मिरवतात म्हणून?) उगाच मनाला येईल ते बोलू नका, विचार केल्याशिवाय. 'पाप परिणामांची जबाबदारी नाकारण्यात आहे', असे कायसेसे मिसळपावाच्या पारावरचे स्थानिक दैवत भाईकाका यांच्या 'तुझे आहे तुजपाशी' या धर्मग्रंथात कुठेशी पक्क्या शाईत छापलेले आहे, ते विसरलात? - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

>>भारतात बनवलेला टॉयलेट पेपर, त्यावर छपाईसाठी भारतातलीच शाई... शाईच्या पक्केपणाची ग्यारंटी देऊ शकाल? नाडीपट्टी ज्या शाईने लिहीली आहे, ती शाई वापरण्यात यावी. >>उगाच नको तिथे नको तो छाप मिरवत जाण्याची पाळी येईल! चालेल तुम्हाला? अरे, कोणाला समजणार आहे??? मग कोणी डायलाक पण मारु शकेल, हम अपने दोस्ते का नाम दिल पे रखते हैं। दुश्मनोंका **पर. ये देखो। ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

पाकिस्तानला समज देणे आवश्यक. खरे म्हणजे प्रत्येक पाकिस्तान्याच्या मनात आपल्या शत्रूचा ध्वज कसा आहे तो बिंबलेला पाहिजे. चूक होताच कामा नये. ;) (उसका चेहरा मैं कभी भूल नही सकता टाईप डायलॉगच्या धर्तीवर). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

...काहीशी अशीच आहे, नाही? (तपशील विसरलो.) - पंडित गागाभट्ट.

उलट्या डोसक्याच्या पाकडयांकडून अजून काय अपेक्षा ठेवणार आपण!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

झेंडा उलटा लावला म्हणुन भडकायचे असेल तर बाकी कारवायांनवर काय करावे? बोंबाबोंब करण्यापेक्षा एकतर दुर्लक्ष करा वा त्यांच्या झेंड्याबाबत सुद्धा आपण जाणुन बुजुन चुक करा

In reply to by Dipankar

+१ जशास तसे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

रंगांचे पट्टे आडव्या ऐवजी उभे करा. म्हणजे कुणी इच्छा असुनही उलटा फडकवु शकणार नाहीत. हा. का. ना. का. भावश्या

In reply to by मितभाषी

हिरवा रंग काढूनच टाकला तर? म्हणजे इस्लामला दुय्यम वा तिय्यम स्थान द्यायची भानगडच नको. असो. वस्तुस्थितीकडे बघता, भारतीय सरकार हा झेंडा बदलणार नाही आणि जेव्हा जेव्हा पाकला हा झेंडा फडकावयाची पाळी येईल तेव्हा ही तथाकथित किरकोळ चूक होणारच. कारण त्यामागचे कारण हे खास जिव्हाळ्याचे आहे. जसे पाक अतिरेकी कारवाया करतच राहणार आणि आपण कडक निषेधाचे खलिते पाठवणार तसेच हेही होतच रहाणार. आपल्याला अशीच किरकोळ चूक करून उट्टे फेडायचे असेल तर आपण त्यांच्या झेंड्यावर चांदतार्‍याऐवजी डुक्कर काढावे. हिसाब बराबर. असो.

झेंडा गोलाकार करा मग बघु कोणाला उलटा फडकावता येतो

In reply to by Dipankar

झेंडा गोलाकार करा मग बघु कोणाला उलटा फडकावता येतो झेंडा गोल करून उपयोग नाही... जो पर्यन्त पट्टे आहेत तो पर्यन्त तो उलटा फडकवता येईल... पट्ट्यांच्या ऐवजी वर्तूळ (आयला.. या नावाचे विडंबन पाडायचे राहिले राव...) केले तर उलटा नाहि करता येणार.... पण अर्थातच कुणी तरी म्हणाल्याप्रमाणे हे असेच चालत राहणार.... आंबोळी

In reply to by Dipankar

भारतीय तिरंग्याचे आहेत ते रंग तसेच ठेवून त्याला गोलाकार करणे हे खोडसाळ कृत्य आहे, असा दावा पाकिस्तानने केल्यास त्याचे खंडनार्थ समर्पक प्रतिदावा आहे आपल्याकडे? (पाकिस्तानलाच कशाला, असा आक्षेप रास्तपणे घेण्यास अनेकांना भरपूर जागा सापडण्यासारखी आहे. युअर्स ट्रूली इन्क्लूडेड.) - पंडित गागाभट्ट.

झेंडा गोलाकार करा मग बघु कोणाला उलटा फडकावता येतो अहो मग सुलटा तरी कसा फडकावणार?

भारताने ध्वज बदलला तरच ह्यावर उपाय निघेल.
आणि आपण बहुधा तेच करू..! कारण पाकड्यांना सज्जड समज देण्यास आपण असमर्थ आहोत..आणि ही बाब त्यांना माहीत आहे.. म्हणूनच आपल्या ध्वजाचा अपमान, भारतातले बॉम्बस्फोट वगैरे गोष्टी ते छातीठोकपणे करू शकतात.. त्यांनी ट्रेन्ड केलेले केवळ १५-२० अतिरेकी मुंबैवर हल्ला करून मुंबैसारखं शहर चार दिवस दावणीला बांधू शकतात! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

त्यांनी ट्रेन्ड केलेले केवळ १५-२० अतिरेकी मुंबैवर
येथे फक्त "ट्रेन" असा शब्द हवा. ट्रेन चा भुतकाळ म्हणजेच ट्रेन्ड जर वापरावयाचा असेल तर "पाकिस्तानात ट्रेन्ड १५-२० अतिरेकी........." ह्या प्रकारची वाक्य रचना करता येऊ शकेल . कारण "केलेले" हे क्रियापद ऑलरेडी भुतकाळ दाखवते. त्यात पुन्हा ट्रेन्ड हा भुतकाळदर्शक शब्द अनाठायी वाटतो , उपरोक्त वाटतो , निरुपयोगी वाटतो पक्षी चुकीचाच वाटतो. मराठी व्याकरण चालवताना मधे असा पुर्ण भुतकाळ वापरण्याची काही नियमावली आहे की नाही हे एकदा दुरुस्त करायला हवे. - जातोकाराव

In reply to by टारझन

बॉ बॉ बॉ एवढंच पहायचं राहिलं होतं मिपावर. टार्‍या विसोबांना व्याकरण शिकवतोय. (पुढे तात्या खाली मान घालून हात पुढे करून टारझनकडून पट्ट्या खातायत असं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं) आता मी रिटायर (की रिटायर्ड?) होऊ शकतो. टारझन आयडी हॅक झाला वाटते :? नितिन थत्ते

In reply to by टारझन

त्यात पुन्हा ट्रेन्ड हा भुतकाळदर्शक शब्द अनाठायी वाटतो , उपरोक्त वाटतो , निरुपयोगी वाटतो पक्षी चुकीचाच वाटतो.
आपल्या मताचा आदर आहे, परंतु मी जे लिहिले आहे ते माझ्या मते व्याकरणदृष्ट्या बरोबरच आहे!
मराठी व्याकरण चालवताना मधे असा पुर्ण भुतकाळ वापरण्याची काही नियमावली आहे की नाही हे एकदा दुरुस्त करायला हवे.
गरजूंनी अवश्य अश्या विषयात लक्ष घालावे.. शुभेच्छा आणि धन्यवाद.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छान , संयत प्रतिसाद. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

In reply to by टारझन

(१) trained हे विशेषण असेल तर भूतकाळाचा संबंध कुठे येतो? (२-अ)"अनाठायी वाटतो , उपरोक्त वाटतो , निरुपयोगी वाटतो पक्षी चुकीचाच वाटतो." चुकीचा वाटतो की चुकीचा आहे? ' वाटतो ' शब्द संदिग्धता दाखवितो. (२ब) उपरोक्त? या शब्दाचा अर्थ 'वर सांगितल्या प्रमाणे ' असा आहे. मा. जातोकारावाना उपरा म्हणायचे आहे का? (३)मराठी व्याकरण चालवताना मधे असा पुर्ण भुतकाळ वापरण्याची काही नियमावली आहे की नाही हे एकदा दुरुस्त करायला हवे. खरं म्हणजे हे एकदा तपासायला हवे आणि चुकीचे असेल तरच दुरुस्त करायचे ना? दुरूस्त हा शब्द अनाठायी आणि म्हणूनच अयोग्य आहे. कृपया याचे विनाविलंब स्पष्टीकरण द्यावे. नाही तर ण्ण ची बाराखडी १५-२० वेळा कॉपी पेस्ट करून नविन धागा काढीन. --येतोकीराव

In reply to by टारझन

व्वा वा मस्त. आपण सध्या माशा मारता हे माहीत होते. मासे पण मारते की काय! पण उद्योग आवडला !! सही रे! ब्याट्री चार्ज झाली. अशीच गंमत असेल तर मग गळ लावणारा आणि गळ घालणारा आवडेलच की ! (गळाला लागलेला) मासा

In reply to by टारझन

(१) trained हे विशेषण असेल तर भूतकाळाचा संबंध कुठे येतो? (२-अ)"अनाठायी वाटतो , उपरोक्त वाटतो , निरुपयोगी वाटतो पक्षी चुकीचाच वाटतो." चुकीचा वाटतो की चुकीचा आहे? ' वाटतो ' शब्द संदिग्धता दाखवितो. (२ब) उपरोक्त? या शब्दाचा अर्थ 'वर सांगितल्या प्रमाणे ' असा आहे. मा. जातोकारावाना उपरा म्हणायचे आहे का? (३)मराठी व्याकरण चालवताना मधे असा पुर्ण भुतकाळ वापरण्याची काही नियमावली आहे की नाही हे एकदा दुरुस्त करायला हवे. खरं म्हणजे हे एकदा तपासायला हवे आणि चुकीचे असेल तरच दुरुस्त करायचे ना? दुरूस्त हा शब्द अनाठायी आणि म्हणूनच अयोग्य आहे. कृपया याचे विनाविलंब स्पष्टीकरण द्यावे. नाही तर ण्ण ची बाराखडी १५-२० वेळा कॉपी पेस्ट करून नविन धागा काढीन. --येतोकीराव

In reply to by Dipankar

>> याला उलटा करुन दाखवा. हा घ्या. अहो खोडसाळाला काय त्याचे. आणी पाकिस्तान आहे तरी काय खोडसाळच ना!

मला वाटते ह्याला काही उपाय नाही. भारताने ध्वज बदलला तरच ह्यावर उपाय निघेल. मुळात भारताच्या ध्वजावरील रंगांचे "अधिकृत" स्पष्टीकरण मला आजिबात पटत नाही. चांदतार्‍या सहीत हिरवाच रंग करा. स्पष्टीकरण करण्याचीही गरज नाही.. कारण धर्मनिरपेक्षता ऑलरेडी आहेच म्हणा आपल्याकडे.. आणि वर पाकीस्तान किंवा पाकधार्जीण्यांकडून अपमानही नाहीच्..उलट मानही राखला जाईल.

पूर्वी बहारीनला कुठल्यातरी परिषदेत पाकिस्तानी ध्वजही उलटा लावला होता. उच्च स्तरिय बैठकांमध्ये अशा प्रकारची चूक होण्याची शक्यता जवळपास शून्य असते.तेव्हा पाक अधिकार्‍यांनी ही चूक मुद्दामून केल्याची शक्यता जास्त आहे. भारताचे प्रतिनिधी चिदंबरम ह्यांनीच ह्या घटनेला 'minor incidence' असे म्हंटले आहे ते योग्य आहे. राजनैतिक चुकांना राजनैतिक चुक करुनच उत्तर द्यावे असे अपे़क्षित असते. भारतिय अधिकारी कधी अशी चूक करतात बघुया! P = NP

>>सरकारच्या उत्स्फुर्त कल्पनाशक्तीपेक्षा ढिसाळपणावर माझा अधिक विश्वास आहे. आवडलं आपल्याला +१ =)) =D> मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

>>सरकारच्या उत्स्फुर्त कल्पनाशक्तीपेक्षा ढिसाळपणावर माझा अधिक विश्वास आहे. असेच!! पाकीस्तान तर रहिले दुर, मी भारतातच विचारतांना बघितलं की कोणता रंग वर आणि कोणता खाली :( बाकी हे जर मुद्दामुन जर केले असेल तर मग आपलं सरकार नेहमीसारखा निषेध वगैरे नोंदवेलच आणि कडक भाषेत दम वगैरे देइलच ;)

पाकडयांच्या अपमानाला घाबरून झेंडा बदलायचा ? : कसले डोहाळे लागलेत नेमके? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/