गरमागरम धिरडे आणि चटणी
प्रोजेक्ट गोलाइव्ह होऊन ४ आठवडे झाले.. प्रॉडक्शन सिस्टिम बर्यापैकी स्थिर झाली आहे. विशेष असे काही काम नाही त्यामुळे हा विकांत ही धमाल करता येणार, हे काल प्रॉडक्शन कॉल नंतर नक्की झाले.. दिवस अखेरच्या टीम मीटिंगमध्ये उद्या सकाळी ११ वाजता पॅराग्लायडींगला जायचे असा बेत पक्का केला.. मागच्या आठवड्यातल्या "पेद्रो दि गावा"च्या चढाईचे फोटो बघून ह्या वेळेस अजून ५-६ जण बेतात सामील झाले.. सगळा कार्यक्रम पार करून दुपारी जेवायला कधी मिळणार माहिती नाही.. त्यामुळे ब्रंच करण्यावाचून गत्यंतर नसणार हे कालच समजले होते..
मिसळपाव