नव्या वर्षांच्या शुभेच्छा
मित्रानो.
दरवर्षी नेमाने येणारा क्षण आज पुन्हा येतोय
या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षात प्रवेश कराण्याचा क्षण.
नवी नवरी माहेराहून सासरी जाताना तिच्या मनात असते तशी हुरहुर आणि आनन्द अशा सम्मिश्र भवना घेवून आपण हे क्षण जगत असतो.
सरत्या वर्षात काय गमावले /काय कमावले याचे जमाखर्च मांडत आपण नव्या वर्षात काय करणार याचे मनसुबे रचत असतो.
लहानपणी १ जानेवारीला मी गेल्या वर्षी झोपलो ते एकदम थेट्या वर्षीच उठलो असे सांगायचो. ते खरे देखील होते.
३१ दिसेंबरला टीव्हीवर फारतर रात्री ११ पर्यन्त कार्यक्रम असायचे. गावात एखादा गाण्याचा कार्यक्रम वगैरे असायचा. ३१ डिसेंबर हा इवेन्ट झालेला नव्हता.
मिसळपाव
