या चार निरर्थक/रँडम वाक्यांपैकी आपल्याला २ वाक्ये निवडायची आहेत या कौलाने. आणि मग त्या वाक्यांमध्ये, त्याच रँडम आकड्यांनी एका वेळेला एकच शब्द बदलायचा आहे. त्यासाठी आकड्यांची अशी २-२ची फोड केली आहे. यात "३५" आकडा आला, तर ३र्या रकान्यातला ५वा शब्द तितका बदलायचा...
हा भाग तितका कळला नाही. समजा वाक्य
३,४ निवडली गेली, आणि आपला पहिला रॅंडम आकडा १४ आहे. तर ढग बदलून फूल करायचं की ढग बदलून गाणी करायचं?
राजेश
पुढील पायर्या नीट सांगितल्या नाहीत, खर्या.
(शिवाय दोन-आकडी रँडम नंबरची आणखी एक बाब ताजाकलमात.)
- - -
या चार निरर्थक/रँडम वाक्यांपैकी आपल्याला २ वाक्ये निवडायची आहेत या कौलाने. आणि मग त्या वाक्यांमध्ये, त्याच रँडम आकड्यांनी एका वेळेला एकच शब्द बदलायचा आहे.
हा भाग तितका कळला नाही. समजा वाक्य
३,४ निवडली गेली, आणि आपला पहिला रॅंडम आकडा १४ आहे. तर ढग बदलून फूल करायचं की ढग बदलून गाणी करायचं?
समजा वाक्ये ३, ४ निवडली गेली, तर :
वाक्य ३च्या पहिल्या पिलासाठी एक २-आकडी रँडम निवडायचा.
वाक्य ३च्या दुसर्या पिलासाठी दुसरा २-आकडी रँडम निवडायचा.
वाक्य ४च्या पहिल्या पिलासाठी तिसरा २-आकडी रँडम निवडायचा.
वाक्य ४च्या दुसर्या पिलासाठी चवथा २-आकडी रँडम निवडायचा.
त्यामुळे (या उदाहरणात) वाक्य ३च्या पहिल्या पिलासाठी रँडम आकडा १४ असा आहे, तर १ला शब्द बदलून रकान्यातला ४था शब्द घालायचा. "ढग" बदलून "फूल" करायचे.
...
(या उदाहरणात) वाक्य ४च्या एका पिलासाठी रँडम आकडा ६५ असा आहे, तर ६वा शब्द बदलून रकान्यातला ५वा शब्द घालायचा. "फसला" बदलून "झोपला" करायचे.
दोन मातृ-वाक्ये, आणि त्यांची बदललेली दोन-दोन पिले... सर्व मिळून सहा वाक्ये पुढच्या फेरीत प्रवेश करतात. यात जरा गडबड म्हणजे कौलात निवड करण्यासाठी पंधरा पर्याय येणार :-(
खेळात भाग घेणार्यांनी खिलाडूपणे निवड करावी.
- - -
ताजाकलम : काही २-आकडी रँडम संख्या वापरता येत नाहीत, त्या बाद ठरतात.
(वरील उदाहरणात) वाक्य ४च्या एका पिलासाठी रँडम आकडा ९२ असा आहे, तर ९वा शब्द बदलून... (पण वाक्यात आथच शब्द असल्यामुळे "९वा शब्द"च नाही! म्हणजे हा आकडा बाद करून, पुढचा आकडा घ्यायचा.
माझा गोंधळ झाला होता. मला वाटलं जी नावडलेली, बदलाविशी वाटतात ती 'निवडायची' व बदलायची. आता लक्षात आलं. की आवडलेल्यांना पिलावळ तयार करण्याची संधी द्यायची..वेगवेगळ्या चार प्रजातींऐवजी वेगवेगळ्या दोन प्रजाती व त्यांची पिलावळ राहाते.
दर पिढीला संख्या वाढत जाते हे मला जरा प्रयोगाच्या दृष्टीने त्रासदायक वाटतं. दहाव्या फेरी २४ वाक्यं व ५५० च्या आसपास पर्याय असतील का?
या कौलात एकापेक्षा अधिक निवडी शक्य झाल्या असत्या तर खूप बरं झालं असतं.
राजेश
पिलावळ वाढत नाही. प्रत्येक कौलानंतर दोनच वाक्ये जिवंत राहातात.
पुढच्या फेरीत वरची दोन वाक्ये/पिलावळ = ६ वाक्ये उतरतील. पण त्यापैकी कौलातून दोनच वाक्ये जिवंत राहातील. बाकी सर्व गळून पडतील.
ती दोन जिंकलेली वाक्ये पिलावळ प्रसवतील... सगळी मिळून सहा नवी वाक्ये त्या पुढच्या कौलामध्ये मांडलेली असतील. त्यातूनही दोनच निवडून जिवंत राहातील...
या प्रयोगात चौकटीची "कॅरिइंग कॅपॅसिटी" = २ वाक्ये
मात्र प्रजननक्षमता = तिप्पट
प्रत्येक पिढीतून २/६ जिवंत राहातील, प्रजनन करतील, तर ४/६ नि:शेष होतील.
प्रत्येक पिढीतून २/६ जिवंत राहातील, प्रजनन करतील, तर ४/६ नि:शेष होतील.
दोन जिंकलेल्या वाक्यांबद्दल मते देतांना पॉझिटिव बायस निर्माण होऊ शकेल. खाली दिल्याप्रमाणे प्रत्येक वाक्याची मते गोळा न करता फक्त जोड्यांचीच मते पहावीत म्हणजे हा बायस कमी करता येईल. आणखी एक पर्याय म्हणजे निवडली गेलेली जोडी सोडून इतर पाच जोड्यांचाच कौल घ्यावा.
या कौलामध्ये कोणाचेच मत "पूर्णपणे वाया जात नाही"
या मिनिटाला कौलाचा निर्णय असा काही आहे :
(अ) वाक्य १ आणि वाक्य २ (0 votes)
(आ) वाक्य १ आणि वाक्य ३ (2 votes)
(इ) वाक्य १ आणि वाक्य ४ (0 votes)
(ई) वाक्य २ आणि वाक्य ३ (7 votes)
(उ) वाक्य २ आणि वाक्य ४ (1 vote)
(ऊ) वाक्य 3 आणि वाक्य ४ (1 vote)
- वाक्य १ला (आ) ओळीत २ मते मिळाली आहेत, एकूण २ मते
- वाक्य २ला (ई) ओळीत ७ मते, (उ) ओळीत १ मत = एकूण ८ मते मिळाली आहेत
- वाक्य ३ला (आ) ओळीत ७ मते, (ई) ओळीत ७ मते, (ऊ) ओळीत १ मत = एकूण ९ मते मिळाली आहेत
- वाक्य ४ला (उ) ओळीत १ मत, (ऊ) ओळीत १ मत = एकूण २ मते मिळाली आहेत
अशा प्रकारे सर्व मतदात्यांच्या मतांना काहीतरी वजन मिळेल, "टायब्रेकर"ची गरज कमी होईल. लागलाच टायब्रेकर, तर "सर्वाधिक मतांची ओळ" याचासुद्धा विचार करता येईल.
प्रत्येक पिढी/आवृत्तीचा कौल काढून मते मोजण्यापूर्वी ~२४ तासांचा अवधी दिला जाईल. दर आवृत्तीत दहातरी मिपाकरांनी भाग घ्यावा ही इच्छा आहे.
नवा कौल भारतीय प्रमाणवेळेच्या सकाळी टाकला जाईल - अगदी नेमका तास सांगता येणार नाही, आणि भारतीय प्रमाणवेळेच्या पुढच्या सकाळी नवीन आवृत्ती टाकली जाईल.
(पुढील आवृत्त्यांमधली सुधारणा : कौल २४ तासांनंतर बंद केला जाईल. या वरच्या कौलात चुकून कालावधी "अमर्याद" आलेला आहे. म्हणून पहिल्या नव्या या कौलाचा २४ तासांचा स्कोअर दिला जाईल.)
मत देण्याएवढं काय समजल नाही..........
_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा
भारतीय प्रमाणवेळेच्या अनुसार मार्च १७, सकाळी २:३० वाजता कौलाची ही पायरी बंद होईल.
त्या वेळी दिसणार्या मतदानाच्या अनुसार लवकरच दुसर्या पायरीचा कौल दिला जाईल.
वरच्या प्रतिसादातला जाड ठशाचा ट्याग बंद करा रे कोणीतरी...
रोचक पण काही शंका.
म्हणजे प्रत्येक इटीरेशननंतर वाक्य सुधारत जाउन शेवटी दोन वाक्यं मिळणार? आणि हीच प्रक्रीया करुन कविता बनवायची? तसे असल्यास अर्थपुर्ण कविता बनेल असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही! (की मला नीट समजले नाही?)
ह्यावर विचार करत असता आलेला एक विचार, वरील तक्त्यांत आपण पाहु शकतो काही क्रियापदं-कर्ते-कर्मं(ककक) ही एकमेकांशी विसंगत आहेत. जर सुसंगत ककक जोड्या बनवल्या तर यापेक्षा अधिक कार्यक्षम अल्गोरीमद बनवता येइल?
किंवा ह्या प्रयोगातुन मिळत गेलेल्या सुसंगत जोड्या(च) घेउन (जेनेटीक अल्गोरीदम प्रमाणे?) तक्ते अपडेट केले तर इटीरेशन्स कमी होतील का?
आता प्रत्येक इटरेशननंतर वाक्यांची प्रगती होणार की अधोगती, ते कोणास ठाऊक. (श्रेय - काकाही, तुझे आहे तुजपाशी).
कवितेबद्दल :
येथे दोन वाक्ये आहेत, आणि प्रत्येक वाक्य म्हणजे एक अति-लघु-कविता आहे. विंदांच्या ज्या कवितेतून स्फूर्ती घेतली, ती अवघी कविता दोन वाक्यांची आहे :
- - -
पर्या होतात
शेवटी लठ्ठ,
असे म्हणाला
एक मठ्ठ.
पर्यांनी दिला
त्याला शाप :
पुढच्या जन्मी
झाला साप.
- - -
परंतु या प्रयोगासाठी दोन कविता एका-एकाच कडव्याच्याच बनवायच्या आहे. अनायासे त्या दोन कविता एकमेकांना पूरक असतील तर दोन्ही मिळून पहिले-दुसरे कडवे, अशी एकत्रित दोन कडव्यांची कविता होऊ शकेल. कोणास ठाऊक.
शेवटी माणसानेच अर्थपुर्ण वाक्यं निवडायची असल्याने यंत्र पुन्हा स्वयंपुर्ण नाहीच, अर्थात त्याने ह्या प्रयोगातील मजा कमी होत नाहीच.
यंत्र "स्वयंपूर्ण" नाही, हे तर खरेच. पण निवडणारे मनुष्यही "स्वयंपूर्ण" नाहीत. खरोखरच्या रँडम संख्या निवडल्या असत्या तर पुढच्या इटरेशनमध्ये कुठले फरक आपल्यासमोर असतील, त्यावर रसिक मिसळपावकरांचे नियंत्रण नाही.* आणि रँडम बदल करण्यासाठी पुढच्या पिढीत कुठले वाक्य उपलब्ध असेल, त्याबद्दल "पाय"च्या आकड्यांचे नियंत्रण नाही.
रँडम चेंज (येथील यंत्राचा रँडम भाग) + कन्स्ट्रेंट (येथील यंत्राचा रसिक-जनमत भाग) यांचा समतोल झाला, तरच आधी न ठरवलेली, पण अंततः रसिकमान्य शब्दयोजना उदयाला येईल.
या अंशतः यादृच्छिक/बद्ध प्रणालीचा अप्लाइड गणितातला/अभियांत्रिकीमधला एक उपयोग : स्टोकॅस्टिक ऑप्टिमायझेशन.
याच प्रकारची आणखी एक विचारधारा येथे> बघावी.
येथे मी आपल्या मिसळपावकरांकडून फक्त दहा वेळा कौल देण्याची विनंती केलेली आहे. दहा कौलांमधून काही निघेलच याची शाश्वती कोणाला देता येईल? मात्र "स्क्रॅबल"-नामक शब्दकोड्याचा खेळ खेळताना मला उपयोग झालेला आहे. समोरचे अक्षरांचे चौकोन यादृच्छिक रीतीने मागे पुढे हलवून कित्येकदा मनातही न आलेला एखादा शब्द पटकन दिसतो. नुसतीच अक्षरे हलवली, शब्द निवडला नाही, तर अर्थातच काही उपयोग नाही - म्हणजे अक्षरे हलवणे स्वयंपूर्ण नाही. मात्र तो शब्द आधी माझ्या मनात नव्हताच, त्यामुळे अक्षरे न हलवता निवडणारा मीसुद्धा स्वयंपूर्ण नाही. या दूघांचा अंश असल्यामुळे सापडलेला शब्द नवीनही असतो, अर्थपूर्णही असतो.
- - -
*(मी स्यूडोरँडम संख्या निवडल्या आहेत. त्यामुळे फायदा असा की होणारे बदल ओपन-सोर्स आहेत. "धनंजयने अंतिम कविता आधीच ठरवलेली आहे, आणि त्याला हवे तेच बदल तो आम्हाला देत आहे" अशी एखाद्याची शंका थोडी कमी होते. मात्र एखादा रसिक पुढच्या रँडम संख्या बघून निवड करू शकेल. तरी बहुतेक खेळाडू असे करणार नाहीत, अशी आपली आशा आहे. बाकी खेळाडू "जे समोर दिसते, त्यापैकी सर्वोत्तम" अशी निवड करेल. जनमतामध्ये "पुढची पाने बघणार्याचीच रमी जुळेल" अशी काही शाश्वती नाही.)
मात्र एखादा रसिक पुढच्या रँडम संख्या बघून निवड करू शकेल
मी हाच विचार केला, खरे तर मी तसे पाहुन वाक्यंही निवडणार होतो, पण मुळात घेतलेली रँडम संख्या ही तीच असायला हवी असे नसल्याने मी तसे केले नाही. (त्याने जास्त विचार, पर्यायाने यंत्राच्या तंत्रात भेसळ होते असे वाटले).
दहा कौलांमधून काही निघेलच याची शाश्वती कोणाला देता येईल?
बरोबर, म्हणुनच 'व्हाइल' लुप, स्वयंपुर्णता वगैरे विचार आले. स्वयंपुर्णतेबद्द्लचं वाक्य मी काढुन टाकलं कारण तो विचार माझ्या मनात खरं तर यायला नको होता ('एंड' होणार्या अल्गोरीदम्स ची सवय असल्याने झाले असावे ;) ). अर्थात कुठल्याही अग्लोरीदम मध्ये 'वाक्याचा अर्थ लागतो का पहा' असे तपासणे शक्यच नाही. :)
मार्च १६, २०१०, भा. प्र. वेळ २:३० झाली आहे.
कौल मोजायला घेत आहे.
वाक्य १ आणि वाक्य २ (1 vote)
वाक्य १ आणि वाक्य ३ (2 votes)
वाक्य १ आणि वाक्य ४ (1 vote)
वाक्य २ आणि वाक्य ३ (10 votes)
वाक्य २ आणि वाक्य ४ (2 votes)
वाक्य 3 आणि वाक्य ४ (2 votes)
जोडीने "वाक्य २ व ३ जिंकलेली आहेत"
प्रत्येक वाक्याला मते :
वाक्य १ : ४
वाक्य २ : १३
वाक्य ३ : १४
वाक्य ४ : ५
पुढे जाणारी वाक्ये :
२. फूल उडते आस्ते वेडे मोहरून मेला शाहाणा राजा.
३. ढग झोपतो अधूनमधून शूर तसे उठले वेडे इंजिन.
या वाक्यांना आता पिले होतील.
या भागात ३२ वेगवेगळे रँडम शब्द तक्त्यात बघून-बघून निवडताना एक चूक झाली. चूकही रँडमली झाल्यामुळे चालवून घेत आहे. त्या चुकीच्या रँडम शब्दाला बघूनच मते दिली गेली असल्यामुळे चूक आता निस्तरता येत नाही.
क्षमस्व. पुढच्या कौलांमध्ये चारच रँडम संख्या बघायच्या आहेत, आणि चारच शब्द तक्त्यात बघून बदलायचे आहेत. चुका होण्याची शक्यता कमी आहे...
गमतीदार प्रयोग
In reply to गमतीदार प्रयोग by राजेश घासकडवी
उदाहरण
In reply to उदाहरण by धनंजय
ओह,
In reply to ओह, by राजेश घासकडवी
पिलावळ वाढत नाही
In reply to पिलावळ वाढत नाही by धनंजय
शंका
२ आणि ३
सगळाच
वाक्य २
एक ऋचा
रोचक धागा
डेडली !
कौल - मत-मोजण्याची पद्धत
प्रत्येक पिढीचा अवधी - आदमासे २४ तास
मतदान
रोचक प्रयोग
मत
In reply to मत by शानबा५१२
केला
भारतीय प्रमाणवेळ सकाळी २:३० - कौल-१ बंद होईल
कळले...
!!हुच्च!!
रोचक पण
In reply to रोचक पण by Nile
शंकानिरसन (थोडेसे)
In reply to शंकानिरसन (थोडेसे) by धनंजय
मात्र
भा. प्र. वेळ २:३० [सकाळ] झाली आहे
एक चुकीचा शब्द - क्षमस्व
उशीर झाला
In reply to उशीर झाला by चित्रा
भाग घ्याच!