Skip to main content

प्रवास (न) अन्ताचा ! ! !

प्रवास (न) अन्ताचा ! ! !

Published on गुरुवार, 15/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रवास ( न) अन्ताचा ! ! ! “काम नाही “ “ जगह नही “ “ माफ करा ” “नो व्हेकन्सी “ तरीही सुरु असतो जीवघेणा प्रवास, त्याच्या प्रयत्नांचा, आशा-आकांक्षांचा ! ! पैशांची चाकं लावून, अर्जा-अर्जाला, टेबलापासून –टेबलांपर्यंत ! अधिकाऱ्यांपासून-मंत्र्यापर्यंत ! "स्टेशन नोकरीचं" मात्र नाहीच येत शेवट पर्यंत ! ! “ लग्नाचं वय सरलं ताईच, “ “आजारपण बाबांचं,” “शस्त्रक्रिया आईची,” “ सगळा खेळ पैशांचा ” फक्त असहाय्यता, अन अगतिकता ! ! ! सहजच गवसतं असलं सावज. “दाऊद” सारख्या सैतानांना, मृत्युच्या दलालांना, उपयोगासाठी. प्रस्थापण्या दहशतीचे साम्राज्य, शिंपण्या रुधीरांचे सडे ! ! ! येते एक दिवस बातमी. पेपराच्या कोपऱ्यातल्या रकान्यांत, पोलिसांच्या “एनकाउनटर “ ची. अन संपतो प्रवास एकदाचा ! आयुष्याचाच ! ! ! S…S….S….S….S संपतात सगळी नातीगोती ! ! ! निरंजन वहाळेकर
लेखनविषय:

याद्या 819
प्रतिक्रिया 0