Skip to main content

प्लॅन करायचा काय ?

लेखक जिप्सी यांनी सोमवार, 09/08/2010 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.वर अनेक ट्रेक प्रेमी लोक आहेत्,आपणच एखादा छोटा ट्रेक काढायचा काय? जवळचा,कमी त्रासाचा,१ दिवसीय असा प्लॅन करूया म्हणजे हौशे,नवशे आणि गवशे असे सगळेच येउ शकतील. यामुळं प्रत्यक्ष ओळ्खी होतील, आणी आय डी मागचा माणूस भेटेल. साधारण पुणे आणि मुंबईच्या लोकांना मध्यवर्ती पडेल असा प्लॅन करूया बाकी बाहेर गावच्या लोकांचेही स्वागतच आहे. तारीख २९ ऑगस्ट /५ सप्टेंबर ठेउया. हे किल्ले साधारणपणे पुणे आणि मुंबईच्या लोकांना मध्यवर्ती आहेत. १) कोथळीगड (कर्जत) २) विकटगड (नेरळ) ३) कोरीगड (लोणावळा) अजून सुधा सूचवले तरी स्वागतच ! चला तर मग मंडळी लागा तयारीला !

वाचने 8688
प्रतिक्रिया 61

प्रतिक्रिया

प्लॅन करायचा काय ? तेच म्हणतो,काय करायचाय प्लॅन वगैरे,आहे तस चांगल आहे बोलायच. आलिया भोगासी असावे साधन.

मज्जाच मज्जा! २९ ऑगस्टाला आमच्या येका जिवलग दोस्ताचं स्वातंत्र्य संपणार है त्या कार्यक्रमाला जायचंय. त्यामुळं आमी २९ला टैम्प्लिज! ४/५ सप्टेबरला आपण तयार आहोत. यादीत भर घालण्याचे गड : घनगड पदरगड ?

In reply to by धमाल मुलगा

यादीमधे अजुन एक गड घाल....कलिंगड...हुम हा हा हाह हा... - वा

ट्रेक ची मला पण आवड आहे.... मी येऊ शकतो का?? मला दोन्ही तारखा सोयीस्कर आहेत... साधारण खर्च किती येऊ शकेल???

प्लॅन कराच......आमची तयारी आहे. दोन्ही तारखा चालतील.

ए पब्लीक,,, च्यायला ते जिप्सी विचारून राह्यलय, तर जाउन या की कुठंतरी, च्यायला तुम्हाला न्हाई त्ये पाहिजेल.. असो, आम्हि आलो असतो पण खुप लांब आहे आता. त्यामुळे या तुम्ही जाउन.

जावा जाऊन या, (हलके घ्या) आम्ही काय, कामात मरमर मरू राहिलोय, जावा आणि ढीगभर फोटू काढा, चांगले चांगेल लेख लिव्हा आणि टाका जालावर, फोटू बगून आमचीबी तेवढीच (फुकटात) ट्रेक होऊन जाईल. आपल्या सर्वांना शुभेच्छा

मंड्ळी, माझ्या अन्दाजा प्रमाणे वरच्या ३ पैकी कुठल्यही गडावर जायला पुण्यातून २०० रु. पेक्षा जास्त खर्च नाही. प्रत्येकाने जेवण बांधून आणल्यास आणि कमी होईल. आणि लोकल /एष्टी महामंडळ झिंदाबाद. सध्या ४/५ सप्टे. तारीख धरून चालू. धमालराव :- घनगड चालेल ,पदरगड नवीन लोकांना त्रास देईल.

मि पन तयार हाये. तुम्ही ठरवा.

कोरम भरायला लागलायं की ! विलासराव्,धमालराव्,ध्येयहीनअण्णा,भारतीय् भौ,सन्दीपराव. बाकी मंड्ळी आत्ताच आपापल्या शिटा(रूमाल टाकून) धरा आणी निराशा टाळा.

मी पन

In reply to by ब्रिटिश टिंग्या

प्रेषक ब्रिटिश टिंग्या दि. मंगळ, 10/08/2010 - 16:27. मी पन अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट! टिंग्या स्व्बाक्षरीच्या वाक्याचा विचार कर रे.

फायनल झाल का सान्गा.... मी लगेच निघ्तो इथन..... आपन काय माग्-पुड नाय पानार कुट बी सान्गा ह्यो पंटर तयार हाय....

तुम्हाला चान्स आहे...ज्यांना शक्य आहे..ते जा यार.. मी असते तर अर्ध्या पायावर आले असते .. मजा करा भरपूर फोटो काढा..मस्त लिहा आणि छापा .. atleast डोळे भरून पाहु तरी तुम्हा सर्वांची मजा! जिप्शीदा, एक दवंडी पिटा. कई भारी आयडिया...!

५ सप्टेंबर ही तारीख निश्चीत केली आहे. स्थळ :- विकटगड (नेरळ) जे यायला उत्सुक आहेत त्यांनी मला फोन करा. +९१-९८२३४५७०६० काही दिवस मी मि.पा. वर येउ शकणार नाही तरी त्यामुळे फोन वरच बोलू.

५ सप्टेंबर ही तारीख निश्चीत केली आहे. स्थळ :- विकटगड (नेरळ) जे यायला उत्सुक आहेत त्यांनी मला फोन करा. +९१-९८२३४५७०६० काही दिवस मी मि.पा. वर येउ शकणार नाही तरी त्यामुळे फोन वरच बोलू.

In reply to by जिप्सी

विकटगड? पेबीचा किल्ला? सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणं जमेल भाऊ आपल्याला? नसेल तर जेवणाची सोय सोबत घेऊन जावं लागेल. मी हैच्च...कसं जायचं तेव्हढं सांगा. :)

सगळ्यांना शुभेच्छा, येऊ न शकणार्‍या मिपाकरांची आठवण काढून ट्रेक करा लोकहो,आल्यावर आमच्यासाठी फोटो गिटो, वृत्तांत गित्तांत टाकायला विसरु नका, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

आमच्यासाठी फोटो गिटो, वृत्तांत गित्तांत टाकायला विसरु नका, असेच म्हणतो!

मी,धमालराव,जाई अस्सल कोल्हापूरी,विलास् राव्,येवड्या शिटा फिक्स आहेत्,बाकी अजून कोण कोण येणार आहे?

In reply to by नावातकायआहे

आदले दिवशी फिक्स करुन ठेसनावर येळेवारी या म्हणजे झालं...! बाकी Gypsi is the right person to suggest you about that!

७ सप्टेंबर करा कि फिक्स... ६ तारखेपर्यंत वेळ निघत नाहीये हो.. मलाही यायला आवडेल..

७ सप्टेंबर करा कि फिक्स ----> अनिलराव ,केलं असंत हो पण कामगार लोकांना सोमवारी सुट्टी नसती ना काय करणार !

१२ तारखेला जमेल का हो???? कींवा १० ते १९ कधीपण चालेल..... म्हणजे मज गरीबाला पण येता येईल. मी दुबईतून खास ट्रेकसाठी येतो कि......

In reply to by स्वछंदी-पाखरु

तुम्ही आलात की पुन्हा प्लॅन करु.... आप्ल्याकडे गड कमी का आहेत! (आत्ता कोळसा कशाला ओढताय राव?)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

बये मी कोळश्याच्या खाणीत काम नाय करत.... मी आय. टी. हमाल आहे..... :)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

जाऊन या तुम्ही लोक मी ईकडे बुर्ज खलिफावर जाऊन येतो...... ईथे ट्रेक साठी साधा मातीचा ढीगपण नाही दिसत म्हणुन म्हणालो....

जर मेजॉरिटी पब्लिक येणार असेक तर पुढे करा ना! यायची इच्छा तर खुप लोकाना आहे! तारीख पुढे ढकलता आली तर खरच बरे होइल! सगळयांना जास्तित जास्त जणाना जर पुढ्च्या तारखेला शक्य असेल तर प्लॅन पुढे करायला हरकत नसावी! anyways... माझे तर येणे रहित होइल कदाचित ....जिप्सी यार! may be next time..! यावेळी तुम्ही होउन या पुढे! शुभेच्छा! :) तारखेबद्दल कौल टाका हवे तर आणि मग ठरवा!

१२ तारखेला जमेल का हो???? कींवा १० ते १९ कधीपण चालेल ----> नको प्लॅन पुढ धकलायला नको,नंतर फार तर परत जाऊया कुठतरी !

काल रोजी ५ सप्टें. मोहिम फत्ते करणेत आली :) पावसाचा जोर आणि ऐनवेळचा निर्णय म्हणुन विकटगडाऐवजी कोरीगडावर(कोराईगड) हल्लाबोल करण्यात आला.

In reply to by धमाल मुलगा

धम्या, एका ओळीत काय सांगतो आहेस? फोटो आणि वृत्तांत कुठेय? स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

हा हा हा... अगं स्वातीताई, मुद्दामच मी असं लिहिलंय. सरसेनापतींना फोटो आणी वृत्तांत लिहिण्याच्या णैतिक जबाबदारीचा दबाव यावा म्हणुन ;)

आपण नेहमीच्या सवयीप्रमाणे जबाबदारी झटकत माफ करा,हस्तांतरीत करत आहोत. तरूण आणि धडाडीच्या रक्ताला वाव मिळावा म्हणून विलासरावांकडे ही जबाबदारी हस्तांतरीत करण्यात येत आहे. रसिकहो,विलासरावाच्या रसाळ ओठातून छे छे चूकलच ! लिखाणातून तुम्ही आता आमच्या ट्रेकचा आनंद घ्या ! (आज बोलताना लय फापलायलयं राव) विलासराव,हून जाउद्या आता !

In reply to by जिप्सी

तुम्ही लेको कसले टाकताय फोटो आणि वृत्तांत वगैरे... चॅलेंज आहे आपला.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>तुम्ही लेको कसले टाकताय फोटो आणि वृत्तांत वगैरे... चॅलेंज आहे आपला. +१, हेच म्हणतो. बिपिनदाचे चॅलेंज आहे ते पुरेसे आहे, अजुन दुसरे शेप्रेट चॅलेंज देत नाही :) - छोटा डॉन

In reply to by जिप्सी

>रसिकहो,विलासरावाच्या रसाळ ओठातून छे छे चूकलच! अहो रसाळ वाणी, सुमधुर वाणी म्हणतात हो! तरीही 'रसाळ ओठ' म्हणत असाल तर नकोच तो वृत्तांत व फोटो. म्हणजे इथे नको डायरेक्ट ट्रेकप्रेमी ब्लॉगवर जाउ दे. बिका चॅलेंज मागे घ्या.

बिकाजीराव आणि डानराव ! आम्हाला चायलेंज देऊ नका बर्,जर का आम्ही एकदा इरेला पेटलो तर १ दिवसाच्या ट्रेकचा वृत्तांत आम्ही ५ भागात लिहून दाखवू, २ महीने आमची मालीका चालवू ! बघायचचं आहे काय तुम्हाला? ट्रेककू ५ लोगा आणि एक्कीच भाग मे वृत्तांत??? बहोत ना इन्साफी हय!

In reply to by जिप्सी

आम्हाला चायलेंज देऊ नका बर्,जर का आम्ही एकदा इरेला पेटलो तर १ दिवसाच्या ट्रेकचा वृत्तांत आम्ही ५ भागात लिहून दाखवू, २ महीने आमची मालीका चालवू !
हॅ हॅ हॅ, असली टर्रेबाजी आम्ही रोज ऐकतो. २ महिने मालिका चालवण्याची ऐट कुणासमोर दाखवताय, आम्ही खुद्द १ लेखमाला गेली २ वर्ष लिहीत आहोत, आहात कुठे ? ( बाकी ती लेखमालिका कुठे आहे ते विचारु नका, अजुन फायनल हात फिरला नसल्याने प्रसिद्ध केली नाही ;) ) बाकी इरेस पेटुन लेख टाकणार असाल तर "( खुद ) आगे बढो ( आणि धम्याचा नादी नको लागो ) "

In reply to by छोटा डॉन

आमचंही चायलेंज आहे. हे लोकं काय लिहीणार वृत्तांत! तुम्ही सगळे लोकं आमच्या डान्रावांच्या लायनीतलेच!

ईर्षाच माणसाच्या नाशास कारणीभूत ठरते ! या उक्तीला अणुसरून आम्ही विवेक आणि संयम दाखवत आहोत्,अण्यथा २-५ लेख सोडणे आम्हास फार जड जाणार नाही.आणि आपण टर्रेबाजी करीत नसतो,आपन मुळातच लै डेंजरफुल माणूस असत असतो. धम्याचा नादी नको लागो :-- १००% सत्य. जो धमालरावांवरी विसावला, त्याचा कार्यभाग बुडाला!

राजगड ते शिवथरघळ :- मढे/गोप्या घाटातून उतरून. अवघड आणि दमवणारा ट्रेक. डोंगरातून २५-३० किमी चालावे लागेल. तर कोण कोण येणार ????

In reply to by विलासराव

मी ते पालखीचं हलकटपणानं लिहिलं की वो... आणी तुम्हाला पालखीत बसवलं तर मग आम्ही गप्पा कुणाशी मारायच्या? :)

मी आहेच.

परंतू राजगड पण फिरणार आहोत ना .. नाहीतर त्याच्या पायथ्यापासुन सुरु व्हायचा प्रवास .. आणि २ दिवसच सुट्टी असते तेव्हड्यात होयील का हा प्रवास ? - बाकी उशिरा जॉईन झाल्यामुळे मागील अनुभवास मुकलो आहे . गणेशा

In reply to by धमाल मुलगा

बरोबर आहे हो .. बघु कसे ठरते आहे सर्वांचे ..

नाही नाही राजगड फिरून मग पुढचा ट्रेक करायचा तर ४ दिवस पाहीजेत एवढा वेळ आहे काय सगळ्यांकडं ???? त्यामुळ राजगड ते शिवथरघळ असच करूया ! माझ्या अंदाजानुसार अनंत चतुर्दशी नंतर पावसाचा जोर जरा कमी होईल मग तारीख ठरवूया ! आणि आपल्याला वाटाड्यापण लागेल त्याची जोडणी मी करतो.काय म्हणता मंडळी ????

In reply to by जिप्सी

श्री जिप्सी, तुम्ही म्हणता तेवढी चाल नाहीये. नसरापूर फाट्याहून केळद गावापर्यंत वाहन जाते. केळद गावातून उपांड्या घाट उतरुन कर्णावडी आणि आणखीन थोडं खाली उतरलं की रानवडी गाव येतं. रानवडीतून शिवथरला जाण्यासाठी वाहन मिळू शकते. तिथे मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी खुट्याच्या रस्त्याने (दुर्ग-ढाकोबा वाला खुटे दार नव्हे. हा खुट्याचा रस्ता वेगळा जो शिवथर घळीच्या मागच्या बाजूने कुंड- शिळीम गावातून जातो आणि धारमंडप पाशी वरंधा घाटाला मिळतो. पुण्यात वास्तव्य करणार्‍या मंडळींना हा रुट बेस्ट पडू शकतो. मुंबईत येताना मात्र हाल होतात. महाड मार्गे यावं लागत आणि रात्री खूप उशीर होतो. ) ही लेटेस्ट इन्फर्मेशन आहे. मी या जुलै महिन्यातच हा रुट केला. अवघ्या २.५ दिवसात ट्रेक संपला. खूप दमलेली मंडळी शिवथर घळ येथून महामंडळाच्या बसने थेट घरी परतू शकतात. अर्थातच ते खुट्याच्या रस्त्याला मुकतील. उपांड्या घाटाऐवजी गोप्या घाट किंवा आंबेनळी घाटानेसुद्धा शिवथरला पोचता येईल. अधिक माहिती हवी असल्यास खवतून विचारा. पण तुम्ही मजबूत फिरला आहात असं वाटतंय आणि ही सगळी माहिती तुमच्याकडे असेलच. किंवा वल्ली, विमुक्त ही तज्ञ मंडळी आहेतच त्यांना विचारा. जरुर जाउन या.

In reply to by अप्पा जोगळेकर

मी ४ दिवस लागतील म्हणत होतो ते राजगड पूर्ण फिरून मग खाली उतरून शिवथरघळ करायसाठी. मी पण अजून हा ट्रेक केलेला नाही पण आता या पुढं गडांबरोबरच घाट्पण पालथे घालायचे अस ठरवलं आहे. सुरुवात या ट्रेकपासूनच.माहीती लागली तर तुम्हाला त्रास देउच !!!