Skip to main content

अंधार मिठी

लेखक sneharani यांनी मंगळवार, 07/12/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम पाण्याच्या संगीतासारखं चाललेलं माझं जीवन असं अचानक अंधारानं मिठी मारल्यासारखं का झालयं? काही कळेनास झालयं..!सुखामगं दु:ख अन् दु:खामागं सुख येतं असं म्हणतात पण ह्या सुखदु:खाच्या अष्टौप्रहर खेळात दु:खाचाच खेळ जास्त वेळ चालतोय्..असं किती दिवस चालणार आहे? का आज माझी सखी मला सोडून जाणार आहे म्हणून मनाची घालमेल चाललीये. खोलवर रुजलेला दु:खाचा काटा आज परत त्याच दुखण्याची अनुभुती देणार आहे असचं वाटतय आज!दुरावा म्हणू की ताटातूट? हव्या असणार्‍या व्यक्तींशीच का होते ताटातूट...!दरवेळी विधाता का असे धक्के देत राहिलाय मला.

वेणी सोडुनिया : गौळण

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 07/12/2010 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
वेणी सोडुनिया : गौळण गुपचिप आला हा उघडोनी ताला झोपेमधी होते याने रंग टाकीला गौळण सांगे राधा, गौळणीला .... ॥धृ०॥ नाही गडे याचा, जराही भरोसा नख मारूनिया दिला, पदराला खोसा बेगी बेगी येतो, चिमटेची घेतो वाकड्या, सुदामा, पेंद्या संगतीला ..... ॥१॥ करुनिया चाल, डिवचितो गाल वेणी सोडुनिया आत, भरतो गुलाल असा चक्रपाणी, कोणा ना जुमानी चिंबाचिंब भिजवितो पैठणीला ..... ॥२॥ कुणी गडे याला, जरा समजावा बोलताती सासू दीर, मार किती खावा वळणाचा घाट, हा अडवितो वाट अरविंद पाहे सखे, ब्रह्मलीला .....

मूष रफ पाकिस्तान /भारत व नाण्याची दुसरी बाजू

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी मंगळवार, 07/12/2010 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
मूष साहेबांचा विसा नाकारणे. त्यावर त्यांनी कांगावा करणे साहजिकच आहे ...पण नाण्याची दुसरी बाजू समजून घेणे आवश्यक आहे . त्यांनी बलुचीस्तांमधील कारवायांमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप केला.( हे सत्य असल्यास असे समजू कि भारतीय करदात्यांचा पैसा कुठेतरी सत्कर्मी लागतोय .नाही तर आपले मंत्री म्हणजे राजा आहेतच पैशाचा सद उपयोग करणारे . ) त्यामुळे आपल्या सरकारने त्यांचा विसा नाकारला.

नशीबाचा खेळ!

लेखक मेघवेडा यांनी मंगळवार, 07/12/2010 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात ना, वेळ खराब असेल तर उंटावर बसलेल्यालादेखील कुत्रं चावतं. तसंच काहीसं झालं होतं त्या तीन दिवसांत डरहम कौंटीच्या क्रिकेट संघासोबत. जून १९९४ मधली गोष्ट. एजबॅस्टनला वॉरिकशायर संघासोबतचा त्यांचा चार दिवसांचा सामना गुरूवारी सुरू झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत डरहमने जॉन मॉरीसच्या नाबाद २०४ धावा नि त्याला कर्णधार फिल बेनब्रिजने ६७ धावा काढून दिलेली साथ यांच्या जोरावर ३ बाद ३६५ धावा जमवल्या! दुसर्‍या दिवशी मॉरिस झटपट बाद झाला मात्र डरहमची टांकसाळ चालूच होती.

बहरला पारिजात दारी...

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 06/12/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यभामा राजवाड्याच्या गच्चीवर उभी होती , सकाळची सगळी कामं झाली, पुजा, नॆवेद्य वगॆरे, आज सगळं अगदी वेळेत झालं त्यामुळं मन कसं प्रसन्न होतं. बाहेर नुकताच हिवाळा सुरु होवुन काही काळ लोटल्यानं येणारा थोडासा निवांतपणा होता. किंचित धुकं आणि त्यातच द्वारकेतल्या घराघरातुन येणा-या धुरामुळे निर्माण होणारी तरल चित्रं पाहता पाह्ता अचानकच तिची नजर त्याच्याकडे गेली. जेंव्हा हे एकदा स्वर्गातुन परत येताना याच्या फुलांची माळ घालुन आले होते, तेंव्हा पासुन माझं मन त्याच्या साठी फार झुरत होतं. नंतर एक दोन वेळा यांच्याकडे विषय काढला, पण छे आमचं कोणि ऎकेल तर शपथ. मग मी पण शेवटचं अस्त्र उचललं.

बुलबुलचे नर्सिंग होम आणि माहेरपण

लेखक जागु यांनी सोमवार, 06/12/2010 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही नवीन घरात राहायला येऊन पाच वर्ष झाली. ह्या घरात आलो तेव्हा आम्ही घराच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेतल्या. जसे सोफा, बेड, फ्रेम्स, टिव्ही ट्रॉली, लॅम्स, झुंबर. त्यातील माझ्या आवडीचे म्हणजे झुंबर. थोडा वेगळा आणि आकर्षक म्हणून मला आणि माझ्या मिस्टरांना बाउल्सच्या आकाराचा झुंबर आवडला. ह्यात रिंग्ज मध्ये खोलगट काचेचे डिझाइन्स वाले बाउल्स बसवलेले आहेत. अगदी आवडीने आम्ही ते झुंबर लावल. कोणी पाहुणे येणार असतील किंवा घरात एखादा कार्यक्रम असेल तर आवर्जून आम्ही ह्या झुंबराची लाइट चालू करायचो. सगळ्यांना हया झुंबराच आकर्षण वाटायच. जेवढ सुंदर आहे तेवढच हे झुंबर नाजुक पण आहे.

वृद्धाश्रमातील ते खिन्न डोळे !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 06/12/2010 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
[कोठल्याशा वृद्धाश्रमात गेलो. नि करून दृश्य बघून त्यांच्या डोळ्यातील खिन्नपणा बघून मन उदास उदास झाले. तेच शब्दात.....] वृद्धाआश्रामातील कितीतरी डोळे लागलेले असतात रविवारी संध्याकाळी मुलांच्या भेटीसाठी आतुर झालेले असतात किती कासावीस होतात ही म्हातारी माणसे ?? घशाला कोरड पडते देव पाण्यात ठेवतात [मनातल्या मनात ...] प्रार्थना करतात ....! त्यांनी यावे म्हणून कुठे चळकण आवाज झाला तर उत्तेजित होतात त्यांची मने .... आले असतील..?
काव्यरस