Skip to main content

प्रेमाचा चौकोन

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 15/10/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक हिन्दी शेर आहे. कदाचित तुला माहीत असेल. - मोहब्बत का सफर है, पता मंझिलसे पुछो.. उनकी बात छोडो, तुम अपने दिलसे पुछो। म्हणजे तुझ्या प्रेमाखातर कोणीही उठून काहीही म्हणेल, तुझ्या मनात कोणती मंझिल दडलेली आहे ते महत्वाचे. अन् तेच तू जाणून घ्यायला हवं. हे प्रेमज्ञान पाजळण्याचं कारण हेच की तुझ्या प्रेमासाठी तुझ्याभोवती प्रेमाचा त्रिकोण नाही तर चौकोन झाला आहे! वरील डाव्या बाजूच्या कोनात तुझे स्थान गृहीत धरले तर इतर तीन कोन म्हणजे गणेश, सचिन व सुशील हे होत. मुळात प्रेमाचा हा चौकोन असल्याने कोणीतरी एकच फार नजिक येणारा आहे. जर चौरस कल्पिला असता तर तिघेही तुजपासून समसमान अंतरावर राहिले असते.

दुर्गदुर्गेश्वर रायगड

लेखक योगेश२४ यांनी शुक्रवार, 15/10/2010 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================== =========================================================== || रायगडावर खडे पसरले, शिवरायांच्या पायी हिरे माणके, ती आम्हाला, दुसरी दौलत नाही || =========================================================== ===========================================================

घन ओथंबून येती

लेखक शरद यांनी शुक्रवार, 15/10/2010 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
घन ओथंबून येती वनात राघू घिरघिरती पंखावरती सर ओघळती झाडांतुन झडझडती घन ओथंबुन झरती नदीस सागरभरती डोंगरलाटा वेढित वाटा वेढित मजला नेती घन ओथंबुन आले पिकात केसर ओले आडोशाला जरा बाजूला साजण छेलछबेला घन होऊन बिलगला ना.धों महानोर या महानोरांचे एक वैशिष्ट्य़: यांच्या कवितेला निसर्ग,खेडे, शेत, पाऊस, पीकपाणी इ. यांतून बाहेरच पडता येत नाही. स्वत: कवीलाही आणि म्हणून वाचकालाही .खेड्याचे दु:ख ते कवीचे दु:ख, ओल्या जमीनीचा आनंद तो ह्याचा आनंद,शेताचे सृजन ते ह्याचे सृजन! कवी काव्य का लिहतो ?

सरकारी योजना

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 15/10/2010 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी योजना
माझ्या गावाचा रस्ता कधी सवान* होतच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई गाई म्हशी आम्ही पाळतो, सकाळी धारा काढतो उन वारा थंडीचं, दोन पैशासाठी दुध शहरात पाठवतो घरात पोरांच्या ओठांना दुध राहातच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई शाळा!
काव्यरस

युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 14/10/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
बाई इथंच ठोकू का हा खिळा?
मास्तरः ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा? मास्तरीणबाई: चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा मास्तरः ह्या वर्गात आडवे बेंचेस ठेवू उभं रहायला उंच प्लॅटफॉर्म करू मास्तरीणबाई: समोर टेबल अन आहे खुर्ची बसायला डस्टर द्या मला, नाही वापरत कापडी बोळा मास्तरः ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा? मास्तरीणबाई: चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा मास्तरः दरतासाला मी हो हजेरी मुलांची घेईन सार्‍या मुलांना मी लाईनीनं उभं करीन मास्तरीणबाई: भरलेली शाळा खुपच आवडते मला वर्ग
काव्यरस

रांगोळी

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 14/10/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
शेणाने सारवलेले आंगण मागे पडुन त्याची जागा जशी विटा सिमेंटने घडलेल्या फरश्यांनी घेतली आणि ऐसपैस घराची जागा फ्लॅटने घेतली तसतशी रांगोळी हळुहळु लुप्त होत चालली आहे. तरी अजुनही काही गृहिणी (आणि काही बाप्येसुद्धा) ही कला टिकवुन आहेत. कामचलाउ का होइना रांगोळी प्रत्येक घरात कोणा ना कोणाल येत असतेच. अगदीच काही नाही तर छाप वापरुन वेळप्रसंगी वेळ निभावुन नेली जाते. रांगोळीचे प्रकारही तसे अनेक ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, नक्षी, अक्षरभारती, फ्रीहँड, प्रसारभारती. आता तर पाण्यात रांगोळी काढण्याचे तंत्र आणि कलादेखील विकसित झाली आहे. सर्वांनाच सर्व प्रकारची रांगोळी काढता येइलच असे नाही.

एका सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 14/10/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : सुधीर काळेंचा हा थ्रेड - http://www.misalpav.com/node/14446 माये का करु अजुनही सेवा तुझी ? हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ? लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे असे रक्षणात सीमांच्या अखंड सताड उभे आता करुनी मुर्खात गणना माझी त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ? पुरुषात रुपांतर करुनी झाले सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत कायम हरवलेले रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ? धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी रक्त सांडलेले तुझ्या पदरी ...
काव्यरस

भैरव गुनि गावत नित..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/10/2010 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
या पूर्वी - सब सूर तीवर मेल मिलायो..(ओळख..) सब सूर तीवर मेल मिलायो..(यमन) सकाळची वेळ.. भैरवाचं वातावरण.. भैरवाचं मनन, भैरवाचं चिंतन, भैरवाची भक्ति, भैरवाची शुचिर्भूतता..! राग भैरव.. आपल्या रागसंगीतातला एक बलाढ्य राग..

गहिवरल्या अधीर धारा ...

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 14/10/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ विचारांच्या किणार्‍यावरती आज लाटांची टोळ पेटलेला श्वास मनी, काळोखाची कोमल वेल गहिवरल्या अधीर धारा ऐकुनी पर्णकल्लोळ सळसळणार्‍या भावनांचा घट्ट ओला पाचोळा क्षितीज वृक्षाखाली गंधाळलेली प्रकाशधुळ बावरलेल्या वार्‍यावरती स्वप्नांची झुले रेघ सांजफ़ुलांच्या ह्रदयी शुभ्रांकीत विजांचा लोळ --- शब्दमेघ