णमस्कार्स लोक्स ,
आज सकाळी उठल्याउठल्या णेहमीप्रमाणे पहिलं काम, मेलबॉक्स खोलला. (२५ नव्या मेल्स). त्यातल्या स्पॅमछाप १५ मेल्स ओपन न करता डिलीट मारल्या. काही फेसबुक अपडेट्स काही जॉब मेल्स पाहुन डिलीट मारल्यावर एक मेल उरला. एका इंजिनियरींग च्या मित्राचा होता. त्यात सात आठ फॉरवर्ड्स दिसले. मेल ओपन केली आणि डोका आउट झाला. त्यात साई बाबांची २ चित्र लावली होती, आणि काही तरी बिण्डोक मजकुर लिहीला होता. समथिंग लाईक "तुमच्या १५ मित्रांना फॉरवर्ड करा , गुडलक तुम्हाला फॉलो करेल. आमक्या ढमक्यानं केलं न त्याला त्या दिवषी संध्याकाळी २ करोड ची लॉटरी लागली.