Skip to main content

सचिन

लेखक RAHULARATI यांनी सोमवार, 09/08/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
सुखकर्ता दुःखहर्ता... सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची ! अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची ! सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची ! आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची ! जय देव जय देव जय तेंडुलकरा ! तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा ! जय देव जय देव .. १४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा ! सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा ! मदतीला कार्तिक पठाण धोनी आले गा ! धावांचा डोंगर उभा राहिला बघा ! जय देव जय देव जय तेंडुलकरा ! तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा ! जय देव जय देव .. दुमदुमले मैदान झाला जल्लोष ! थरथरला गोलंदाज मानिला खेद ! कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद ! असामान्य अद्भुत शक्तिचा शोध ! जय देव जय देव जय तेंडुलकरा ! तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा ! जय देव जय देव.. घालीन लोटांगण वन्दिन चरणं ! डोळ्याने पाहिले द्विशतक तुझे ! पोस्टर लावूनि, आनंदे पुजिन ! भावे ओवाळीन, "सचिन" नामा ! त्वमेव ब्रॅडमन, बॉर्डर त्वमेव ! त्वमेव गावसकर, लारा त्वमेव ! त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव ! राहुल घुले

वाचने 1878
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

>>> त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव ! राहुल घुले हे काव्य श्री. कौस्तुभ सोमण (रा. पुणे, सध्या अमेरिका) यांचे आहे, आणि ते 'सकाळ'मध्ये काही काळापूर्वी प्रसिद्ध झाले आहे. मग राहुल घुले यांचं नाव इथे काय करतंय? की राहुल घुले हेच श्री. कौस्तुभ सोमण आहेत? कृपया खुलासा व्हावा. --असुर

नमस्कार, दिनांक १३/०७/१० ला जाहिर झालेल्या मिपाच्या धोरणानुसार व त्यातल्या कलम-२ व ३ नुसार ...
२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा. ३. आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे झाल्यास मिसळपावाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करता येईल.
ह्या कलमांचे इथे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे. मिपाचे धोरण आपल्याला खालील दुव्यावर पाहता येईल ... http://www.misalpav.com/node/13199 कृपया योग्य ते स्पष्टीकरण द्यावे. १२ तासांच्या आत सुयोग्य स्पष्टीकरण न आल्यास हा धागा 'अप्रकाशित' करण्यात येईल. मिपावर नेहमीच नव्या-नव्या साहित्याला प्रोत्साहन दिले जात असले तरी इथे स्वरचित साहित्यच यावे असा आग्रह असतो. कृपया सहकार्य करावे

अरे वा आपणच का कर्ते या टुकार विडंबनाचे? जरा तरी विचार करायचा होता राव लिहिण्यापूर्वी. मूळ आरतीतले काही शब्द बदलले की झालं का काम? काय त्याला मीटर वगैरे? अजिबात गेयता नाही. बरेच *वाईड बॉल्स पडलेत*. (कॉपीराईट. मा. घासु गुर्जी)

एकतर कविता (विडंबन, मुक्तक, आरती जे काय असेल ते) बकवास आहे. त्यात परत चोरीची (असे वरील प्रतिसादांवरुन जाणवते) आणि त्यात चुकीच्या जागी चुकीचा साहित्यप्रकार प्रकाशित केला आहे. काथ्याकुट सदराखाली कविता टाकली आहे. एकतर माणसाचा देव करु नये आणि केलाच तर त्याच्या या अश्या आरत्या प्रकाशित करुन देवांचा अपमान करु नये. १४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा ! सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा ! मदतीला कार्तिक पठाण धोनी आले गा ! हे काय आहे? आंधळ्या व्यक्तिपुजेचा कळस आहे हा. कडकड होते राव. सचिन आम्हालाही आवडतो. देश की शान वगैरे काही म्हणुन कविता केली असते तर नक्की आवडले असते. या असले आरतीवजा ****पणाच त्रास होतो.