होम्सानंद
वर्ष होते १९८४. पुण्यात पदव्युत्तर शिक्षण घ्यायची संधी आणि महानगराची भीती अशा दोन कुबड्यांवर लंगडत मी पुण्यात आलो. संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत पहिले काही दिवस गेले. जन्माने पुणेकर नसलेल्यांबद्दलची पुणेकरांची तुच्छता समजून घेण्यात नंतरचे काही दिवस गेले. त्यानंतर वर्गातल्या सहकार्यांनी त्यांच्या गप्पांमधे सहभागी व्हायची परवानगी दिली. त्यांच्या गप्पांमध्ये 'अरे, आज स्कॅन्डल इन बोहेमिया वाचली...',' नेव्हल ट्रेटीला तोड नाही...', 'क्रीपिंग मॅन काहीतरीच आहे हं...', 'माझी आवडती म्हणशील तर यलो फेस...' असं काहीतरी त्यांचं बोलणं सुरु असे.
मिसळपाव
