कोकण प्रवास: प्रकाशचित्रे
२० ते २२ नोव्हेंबर
कोकण पाहायचे दूरच, पण साधं "येवा कोकण आपलाच असा" हेही ऐकलं किंवा वाचलं नव्हतं. डिसेंबरची पर्यटनगर्दी अजून दूर होती. त्यामुळे चार-पाच दिवस हाताशी ठेऊन, खूप नियोजन न करता निवांत फिरण्याचं नियोजन होतं. नेहमीप्रमाणे कोणी तयार होणार नाही हे माहीत असूनही सगळ्यांना सोबत यायचा आग्रह करून झाला होता. अशा मोहिमांसाठी आवश्यक मानसीक तयारी, नवीन हवामानात रुळण्याची प्रक्रिया (acclimatization) बेस कॅम्पवर, अर्थातच सासुरवाडीत, पूर्ण झाली होती. कदाचित मनात आलं तर कोकणातच स्थायिक होता येईल अशा विचाराने सौं ने सामानाची बांधाबांध केलेली दिसत होती. नकाशातलं अंतर कमी वाटत असल्याने निवांत प्रवासाला सुरुवात झाली.
मुळशी धरण, ताम्हिणी घाट रस्ता घाट रस्त्याच्या उजव्या बाजूने सोबत करणारं, डोंगरांनी वेढलेलं, अथांग पसरलेलं धरणाचं पाणी.
दापोली मुरुड जाता जाता स्वतःचंच सोनेरी प्रतिबिंब पाहण्यासाठी किनाऱ्यावर ओझरतं डोकावणारा सूर्य.
कर्दे पहाटेची वेळ. लाटांचा किनाऱ्याशी अविरत सुरू असलेला संवाद. दूर क्षितिजावर लुकलुकणारे असंख्य दिवे.
वेळ थांबवून ठेवावी, असं वाटेल, अशी शांत, रम्य, आगळीवेगळी पहाट.
उजाडायला लागलं तसं दिसू लागलेल्या छोट्या-मोठ्या नौका. क्षणभर, लहानपणी खेळताना पाण्यात सोडलेल्या होड्या जिवंत होऊन समोर आल्यासारखं वाटलं.
हर्णे बंदर समुद्रात रात्रभर मासेमारीसाठी भटकून, बंदरात पहाटेपासून हळू हळू गोळा झालेल्या अनेक नौका. एवढ्या नौका एकाच ठिकाणी, इतक्या दाटीवाटीत पाहण्याची ही पहिलीच वेळ.
आंजर्ले नदी, खाडी, समुद्र आणि सर्वात उजवीकडे कड्यावर, झाडांच्या गर्दीत लपलेलं, कड्यावरचा गणपती मंदिर.
मंदिर सभामंडप. कोकणवासीयांनी जपलेलं वेगळेपण, मंदिर परिसरातील शांतता आणि स्वच्छता, सर्व काही लक्षात राहणारं.
जास्वंदीच्या फुलांनी सजलेली, पाहतच राहावी अशी मोहक, आखीव-रेखीव गणपती मूर्ती.
कर्दे मानवी हस्तक्षेपापासून अजूनही थोडासा का असेना पण दूर राहिलेला शांत, निवांत, विस्तीर्ण समुद्रकिनारा.
कर्दे ते बुरोंडी प्रवास जिथे कुणाही निसर्गप्रेमीची पावलं थबकतील अशी एक अनवट वाट.
दूरपर्यंत निर्जन परिसर, निळाशार समुद्र, हिरवाईने नटलेले डोंगर, सोनेरी किरणे.
आजही त्या वाटेवरील प्रवासाचं, तिथल्या निसर्ग सौंदर्याचं गारूड मनावर कायम आहे.
जरी ते चित्रांत किंवा शब्दांत व्यवस्थित साठवता आलं नसलं तरीही!
खूप खूप वर्षांपूर्वी. इसवी सन २०१७. क्रमशः

वाचन
9338
प्रतिक्रिया
20