Skip to main content

काही तरी आठवतंय ...

लेखक टारझन यांनी सोमवार, 06/12/2010 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपला मेंदु किती विचित्र असतो नाही ? बरंच काही साठवलेलं असतं त्यात. पण बर्रंचसं चक्क विस्मृतीत गेलेलं असतं, अगदी धुळीने मख्ख मळलेल्या पि.एम.टी. बस सारखं. आणि कधीतरी १५ ऑगस्ट २६ जानेवारीला बस धुवावी आणि त्यावर लिहीलेली "स्वच्छ पुणे सुंदर पुणे" ची जाहिरात दिसावी तशा आपल्या स्मृती जाग्या होतात. काही गोष्टींचं आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. "अरेच्च्या, आपल्या आयुष्यात हे ही घडुन गेलं होतं ? " , "असे होतो आपण ? " , "काय बावळटपणा केला मी ? " असंच काहीसं काल घडलं. आज नवी कंपनी जॉइन करायची म्हणुन काल जरा माझ्या फायलीवरची धुळ झटकली.

प्रश्न आणि उत्तर...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 06/12/2010 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक वाईट खोड आहे. बसमध्ये बसलेली अनेक माणसं विंडो सीट मिळाली, की कानाला ईयरफोन लावतात, आणि मस्तपैकी डुलकी काढतात. मी मात्र, खिडकी मिळाली की रस्त्यावरचा कोपरान कोपरा उगीचच न्याहाळत बसतो...

जुनिपर बॉन्साय आणि माझी मला नव्याने ओळख

लेखक शुचि यांनी सोमवार, 06/12/2010 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
दर वर्षी प्रमाणे, या म्हणजे डिसेंबर महीन्यात ऑफीसमध्ये नाताळ पार्टीचे आयोजन केले आहे. नाताळ म्हटले की एकमेकांना भेटवस्तू देणे आलेच. यावर्षीदेखील, "व्हाईट एलीफंट" हा खेळ आम्ही खेळणार आहोत.यामध्ये प्रत्येक जण आणलेली भेटवस्तू एका मेजावर ठेवतो. मग सगळ्यांना क्रमांकाच्या चिठ्ठ्या वाटल्या जातात आणि अनुक्रमे प्रत्येक जण जाऊन भेटवस्तू उघडतो. २ नंबरपासून २ पर्याय उपलब्ध असतात - (१) नवीन भेटवस्तू उघडणे किंवा (२) आधी उघडलेल्या भेटवस्तूची मागणी करणे. यावर्षी आम्ही खूप कमी बजेट ठेवलं आहे - फक्त $७.

सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे.

लेखक नीलकांत यांनी रविवार, 05/12/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे. सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो.

तुला आपलेसे करावे किती ?...

लेखक मयुरेश साने यांनी रविवार, 05/12/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
तुला आपलेसे करावे किती ? जगावे किती ? मी ! मरावे किती ? किनाराच मी ! भरती ओहटिचा बुडावे किती ? मी ! तरावे किती ? तू जवळून जाता ! मनी बाग फुलते तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ? तुझी याद येते ! तसा तोल जातो सावरून मी ! वावरावे किती ? ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले लिलावात माझ्या ! हरावे किती ? चांदणे सारखे आज जाळू पहाते तुझे आज नसणे स्मरावे किती ? मिठी दे युगांची ! धुके दूर सारु फुलांनीच दव पांघरावे किती ? तुला "मी "- मला "तू" - मला "तू" - तूला "मी" परक्या परी -हे झुरावे किती ? मयुरेश साने...दि.०५-डिसेंबर-१०
काव्यरस

बासुंदी......मदत हवी आहे...

लेखक मृगजळ यांनी रविवार, 05/12/2010 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील आठवड्यात बासुंदी करायचे ठरवले...कृती माहित नसल्याने तयार बासुंदी मिक्स वापरले...पण म्हणावी तशी टेस्टी नाही झाली बासुंदी...जर कुणी मिपाकर खवा बासुंदीची कृती जाणत असेल तर ...कृपया मदत करावी...

माझ्या देशात राहणाऱ्या बाबास ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 05/12/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षे झाली मी इथे परदेशात येऊन बसलो आहे बाबा देश सोडून येण इतकं सोपं असतं का बाबा ?-- आपल्या मातीचा वास आपल्या घराचा सहवास गणपतीची आरास हनुमानजयंतीला भल्या पाहटे उठून केलेली आरती नि ते गुळखोबरे …..
काव्यरस

मरण्यात अर्थ नाही

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 05/12/2010 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मरण्यात अर्थ नाही . संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही गंगाधर मुटे .....................................................
काव्यरस