Skip to main content

प्रतीक्षा

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 19/10/2010 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
नदीतटावर रात्रभर मी थकलो तुझी पाहुनी वाट प्रिये तिष्ठत थांबली बघ क्षितीजावर येऊनी पहाट नभात पाहा खोळंबून राहे चांदण्यांची वरात अजून थोडा रेंगाळत फिरतो कालचाच सांजवात सुगंधास्तव तुझ्या झुरते मुग्ध रातराणी एकांतात दूर लवलवते तेल घालूनी ज्योत नयनी गवाक्षात थरथरे पालवी अस्वस्थपणे तरंग उठवुनी डोहात ताटकळते उभी तशीच ओल्या दवात भिजुनी चिंब रात जागली तरी तशीच बसली ती पाखरे अजुनी कोटरात तुझ्या आगमनाची अशी प्रतीक्षा राहिली भरुनी चराचरात जरी होईल निस्तेज तो दिशा उजळता होऊनी प्रभात तरी थांबला बघ तुला पाहण्या चंद्रमा अजुनी अंबरात...
काव्यरस

कॉर्पोरेट तमाशा १३- नशा आणि हँगओव्हर

लेखक रन्गराव यांनी सोमवार, 18/10/2010 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ऑफिसमध्ये पोहचलो तर काय आश्चर्य - पूर्ण टीम आज गायब होती. मनात विचार आला " लढाई सुरु होनेस अजून काही क्षण आहेत तेंव्हा थोडा कॉफी घ्यायला काही हरकत नाही!" कॅफेमध्ये गेलो तर तिथ पूर्ण संसद भरली होती. मला तिथं पहताक्षणीच बळीचा बकरा दिसावा तसा हूरूप सगळ्यांच्या चेहर्यावर होता! गीता- " कॉफी राहू द्या. या इथं आधी. आज चांगली हजेरी घ्यायची आहे!" मी मला काहीच कल्पना नाही अशा अविर्भावात "वा, आज चांगल्याच खूष दिसताय! आदीनं काही गिफ्ट दिलं की पगार अजून वाढ्वून मिळाला?" खरं तर तिचे डोळे चांगलेच सुजले होते, काल चांगलीच रड्ली असणार आहे! तिला पाहिजे तर शिव्यांची लोखोली वाहू दे पण आज परत रडारड नको!

खरडवहीच्या बैलाला....

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 18/10/2010 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
मला बर्‍याच मिपासदस्यांना सकाळपासून खरड करायचा अथवा व्यनी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सतत Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494 नावाचा मेसेज लिहुन येत आहे. अजुन कोणाकोणाला हा त्रास सहन करावा लागत आहे का ?

झोप.

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 18/10/2010 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, झोप. निसर्गाने सर्व प्राण्यांना दिलेलं एक वरदानच म्हणता येईल. झोप घेण्याने थकवा आणि शरिराची झीज भरुन येते. झोप किती तासांची असावी, कधी झोपावे कधी उठावे याबाबत बरेचसे युक्तीवादपण होत असतात. पण या झोपेचे खरं तर एक रहस्यच आहे. झोपेत माणुस कसा असतो हे त्याला कधीच कळत नाही. खरं तर झोप म्हणजे मेल्यानंतर जी अवस्था होत असावी तीच असं माझं मत आहे. असो, तर या झोपेचेही व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणीप्रमाणे प्रकार आहेत. यावरुन गमतीजमतीही बर्‍याच होताना दिसतात. दिवसा झोपणे आणि रात्री झोप न येणे आणि दुसर्‍या दिवशे ऑफिसात झोप येणे हा एक जगभर पहायला मिळणारा प्रकार आहे.

दसरा मेळावा

लेखक वेताळ यांनी सोमवार, 18/10/2010 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मुंबईत दसरा मेळावा पार पडला.काही लोकाना तो तमाशा वाटला त्याबद्दल वाईट वाटले.बर असो,परत एकदा आपल्या लाडक्या साहेबानी शिवसैनिकाना नवा विचार व नवा नेता दिला.तो नवा विचार कोणता हे खर्‍या शिवसैनिकाला पुढच्या दसर्‍या पर्यंतदेखिल कळत नाही हे एक दसर्‍या मेळाव्याचे विशेष असते.साहेबाची प्रत्येक दसर्‍या मेळाव्याला कुठेना कुठे भगवा फडकवण्याची इच्छा असते,ह्या मेळाव्याला त्यानी एकदम साधी डोंबिवलीत झेंडा फडकवण्याची इच्छा व्यक्त केली.