Skip to main content

मंद जाहल्या तारका.....

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 28/07/2010 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मंद जाहल्या तारका....... मंतरलेले दिवस ते चंद्र होता साक्षीला, पुनवेच्या राती रुपेरी प्रेमरंगी तुजसवे नाहल्या. रात्र होती तरुण अन यौवनी मी तुजसवे, मोरपंखी मधुर स्वप्नात तू गंध रातराणीचा दरवळे. मदहोश मी, बेधुद तू चंद्र मजकवे सामावला, हलकेच डोकाउनी नभातून तारकाहि गाली लाजल्या. आजही रात्र तैसीच आहे गंध तोच रातराणीचा दरवळे ? ? ? ? ? ? ? चंद्र नाही आज मजकवे तारकाहि मंदावल्या.नभीच्या निरंजन वहाळेकर
काव्यरस

सौंदर्यास्वाद

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 28/07/2010 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
सौंदर्य कशात नसतं? सगळ्यांत असतं, अगदी दगडाधोंड्यातही. परंतु त्यासाठी हवी सौंदर्यास्वादक दृष्टी. कलाकारी भावली की अदाकारी सुचते. त्यातूनच मग सौंदर्य मन लावून आस्वादण्याची नजर लाभते. अशा सौंदर्यदृष्टीमुळेच कधी वेड्यावाकड्या काष्ठातून सौष्ठवाचे शिल्प वेड्यासारखे अवतीर्ण होते तर कधी फटकाऱ्‍यांच्या शिंतोड्यातून बिनतोड असे चित्र कँनव्हासवर आकार घेते. कोणाला शब्दांचे सौंदर्य वाचावेसे वाटते तर कोणाला भावलेली सुंदरता शब्दांसह वेचाविशी वाटते. असे सौंदर्यपूर्ण वेचे वाचकांना भुलवतात, झुलवतात अन् खुलवतातही. कोणाला झाडाच्या खोडाची गोडी तर कोणाला खुणावते फांद्यांवरची जोडी.

मासे ११) बांगडा

लेखक जागु यांनी बुधवार, 28/07/2010 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
मालवणी प्रकार : लागणारे साहित्य: बांगडे ४-५ थोड ओल खोबर, १ चमचा धणे, ३-४ तिरफला ठेचुन ७-८ लाल सुक्या मिरच्या ५-६ लसुण पाकळ्या १ छोटा कांदा चिरुन अर्धे हळकुंड मिठ चविपुरते थोडा चिंचेचा कोळ तेल पाककृती: बांगड्याला खवले नसतात त्यामुळे साफ करायला सोपे असतात. बांगड्याच्या कालवणासाठी पोटातील घाण काढायची, शेपुट व डोके काढून टाकायचे.

नॅनो

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 28/07/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
नॅनो नॅनो टेकनॉलॉजी म्हणजे काय?.. त्याचा मानवि समुहास उपयोग किति आहे? नॅनो टेकनॉलॉजी चा उपयोग केलेले रोजच्या वापरातली एखादी गोष्ट कोणती? वैद्यकिय शाश्त्रात पण याचा उपयोग होतो..तो कसा? आपल्या सनातन संस्क्रुति मधे पण नॅनो टेकनॉलॉजी होति का? जाणकार समजावुन सांगु शकेल का?

माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/07/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा
माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा पडती मनामधी तुफानी पाउस धारा ||धृ|| लाटांवर लाट येई उंच उसळून तालात त्यांच्या घेई मला लपेटून भरती आली माझ्या मनाच्या समिंदराला माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा ||१|| भरल्या वादळी नाव वल्हवू मी कशी माझ्या होडीची वल्ह दिली तुझ्या हाती जोशात हाक नाव पोचव सागर तीराला माझ्या अंगामधी भिनलाय वादळी वारा
काव्यरस

[माहिती हवी आहे] चाईल्ड कॉउन्सिलर

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 28/07/2010 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात कोणी चांगले चाईल्ड कॉउन्सिलर कुणाला माहिती असतील तर माझ्या परिचयाच्या एका कुटुम्बाला हवे आहेत.

(बट डोईवरि बट झुलते तरि)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 28/07/2010 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच खरडवहीत डानरावांशी 'आधुनिक पुरुषांच्या केसांची निगा' या विषयावर चर्चा झडली. आपला केशसंभार कसा सांभाळावा, त्यासाठी कुठची उत्पादनं वापरावीत वगैरे खास पौरुषिण (स्त्रैण प्रमाणे) विषयांवर भाबडं हितगुज झालं. सध्याच्या पुरुषमनाची सुकुमार स्पंदनं त्यात प्रतीत झाली - कवितेला यापेक्षा अधिक राजस विषय तो कोणता मिळणार? मग आम्ही डॉनराव आपल्या केशकर्तन केंद्रात (जवळच्याच एखाद्या सायबर कॅफेमध्ये मेगाबायटी खरडी टाकून) गेले आहेत ही कल्पना केली.
काव्यरस

"७ इयर्स इच"

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/07/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
"७ इयर्स इच" दचकलात ना ऐकून? आहेच हा प्रकार भन्नाट. म्हटला तर गंभीर, म्हटला तर गमतीशीर. लग्नानंतर साधारण ७ वर्षांनी माणसाला अनावर हुक्की येते, अगदी खाज यावी तशी कंपल्सिव्ह. कशाची म्हणता? ह्म्म तर विवाहबाह्य प्रकरण करण्याची. थोडं अ‍ॅडव्हेन्चरस होण्याची. याला म्हणतात "७ इयर्स इच" :) या विषयावर मर्लीन मन्रोचा एक मस्त विनोदी चित्रपट्देखील निघाला आहे. तिच्याखेरीज कोण न्याय देऊ शकणार अशा इरसाल विषयाला? त्या चित्रपटाचं नावच मुळी "७ इयर्स इच". चांगला सुखासुखी संसार सोडून अशी "सो कॉल्ड" अवदसा का बरं आठवत असावी माणसाला? मला तरी वाटतं याचं उत्तर दड्लय मानसशास्त्रात. टू मच ऑफ एनीथिंग इज बॅड.